मूंग डाळ मराठी Mung Dal Recipe In Marathi मूंग डाळ तडका ही रेसिपी मूळ डाळ पासून बनवली जाते, ही चवीला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार आहेत. मूंग डाळ हा एक पौष्टिक आहार आहे, आणि शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. भारतात विविध ठिकाणी मूंग डाळ वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते, आणि मूंग डाळ पासून वेग-वेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट मूंग डाळ खायाला मिळते. काही लोकांना मूंग डाळ खूप आवडते, पण त्याचा परिसरात चवदार मूंग डाळ मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मूंग डाळ कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण मूंग डाळ तडका रेसिपी पाहणार आहोत.
मूंग डाळ मराठी Mung Dal Recipe In Marathi
मूंग डाळचे प्रकार :
मूंग डाळ एकदम स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे, मूंग डाळ वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते. जसे मसला मूंग डाळ, पालक मूंग डाळ, मूंग डाळ तडका, मूंग डाळ कचोरी, मूंग डाळ शिरा, मूंग डाळ भजे, मूंग डाळ हलवा, मूंग डाळ डोसा हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मूंग डाळ रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
मूंग डाळच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
मूंग डाळ तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मूंग डाळ कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मूंग डाळ बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावी लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
मूंग डाळसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 वाट्या मूंग डाळ.
2) 1 टोमॅटो.
3) 3 ते 4 हिरवी मिरची.
4) 2 चमचे तूप.
5) 3 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
6) थोडा कढीपत्ता.
7) 1 चमच हळद.
8) 1 चमच मोहरी.
9) अर्धा चमच मसाला.
पाककृती :
- सर्वात प्रथम मूंग डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन घ्या, नंतर एका प्लेटमध्ये काढा.
- नंतर टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या, आता गॅस चालू करा.
- आणि गॅस वरती कुकर ठेऊन त्यामध्ये मूंग डाळ, बारीक टोमॅटो, थोडी हळद आणि आवश्यक तेवढे पाणी टाकून झाकण बंद करा.
- नंतर 2 ते 3 शिट्या होये पर्यत मूंग डाळ आणि टोमॅटो चांगली शिजवू द्या, नंतर मूंग डाळ खाली काढून घ्या.
- मूंग डाळ थोडी थंड होऊ द्या, नंतर डाळ चांगली मॅश करा, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, प्रथम यामध्ये मोहरी टाका, आणि चांगली तळ-तळ होऊ द्या.
- नंतर यामध्ये लसन अद्रक-पेस्ट टाका, आणि चांगला भाजून घ्या, पेस्ट थोडा लालसर होय द्या.
- नंतर यामध्ये बारीक मिरची आणि कढीपत्ता घाला, आणि चांगले मिक्स करा.
- नंतर यामध्ये थोडी हळद, आणि मसाला टाका, आणि 1 मिनिट चांगला होऊ द्या.
- मसाल्याचा छान सुगंधित वास येणार, नंतर यामध्ये आपण मॅश केलेली मूंग डाळ टाका.
- यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाका, आणि चवीनुसार थोडे मीठ टाका, आणि एक उकडी येऊ द्या.
- मूंग डाळला चांगली उकडी आली की, यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका, आणि गॅस बंद करून मूंग डाळ खाली काढा.
- आता आपली स्वादिष्ट आणि चवदार डाळ तडका खाण्यासाठी तयार आहे. आपण पोळी किंवा पुरी सोबत मूंग डाळ खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
मूंग डाळमध्ये असणारे घटक :
मूंग डाळ ही एक पौष्टिक रेसिपी आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन बी, लोह, चरबी, मॅग्निशियॅम, कर्बोदके, फायबर हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
मूंग डाळ हे एक कडधान्य आहे, यामध्ये विविध पौष्टिक घटक आहे. जसे व्हिटॅमिन, मॅग्निशियॅम, कॅल्शियम आहेत.
यामुळे आपली रक्तभिसरण शक्ति चांगली राहते, आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
यामध्ये असणारे चरबी, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस यामुळे आपले हाड मजबूत राहतात.
मूंग डाळमधील सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत, यामुळे आपण निरोगी राहतो.
तोटे :
मूंग डाळ आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक, आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.
म्हणून मूंग डाळ आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला मूंग डाळ रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.