मी पाहिलेला शेतमळा मराठी निबंध | Mi Pahilela Shetmala Marathi Nibandh

Mi Pahilela Shetmala Marathi Nibandh मी पुण्यात राहतो त्यामुळे मी कधी शेती किंवा शेतमाळ बघितलेले नाही. त्याची वर्णने वाचली होती. कदाचित एखाद्या चित्रपटात त्याची दृश्य बघितली होती. त्यामुळे शेत, शेतकरी आणि त्याचे घर पाहण्याची खूप इच्छा होती. तसा हट्टच मी अनेकदा बाबांकडे धरला होता. पण तो असा योग् मात्र यंदा आला होता. बाबाचे एक पाटील मित्र साताऱ्याजवळ राहत होते.

Mi Pahilela Shetmala Marathi Nibandh

मी पाहिलेला शेतमळा मराठी निबंध | Mi Pahilela Shetmala Marathi Nibandh

ते नेहमी आमच्याकडे यायचे. ते एकदा सहज मानले होते कि, ” येणार का आमचा घरी शेतावर ?” आणि मला खूप आनंद झाला होता. मग मी नाताळयाच्या सुट्टीमध्ये आम्ही चार दिवस साताराजवळील “पाटस” या त्याचा गावी ज्याचे ठरवले होते. आम्ही पुण्यावरून आगगाडीने साताऱ्याला गेले होतो. तेथे स्थानकावर उतरून बाहेर थांबलो होतो.

तेथे पाटील काकाची गाडी आम्हाला न्यायला आलेली होती. घरी जाईपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे घराबाहेर पडलोच नव्हतो. रात्रीचे जेवण साधेच पण प्रेमळ अगत्यामुळे ते अधिक गोड वाटले. प्रवासाच्या दगदगीने  थकव्यामुळे मला रात्री शांत आणि छान झोप लागली होती. पक्षांच्या किलबिलाटामुळे सकाळी जाग आली  होती. झोप छान झाल्यामुळे एकदम ताजेतवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर डोळेच दिपले होते.

दृष्टीचा टप्पा पोहचत होता तोपर्यंत तिथे सगळे हिरवेगार दिसत होते. पाटीलकाकाचे घर चक्क शेतात होते. सकाळी न्ह्याहारी आटपून आम्ही काका बरोबर शेतावर  गेलो  होतो. पायाखाली काळीभोर जमीन !  पायातल्या चपला काढून त्या मातीवर पाय ठेवले. मऊशार  मातीचा थंड स्पर्श पायाला सुखद वाटत होता.

मध्यभागी एक मोठी विहीर हि होती. पाण्याने भरलेली विहीर तुडुंब भरलेली होती. त्या विहिरीवर एक मोठी मोट पण चालू होती. बैल मोट ओढत होते. एक गडी तेथे गाणं गात काम करत होता. मोटेने आणून टाकलेले पाणी वेगवेगळ्या पाटातून शेतातील वेगवेगळ्या रोपांकडे जात होते.

मोटेची कुईकुई, पाटातील  पाण्याची झुळझुळ आणि मोटेवरच्या माणसाचे गाणे यामुळे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. कितीतरी वेळ तो नाद ऐकत आम्ही तेथेच उभे राहिलो होते. शेत इतके दूरवर पसरलेले होते कि, एका दिवसाला अशक्य होते. आम्ही काकांबरोबर शेतात हिंडत होतो.

शेतामध्ये जोंधळा, बाजरी, ज्वारीची कणसे डोलत होती. विविध भाज्या शेतात तयार होत होत्या. एवढ्या मोठ्या शेतात बरेच लोक काम करत होते. दुपारी एका मोठ्या वटवृक्षाखाली आमची जेवणे झाली. भाजी भाकरी खाताना लक्षात आले कि, या भाज्या वेगळ्याच चव देतात, कारण ती माळातली ताजी भाजी होती.

त्या मळ्यातील कित्येक फळे तर यापूर्वी मी पाहिलेलीहि नव्हती. मग दुसऱ्या दिवशी शेतात पाहुण्यासाठी हुर्डा – पार्टीचा कार्यक्रम होता. भाजलेली कणसे, ओले खोबरे, आणि खोबऱ्याची चटणी फार मज्जा आली होती. तिसऱ्या दिवशी रात्री शेकोटीचा कार्यक्रम झाला.

त्यामध्ये सगळ्यांनी गाणी मानण्याचा आनंद लुटला होता. चौथ्या दिवशी आम्ही तेथून निघणार होतो. पण तेथून निघावेसे वाटत नव्हते. ते चार दिवस आम्ही शेतमालावर काढले होते. कारण न संपणारा अनुभव आम्ही अनुभवलेला होता. त्या शेतावरची हिरवीगार गर्द गर्दी डोळ्यामध्ये साठवत आम्ही परत परतीचा प्रवास मार्गाला लागलो. मनाला मात्र ” परत परत येथे यावेसे ” असेच वाटत होते.

असा अनुभव प्रत्येकाला अनुभवता यावा असे वाटत होते. आपल्या सगळ्यांच्या जीवनात शेतकरी आणि त्याचं शेत यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी शेतात राबतो त्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. आपण यासाठी शेतकऱ्यांचे कायम ऋणी असायला हवे.

शहरवासीयांचा सहसा शेताशी संबंध येत नाही. पण सुदैवाने माझ्या आजोळी आजी आणि आजोबा शेतकरी असल्याने मला मात्र शेत जवळून बघता आलं. गावातल्या घरापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर आमचं शेत होतं. उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी गेलो की आम्ही दिवसभर आजी आणि आजोबांसोबत शेतात जात असू.

सकाळची सारी कामे आटोपून आणि दुपारचं जेवण सोबत घेऊन आम्ही शेतात जात असू. रस्त्यावर भरगच्च झाडे असल्याने उन्हाचा त्रास जाणवायचा नाही. वाटेतील एका जलकेंद्रावर आम्ही पिण्याचे पाणी भरून घेत असू. शेतात पोहोचलो की मग आजोबांनी बांधलेल्या झोपडीत आम्ही सगळं सामान ठेवत असू.

आजी आजोबांनी शेतात गहू, बाजरी, मका, भुईमूग अशी पिके लावलेली असायची. ते दोघे मग शेतात काम करायचे. कधी कधी आम्ही त्यांना जमेल तशी मदत करायचो. आजोबा आम्हाला झोका बांधून द्यायचे. शेतात पेरू, आंबा, फणस अशी झाडे लावलेली होती. त्यावर खूप वेगवेगळे पक्षी येऊन बसायचे.

हे सारे पाहायला फार मजा यायची. विविध पिकांची ओळख याच शेताने करून दिली. विविध फळे चाखायला मिळाली. फुलपाखरांच्या मागे धावणे हा आमचा अत्यंत आवडता खेळ असायचा. कधी कधी आजी आम्हाला गुरांवर लक्ष ठेवायला सांगायची. शेताच्या बाजूला एक ओढा वाहत असायचा. त्यातले पाणी पाटाने शेतात सोडले होते. त्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसायला फार मजा यायची. शेतातल्या रम्य वातावरणात संध्याकाळ झालेली समजायचं सुद्धा नाही. इतके सुंदर होते ते शेत.

आता शेत आहे पण आजीआजोबा नाहीत आणि आमचं बालपण सुद्धा नाही. परंतु त्यांच्यासोबतच्या शेतातील या आठवणी मात्र आयुष्यभर लक्षात राहतील.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment