Mi pahileli Ramtekchi Yatra Essay In Marathi आमची सगळ्यांची गावाकडे निघायची लगबग चालली होती. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. कारण आम्ही चाललोय रामटेक यात्रेला ! आमची गावची यात्रा ! वर्षभर आम्ही सगळे याच क्षणाची वाट पाहत असतो. कारण कामाच्या निमित्ताने गावापासून दूर आम्ही शहरात राहायला आलो.
मी पाहिलेली रामटेकची यात्रा निबंध मराठी Mi pahileli Ramtekchi Yatra Essay In Marathi
शहरातल्या वातावरणापेक्षा गावातले वातावरण खूप आवडते. व या यात्रेच्या निमित्ताने आम्हाला सगळ्या नातेवाईकांना ही भेटता येते. कारण, या यात्रेच्या निमित्ताने सगळे नातेवाईक एकत्र येत असतो .माझे गाव नागपूर पासून पन्नास किलोमीटरवर असलेले हे शहर अतिशय सुंदर आहे.
रमणीय अशा उंच टेकड्यांवर बसलेले रामटेक मंदिर! ते एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ही आहे. तेथे सुमारे सहाशे वर्षे जुने असे श्रीरामाचे मंदिर आहे. या मंदिराचा पण एक इतिहास आहे. श्री प्रभूराम वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यामुळे याला रामटेक असे नाव पडले असे म्हटले जाते. या प्रभूरामाच्या मंदिराच्या परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिरही आहे. येथे वानरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो.
कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. लांबून लांबून लोक या यात्रेला येतात. रात्री 12 वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो .तसेच रामनवमीला सुद्धा यात्रा असते. त्रिपुरासूराच्या शिवाने केलेल्या संहाराची ही निदर्शने आहेत.
प्राचीन आख्यायिकेनुसार हिरण्याकशिपूरचा वध केल्यानंतर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली तेव्हा देवळाजवळ एक तळे निर्माण झाले आहे असेही म्हटले जाते. तसेच प्रभू श्रीरामाने शंभूकाला ठार मारले .तेव्हा प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून आपल्याला मरण प्राप्त झाले या आनंदाने त्याने प्रभूरामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला.
तेव्हा प्रभू रामाने त्याला तसा वर दिला .आज शंभूकाची ही पूजा येथे होते .त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर येथील शंभूकाच्या मूर्तीची पूजा ही प्रभू रामाबरोबर होते. लीळा चरित्रातही असा उल्लेख आहे की 12 व्या शतकात सुद्धा ही यात्रा भरत होती. म्हणजे या यात्रेला प्राचीन काळापासून महत्त्व आहे.
आमच्या गावची यात्रा खूप मोठी असते .लांबून लांबून लोक यात्रेला येतात .गावातील सगळ्यांकडे ज्याचे त्याचे नातेवाईक यात्रेसाठी आलेले असतात. यात्रेमुळे वर्षातून एकदा सगळ्यांशी गाठीभेटी होतात. आठ दिवस तरी यात्रेचा उत्सव जाणवतो. यात्रेच्या वेळेस देऊळ विविध रंगबिरंगी फुलांनी सजवले जाते.
विद्युत रोषणाई केली जाते. तसेच त्रिपुर प्रज्वलित केल्या मुळे मंदिराचे सौंदर्य हे जास्तच आकर्षक दिसते. देवळाच्या जवळ वेग वेगळी दुकाने लावली जातात. कुठे मुलींसाठी कानातले, गळ्यातले ,सौंदर्य प्रसाधनाची दुकाने ,कुठे कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने ,खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने. तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची ही दुकाने लागलेली असतात.
आम्ही सर्वजण प्रथम पाणीपुरीवर डल्ला मारतो. नंतर वेगवेगळे पदार्थ खातो .घरी येऊन काहीही खायची इच्छा होत नाही .तसेच मोठे छोटे असे भरपूर पाळने येतात .आम्ही सर्वजण सर्व प्राण्यांमध्ये बसतो. चुकून एकही पाळणा राहणार नाही याची दक्षता घेतो बर का ! पाळण्यात बसल्यावर पाळणा वर गेल्यानंतर आम्ही सर्व जण जोरात ओरडतो. यात्रेच्या दिवशी पहाटेच प्रभू रामाची विधीपूर्वक पूजा केली जाते. नंतर दर्शन घेण्यासाठी भाविक भाविकांची गर्दी होते.
यात्रेमध्ये गर्दीमुळे कोणालाही हानी होऊ नये यासाठी बंदोबस्त केलेला असतो. प्रभु रामाची रथयात्रा गावातून काढली जाते. ती रथ यात्रा पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. दर्शनासाठी येणारे सर्व भाविक या रथयात्रेच्या अनुभवाचा लाभ घेतात. देवळामध्ये सीतामाता रसोई आहे तेथे लोकांना तीर्थ प्रसाद दिला जातो हे झाले.
यात्रेच्या दिवशी परंतु या देवळात दर शनिवारी व रविवारी उन्हाळ्याच्या महिन्यात सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत व इतर ऋतूंमध्ये 11 ते 3 वाजेपर्यंत निशुल्क भोजन दिले जाते. अशी असते आमच्या गावची यात्रा !अशी यात्रा असेल तर, सांगा पाहू कोणाला नाही आवडणार यात्रेला यायला!