मोतीचुर लाडू मराठी Motichur laddu Recipe In Marathi

मोतीचुर लाडू मराठी Motichur laddu Recipe In Marathi  मोतीचुर लाडू हे बेसन, तूप आणि काजू-बदाम पासून बनवले जातात, हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी मोतीचुर लाडू हे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. भारतातील हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. मोतीचुर लाडू हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. आपण कमी वेळात मोतीचुर लाडू घरीच बनवू शकतो, मोतीचुर लाडूचा उपयोग मिष्ठान्न म्हणून केला जातो.

मोतीचुर लाडू सणाला मोठ्या प्रमाणात बनवले जातात, जे सर्वाना आवडतात. आपण हॉटेल किंवा बेकरी वरती पाहीले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार मोतीचुर लाडू खायाला मिळतात. काही लोकांना मोतीचुर लाडू खूप आवडतात, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट लाडू मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मोतीचुर लाडू कशे बनवतात यांची रेसिपी, आता आपण मोतीचुर लाडू रेसिपी पाहणार आहोत.

 Motichur laddu

मोतीचुर लाडू मराठी Motichur laddu Recipe In Marathi

मोतीचूर लाडूचे प्रकार :

मोतीचुर लाडू हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, विविध ठिकाणी मोतीचुर लाडू वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. यामध्ये मोतीचुर लाडू, केसर मोतीचुर लाडू, भगर मोतीचुर लाडू, बुंदीचे लाडू हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मोतीचुर लाडू रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

मोतीचुर लाडूच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

मोतीचुर लाडू तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर लाडू बनवू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मोतीचुर लाडू कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

मोतीचुर लाडू बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास वेळ लागतो.

मोतीचुर लाडूसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 250 ग्रॅम बेसन.
2) अर्धा किलो साखर.
3) 250 ग्रॅम तूप.
4) 50 ग्रॅम पिस्ता बदाम.
5) थोडी इलायची.
6) खाण्याचा केशरी रंग.

पाककृती :

  • खांडवी रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम बदाम पिस्त्याचे बारीक तुकडे तयार करून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी एका प्लेटमध्ये ठेवा.
  • नंतर गॅसवरती एक खोल तळाचे भांडे ठेऊन त्यात 2 कप पाणी टाका, त्यामध्ये आवश्यक तेवढी साखर टाकून.
  • पाक तयार करा, पाकाचे तार तुटतील असा घट्ट पाक तयार करा, नंतर यामध्ये थोडा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर पाक तयार झाला की, खाली काढून थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • आता एका खोलगट भांड्यात बेसन घ्या. त्यामध्ये थोडे-थोडे पाणी टाकून, मिश्रण तयार करा.
  • मिश्रण जास्त घट्ट पण नाही, आणि जास्त पातळ पण नाही, बेसनाचे मध्यम पातळ मिश्रण तयार करा.
  • नंतर गॅस वरती कढई ठेवा, त्यामध्ये आवश्यक तेवढे तूप टाकून गरम करा, तूप गरम झाले की.
  • एका बारीक चाळणीच्या साहाय्याने बुंदी काढा, आणि चांगल्या प्रकारे तळून घ्या.
  • बुंदी थोडी लालसर आणि थोडी फुगेल अशा प्रकारे सर्व बुंदी तळून घ्या.
  • बुंदी तयार झाली की पाकात टाका, आणि त्यामध्ये बारीक इलायची पावडर, बदाम, पिस्ताचे तुकडे टाका.
  • आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्या, बुंदी त्यातील पाक शोसेल आणि घट्ट मिश्रण तयार होणार.
  • हे मिश्रण थोडा वेळाने थंड झाले की, बुंदीचे लहान-लहान लाडू तयार करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये ठेवा.
  • आपण लाडूवर थोडे तरबुस बिया, आणि काजू-बदामचे तुकडे टाकून सजवू शकतो.
  • आता आपले स्वादिष्ट आणि चवदार मोतीचुर लाडू खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका छोट्या वाटीत मोतीचुर लाडू घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

मोतीचुर लाडूमध्ये असणारे घटक :

मोतीचुर लाडू हे विविध पौष्टिक पदार्थ पासून बनवले जातात. यामुळे यामध्ये विविध पौष्टिक घटक आहेत, जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन, चरबी, फॅट, शुगर, कर्बोदके, प्रथिने, मॅग्निशियॅम, कॅलरी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

मोतीचुर लाडू सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने यासारखे पौष्टिक घटक मिळतात.

यामुळे आपल्याला हृदय विकार होत नाही, आणि आपले शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, चरबी, कर्बोदके फॅट हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात, आणि शरीरावर चरबीचे प्रमाण वाढवतात.

तोटे :

मोतीचुर लाडू आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले, तर आपण आजारी पडू शकतो.

मोतीचुर लाडू हा एक तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

म्हणून मोतीचुर लाडू आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहु.

तर मित्रांनो, तुम्हाला मोतीचुर लाडू रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment