मैसूर पाक मराठी Mysour Pak Recipe in Marathi मैसूर पाक हा पदार्थ बेसन, साखर, आणि तूप पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे, मैसूर पाक हा पदार्थ कर्नाटक मधील सर्वात प्रसिध्द आणि लोकप्रिय पदार्थ आहे. याचा उपयोग मिष्ठान्न म्हणून केला जातो. भारतात विविध ठिकाणी मैसूर पाक हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, मैसूर पाक हा एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
आपण हॉटेल किंवा बेकरी वरती पाहीले असेल किती स्वादिष्ट आणि गोड मैसूर पाक खायाला मिळतो. काही लोकांना मैसूर पाक खूप आवडतो. पण त्याचा परिसरात चवदार मैसूर पाक मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने मैसूर पाक कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण मैसूर पाक रेसिपी पाहणार आहोत.
मैसूर पाक मराठी Mysour Pak Recipe in Marathi
मैसूर पाकचे प्रकार :
मैसूर पाक हा एक गोड आणि चवदार पदार्थ आहे, मैसूर पाक हा वेग-वेगळ्या प्रकारे बेसन पासून बनवला जातो. याचे कोणतेच प्रकार पडत नाही, आपण बेसना पासून मैसूर पाक, बेसन बडी, बेसन लाडू, बुंदी असे स्वादिष्ट पदार्थ बनवू शकतो.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मैसूर पाक रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
मैसूर पाकच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
मैसूर पाक बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर मैसूर पाक बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मैसूर पाक कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मैसूर पाक तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावा लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
मैसूर पाकसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 3 वाट्या बेसन/ चना डाळ पीठ.
2) 200 ग्रॅम साखर.
3) 200 ग्रॅम तूप.
4) 1 चमच बेकिंग पावडर.
5) आवश्यक पाणी.
पाककृती :
- पापलेट फ्राय रेसिपी
- सर्वात प्रथम बेसन चांगल्या प्रकारे चालून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- नंतर एक खोल तळाचे भांडे घ्या, ते गॅसवर ठेऊन त्यामध्ये साखर आणि 2 कप पाणी टाका.
- आणि मध्यम आसेवर याचा पाक तयार करा, हे मिश्रण चांगले ढवळत रहा, यातील साखर पूर्ण विरघळली पाहिजे.
- पाकाचे तार तुटतील तेवढा घट्ट पाक तयार करा, नंतर यामध्ये आपण चाळलेल पीठ टाका.
- आणि चांगले मिक्स करून घ्या, पाक पिठात चांगला मिक्स करून घ्या.
- गॅसवर दुसऱ्या बाजूने तूप गरम करा, तूप गरम झाले की मिश्रणात टाकून घ्या, आणि मिक्स करून घ्या.
- तूप पिठात चांगले मिसळून घ्या, 3 ते 4 वेळा पीठ चांगले मिक्स करून घ्या, आणि सतत ढवळत रहा.
- नंतर यामध्ये बेकिंग सोडा टाका, आणि व्यवस्थित मिक्स करा, मिश्रण पूर्ण घट्ट होये पर्यत चांगले शिजवा.
- मिश्रण पूर्ण घट्ट झाले की, एका खोल तळाच्या प्लेटला थोडे तूप लावा.
- आणि या प्लेटमध्ये पूर्ण मिश्रण टाका, आणि त्याला व्यवस्थित सपाट पसरून घ्या.
- थोडा वेळाने मैसूरचे मिश्रण थंड झाले की, चाकूने लहान-लहान वड्या तयार करा.
- आता आपला स्वादिष्ट आणि गोड मैसूर पाक खाण्यासाठी तयार आहे, आपण एका छोट्या वाटीत घेऊन मैसूर पाक खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
मैसूर पाकमध्ये असणारे घटक :
मैसूर पाक हा एक गोड आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, हा तूप, बेसन पासून बनवला जातो. यामुळे यामध्ये विविध घटक असतात. जसे कॅल्शियम, प्रोटीन, शुगर, पोटॅशियम, लोह, चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
मैसूर पाक खाल्ल्याने आपल्याला फॅट, चरबी, प्रोटीन सारखे घटक मिळतात, यामुळे आपल्या शरीराची वाढ होते.
यामध्ये असणारे घटक कॅल्शियम, व्हिटॅमिन, कॅलरी, आपले शरीर निरोगी ठेवते, व अशक्तपणा दूर करते.
मैसूर पाकमध्ये असणारे सर्व पौष्टिक घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
मैसूर पाक आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
मैसूर पाक हा एक तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ किंवा डोकेदुखी होऊ शकते.
म्हणून मैसूर पाक आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला मैसूर पाक रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.