मिसळपाव रेसिपी मराठी | misal pav recipe in marathi

मिसळपाव रेसिपी मराठी | misal pav recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आज आपण चमचमीत मिसळपाव रेसिपी मराठी ( misal pav recipe in marathi ) ची रेसिपी पाहणार आहोत.

मिसळपाव रेसिपी मराठी साहित्य ( misal pav recipe ingredients in marathi ) :

 • 2 वाटी मटकी
 • 2 बटाटे
 • तळण्यासाठी तेल
 • 3 कांदे
 • 2 टोमॅटो
 • गरम मसाला
 • फरसाण
 • शेव चिवडा
 • कोथिंबीर
 • लिंबू
 • लादी पाव
 • लाल तिखट (काश्मिरी मिरची पावडर रंगाससाठी)
 • लाल तिखट (तिखट पणा येण्यासाठी)
 • हळद
 • धनेपूड
 • चवी नुसार मीठ
 • 3 ते 4 लसूण पाकळ्या
 • आल्याचा बारीक तुकडा
 • दालचिनी चा तुकडा
 • 2 लवंगा
 • एक तमालपत्र
 • एक चमचा जिरे पूड
 • अर्धी वाटी ओल खोबर
 • आमसूल किंवा चिंच


जर तुम्ही गरम मसाला वापरणार असाल तर तुम्ही खडा मसाला नाही वापरला तरी चालेल.

मिसळपाव रेसिपी मराठी कृती ( misal pav recipe steps in marathi ) :

मिसळ बनवण्यासाठी मटकी 8 ते 10 तास कोमट पाण्यात भिजत घालावी.मटकी सुती कापड्यामध्ये बांधून मोड काढून घ्यावे.

सर्वप्रथम कट बनवण्यासाठी मटकी ला कुकर मध्ये 2 शिट्या काढून शिजवून घ्यावे.
त्यांनतर लसणाच्या पाकळ्या,आले,मिरी,लवंगा,दालचिनी,तमालपत्र, धनेपूड,जिरेपूड,मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.

कढईत 4 ते 6 चमचे तेल घालावे व गरम करून घ्यावे त्यात वर बारीक केलेला मसाला घालावा व परतून घ्यावा मसाला जळणार नाही ह्याची काळजी घ्या. त्या मासल्यामध्ये 2 मोठे कांदे,एक टोमॅटो, खवलेला नारळ घालावा कांदे आणि टोमॅटो ह्यांच्या मोठ्या फोडी घ्याव्या.

सर्व जिन्नस चांगले परतले त्याला तेल सुटले की गॅस बंद करावा व मिश्रण थंड करून घ्यावे.
थंड झालेले मिश्रण मिक्सर मधून काढून घ्यावे.बारीक पेस्ट बनवावी.

अख्खा मसूर रेसिपी मराठी | akkha masoor recipe in marathi येथे वाचा

आत्ता कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकावे त्यात हिंग,कढीपत्ता,जिरे,मोहरी ची फोडणी द्यावी फोडणी तडतडली कि त्यात वाटलेला मसाला घालावा.

मसाला चांगला परतून घ्यावा मसाल्याला तेल सुटले की त्यात शिजवलेली मटकी घालावी व चांगली परतून घ्यावी.
आत्ता त्यात आवडीनुसार लाल तिखट घालावे,थोडी हळद घालावी त्यांनतर जर तुम्ही स्पेशल मिसळ मसाला वापरणार असाल तर तो घालवा ह्या मिश्रणात उकडलेला बटाटा घालावा.

चवीनुसार मीठ घालावे व आंबटपणा यावा यासाठी आमसूल किंवा चिंच घालावी. त्यांनतर पाणी घालून मिसळ ला छान उकळी काढावी. आपली मिसळ बनवून तयार आहे.

एका डिश मध्ये मटकी ची उसळ घालावी त्यावर चिवडा,फरसाण, कांदा, लिंबू, कोथिंबीर घालावी व लादी पाव बरोबर सर्व्ह करावे.

Leave a Comment