पॉवर पॉईंट सादरीकरण मराठी माहिती | microsoft powerpoint information in marathi

पॉवर पॉईंट सादरीकरण मराठी माहिती ( microsoft powerpoint information in marathi )

विकिमित्र च्या सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत मित्रहो आज आपण एमएस पॉवरपॉईंट प्रेसेंटेंशन बदल माहिती घेणार आहोत.
एमएस पॉवरपॉईंट हा एक प्रकारचा प्रोग्राम आहे जो मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूटमध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. या एमएस पॉवरपॉईंट चा उपयोग प्रेसेंटेंशन देण्यासाठी होतो मग हे प्रेसेंटेंशन वैयक्तिक आणि व्यावसायिक सादरीकरण देखील असू शकते.
आजच्या या लेखात आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे कार्य त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट चा इतिहास

रॉबर्ट गॅस्किन्स आणि डेनिस ऑस्टिन यांनी फोरथॉट इंक नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असताना हा प्रोग्राम तयार केला . 20 एप्रिल 1987 रोजीहा प्रोग्रॅम रिलीज झाला, आणि ह्या प्रोग्रॅम च्या निर्मितीनन्तर 3 महिन्यांनी मायक्रोसॉफ्टने हा प्रोग्रॅमविकत घेतला. मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा सादर केली ती पहिली आवृत्ती म्हणजे एमएस पॉवरपॉईंट 2.0 (1990) होती.

हा सादरीकरनावर आधारित प्रोग्राम मानला जातो जो प्रेझेंटेशन अधिक स्पष्टपणे आणि मनोरंजक बनवतो यात ग्राफिक्स, व्हिडिओ इत्यादींचा वापर केला जातो.

सेव्ह झालेल्या प्रेझेंटेशनचा फाईल विस्तार “.ppt” असतो. स्लाइड्स आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनला पीपीटी म्हंटले जाते. बदलत जाणाऱ्या आवृतीनुसार ह्याचे गुणवैशिष्ट्ये देखील बदलतात.

पॉवरपॉइंटमध्ये अनेक वैशिष्ट्ये जोडल्या कारणाने एमएस ऑफिस प्रोग्रामची आवश्यकता आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

एमएस पॉवरपॉईंट म्हणजे काय?

पॉवरपॉईंट (पीपीटी) हे एक वापरण्यास अगदी सोप्पे सादरीकरनाचे ग्राफिक्स सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जे आपल्याला आपली माहिती सादरीकरणाच्या स्वरूपात देण्यास मदत करते.

संगणकावर एमएस पॉवरपॉईंट कसे उघडावे?

संगणकावर एमएस पॉवरपॉईंट उघडण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

1.स्टार्ट बटणावर क्लिक करून

त्यानंतर “ऑल प्रोग्राम्स” निवडा.

2.त्यानंतर त्यातून“एमएस ऑफिस” निवडा.

3.एमएस ऑफिसच्या खाली “एमएस पॉवरपॉईंट” वर क्लिक करा.

4.एक रिक्त सादरीकरण स्क्रीनवर दिसेल.

आपण आपल्या सादरीकरणासाठी टेम्पलेटमध्ये बदल करू शकतो आणि आपण आत्ता प्रोग्राम वापरण्यास पसुरुवात करू शकतो.

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन किंवा पीपीटी म्हणजे काय?

आपल सादरीकरण हे ग्राफिकल आणि व्हिज्युअल पद्धतीने दर्शविणार्‍या विविध स्लाइडचे संयोजन म्हणजे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन किंवा पीपीटी.

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड शो कसा करायचा?

सगळ्यात वर slideshow ऑपशन वर जाऊन क्लिक केल्यावर प्रत्येक स्लाइड एकामागून एक अशी दिसते, तेव्हा याला पॉवरपॉईंट स्लाइड शो म्हणतात

पॉवरपॉईंट स्लाइडमध्ये खालील घटक जोडले जातात.

क्लिप आर्ट
आलेख
छायाचित्रे
चार्ट
मीडिया क्लिप
व्हिडिओ
हे सर्व घटक प्रामुख्याने सादरीकरनाचे कौशल्य वाढविण्यास मदत करतात.

एमएस पॉवरपॉईंटची वैशिष्ट्ये

स्लाइड लेआउट

लेआउटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याच्या आधारे सादरीकरण तयार करतात. हा पर्याय “होम” विभागामध्ये उपलब्ध असतो. आणि तिथे दिलेल्या अनेक लेआउट पर्यायांमधून आपण लेआऊट निवडू शकतो.

स्लाइड डिझाइन

एमएस पॉवरपॉईंटमध्ये विविध थीम्स असतात, ज्याचा वापर करून स्लाइडमध्ये कोणता पार्श्वभूमी रंग किंवा डिझाइन जोडली जाऊ शकतात.
हे सादरीकरण अधिक प्रभावी बनवते आणि समोर असलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेते.
एमएस पॉवरपॉईंटच्या मुख्यपृष्ठावर असलेला “डिझाईन” ऑपशन वापरून आपण डिझाईन वापरू शकतो.
स्लाइड डिझाईन्स ऑनलाईन डाऊनलोडही करू शकतो.

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर

सादरीकरनासाठी म ते वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्हीपैकी काहीही असू शकते.
पॉवरपॉइंट प्रेसेंटेंशन चा वापर खालील ठिकाणी केला जातो

1.शिक्षण – आजकाल ई-लर्निंग आणि स्मार्ट क्लासेस हे सगळीकडे वापरले जात असल्याने पॉवरपॉईंट सादरीकरण करणे शिक्षणास अधिक उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्यास मदत करत आहे.यामुळे मुलांचा शिक्षणातील रस वाढत आहे.
2.विपणन – विपणन क्षेत्रात पॉवर पॉईंट सादरीकरणे अत्यंत महत्त्वाची असू शकतात. आलेख आणि चार्ट वापरुन, संख्या अधिक स्पष्टपणे आणि स्पष्टपणे दर्शविल्या जातात.
3.व्यवसाय – गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यासाठी किंवा नफ्यात वाढ किंवा घट दर्शविण्यासाठी, एमएस पॉवर पॉईंट वापरला जाऊ शकतो.
4.रेझ्युमे तयार करणे – एमएस पॉवरपॉईंट वापरून डिजिटल रेझ्युमे तयार केले जातात.
ग्राफिक्स आणि मजकूर या दोन्हीचा वापर करून आपण आपले प्रेझेन्टेशन अधिक प्रभावी करू शकतो.

तर वाचकहो तुम्हाला पॉवर पॉईंट सादरीकरण मराठी माहिती (microsoft powerpoint information in marathi) लेख कसा वाटला नक्की कळवा.

Leave a Comment