माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi

My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi मराठी साहित्याबद्दल बोलायचे झाले तर या अथांग सागररुपी खजिन्यातले त्यामधील काही अमूल्य असे न ओळखीलचे मोती पाहण्याचे न्याहाळण्याचे व अनुभवण्याचे सौभाग्य लाभले होते . त्यातील एक मला सर्वात प्रिय कवी असे कविश्रेष्ठ म्हणजे कुसुमाग्रज आहेत.

My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi

माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध My Favourite Poet Kusumagraj Essay in Marath

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी होते; शिरवाडकर यांचा जन्म सन २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला होता  कुसुमाग्रज  यांचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले.

कवी कुसुमाग्रज यांचे १ ते ५ पर्यंतचे शिक्षण हे पिंपळगाव येथे झाले आहे. यानंतर १० पर्यंतचे शिक्षणासाठी ते नाशिकला गेले त्याठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधून आपल माध्यमिक शिक्षण पूर्ण केल. त्याचप्रमाणे त्यांनी नाटककार, ललित निबंधकार, कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते.

पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्ष्यात येते. त्यांच्यातला कवीच मग ‘नटसम्राट’ नाटकातील बेलवलकर असो, तर ‘कौन्तेया’तील कर्ण असो वा ‘स्वप्नांचा सौदागर’ या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो.

ह्या सर्वांमधून कुसुमाग्रजांचा काव्यात्मकपणा लपून राहू शकला नाही.मुंबई विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच सन १९३० साली कवीने शालेय शिक्षण घेत असतांना ‘रत्नाकर’ नावाच्या पुस्तकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली आहे.

आपले बी. ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी  सन १९३४ ते १९३६ या कार्यकाळात चित्रपट व्याव्यसायात काम केलं. ह्यांनी नाशिक येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकाचे संपादन केले राज्यात सुरु असलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनांत त्यांनी सहभाग घेवून त्यांनी सत्याग्रह केला होता.

त्यांच्या कुटुंबामध्ये सहा भाऊ आणि एक बहिण असल्याने बहिण ही सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांनी अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले आहे. तेंव्हापासून त्यांची ओळख कुसुमाग्रज म्हणून पडली. सन १९३० साली झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये त्यांनीदेखील सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी स्वभावापासून कवितांची खरी सुरुवात झाली असे म्हणतात.

हा  कवी समाजसुधारक देखील होते. त्यांनी दलितांच्यासाठी अनेक लिखाण केलं आहे. १९३३ मध्ये त्यांनी ‘ध्रुव मंडळ’ ची स्थापना केली होती. तसचं, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. कुसुमाग्रज यांचा लिखाण खरी सुरुवात मुंबई येथील मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. अ.ना. भालेराव यान भेटल्यानंतर झाली.

संपूर्ण महाराष्ट्र कवी म्हणून ओळख लिहू लागले. ‘जीवनलहरी’ हे हा त्याचा  पहिला लहानसा कवितासंग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘छंदोमयी’ अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना आस्वाद दिला आहे.

२७ फेब्रुवारी १९१२ ला कुसुमाग्रज  ३० वर्षांच्या वयातच म्हणजे १९४२ साली त्यांच्या “विशाखा” या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रसिद्धीचा सूर्योदय पाहू शकले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात त्यांच्या लेखनाला एक क्रांतीची विलक्षण धारच होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कुसुमाग्रजांच्या कवितांची खासियत म्हणजे त्याचा कविता हि श्रेष्ठ टीकाकारांना आवडली, सामान्य रसिकांची मनेही जिकंलेली आहेत. स्वतःच्या कवितांमध्ये कुसुमाग्रज म्हणतात कि,  –

‘समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.’

या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते.  त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही दिसून येतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी त्या गोष्टी साठी संघर्ष जसा आगगाडी आणि त्याच्याखालची जमीन यांचा समोरासमोर प्रत्यय येतो तसाच कधी सागर व बेट कोलंबस यामधला प्रत्यय हा येतो.

कुसुमाग्रजांच्या अशा प्रतिभाशक्तीचा अजोड अशा कल्पनेची जोड लाभली आहे. मग ती कधीतरी  ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गावे लागते; तर कधी ‘अहि-नकुलाच्या’ रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मंडल जातो. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्य टिळकांचा पुतळl सान्निध्यात त्यांचे मन म्हणते की , “ते होते जीवित अन् हा जीवितभास.’ कवीच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लाभलेला होता.

‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे काव्य त्यांनी त्यांच्या लेखणीतून उतरले. “कणा” ही गाजलेली कविता मार्मिक आणि माणुसकी स्पर्श देऊन जाणारी आहे.  “पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा … प्रेम कर भिल्लासारखं” हे लेखन हे त्यांच्या काव्याचे बहुरंगी अंग असे म्हणता येईल. “उठा उठा चिऊताई” सारखी लहानच पण गोड कविता केवळ कुसुमाग्रज करू जाणे.

ह्या महान कवीचे १८ काव्य-संग्रह सुप्रसिध्द आहेत तसेच १५ लघुकथा संग्रह, १७ नाटके, ३ कादंबऱ्या, “मेघदूत” या कालिदासांच्या मूळ संस्कृत आणि शेक्सपिअरच्या “मॅकबेथ” व “ऑथेल्लो” ह्या गाजलेल्या लिखाणाचे मराठी अनुवाद संवाद हा साहित्यसाठा त्यांच्या नावाने प्रसिध्द आहे.

आवडते थोर कवी म्हणताना त्यामागचे आणखीन एक कारण सांगावेसे वाटते ते म्हणजे कुसुमाग्रज हे एक संपूर्ण व अष्टपैलू लेखक होते. त्यांनी कित्येक नाटके लिहिली, लघुकथाही लिहिल्या. नटसम्राट हे त्याचे लिहिलेले नाटक प्रसिद्ध झाले होते.  १९७४ साली मराठी साहित्य अकादमी पुरस्कार व नंतर १९८७ साली सर्वोच्च “ज्ञानपीठ पुरस्कार” व असे खूपच पुरस्कार व गौरव महान व्यक्ती ला मिळाले आहेत.

२७ फेब्रुवारी हा  “जागतिक मराठी भाषा दिवस ” म्हणून पाळला जात आहे. असा हा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेता कवी १० मार्च, १९९९ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक असा ओळखला जाईल.   नाशिक मध्ये कुसुमाग्रज ह्याचे  प्रतिष्ठान हे साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्याच्या  निवासस्थानी स्थापित झालेले आहे. अश्या या परमप्रतिभावंत मराठी कवीश्रेष्ठास शतकोटी प्रणाम!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment