नदीचे आत्मवृत मराठी निबंध | Nadiche Atmavrutta Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण नदीचे आत्मवृत्त म्हणजेच nadiche atmavrutta essay in marathi बद्दल जाणून घेणार आहोत .

नदीचे आत्मवृत मराठी निबंध | Nadiche Atmavrutta Essay In Marathi

नदीचे आत्मवृत मराठी निबंध | Nadiche Atmavrutta Essay In Marathi

गेल्या लॉक डाऊन मध्ये आम्ही फिरायला गेलो होतो तिथे पहाडावर हिरवळ पसरली होती. खुल्या आकाशात व मोकळे हवेमध्ये मन फार रमले होतं पूर्ण आयुष्याची मजा त्यादिवशी आली होती. पहाडावरून खाली उतरून थोड्या दूर अंतरावर चालत गेल्यावर तिथे भल मोठ डबकं साचलेल होत आणि थोडी दुर्गंधी पसरली होती. त्या ठिकाणी मी नाक मुरडून तेथून निघणारच तर लगेच माझ्या कानावर काही शब्द पडले “कुठे निघालास ! असे नाक मुरडून. मला भेटणार नाहीस?” मी आवाजाच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागलो. तोच पुढील शब्द माझ्या कानावर पडले “अरे इकडे तिकडे कुठे बघतो आहेस, मी नदी बोलते आहे ! हे भलं मोठं साचलेल डबकं ! दुसरे तिसरे काही नसून मी नदी आहे, मी नदीच बोलतेयं !”

मी अवाक नजरेने त्या डबक्याकडे थोडे पुढे सरसावून पाहू लागलो तर परत आवाज आला, “अरे काय बघतोस ‘मी तीच नदी आहे’. जी काही वर्षांत खळखळ वाहत होती, पर्वतरांगांमधून खळखळ व निर्मळ धावणारी मी आता अगदी बेरंग झाले आहे. अशा या माझ्या परिस्थितीमागे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्यासारख्याच मानवाचाच हात आहे.”

एकेकाळी मी हिमालयाच्या पर्वतरांगामधून कुठेही न थांबता संथपणे वाहत असायची. तसेच कुठेही न थांबता आणि कुठेही आश्रय न घेता सरळ सागराला जाऊन मिळायची. माझ्या या संथपणे वाहणाऱ्या स्वभावालाच तुम्ही “चंचल” असे म्हणता ना. दऱ्या-खोऱ्यातून वाहणारी मी नदी आता एक अस्वच्छ डबकं होऊन बसलं आहे.

कधीकाळी तुम्ही मानवत माझ्या गोड पाण्याचा आस्वाद घ्यायचे. माझ्या या खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आस्वाद घेऊन जेव्हा तुम्ही तृप्त होत असे तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. इतकेच नव्हे तर माझ्या पाण्यामध्ये आश्रय देणाऱ्या अनेक प्रकारच्या माश्याना तुम्ही तुमचे खाद्य बनवत. तेव्हा मी तुम्हाला वेळोवेळी उपयोगी पडत असे. याचा मला फार अभिमान वाटायचा.

पण तुम्ही बघताय आता माझी स्थिती फार दयनीय झाली आहे. तुमच्यासारखेच अनेक मित्र, परिवार माझ्या अवतीभोवती सहल करायला यायचे. खूप मौज-मजा करायचे आणि त्यांच्या जवळ असलेला कचरा सर्व नदीमधील आणून टाकायचे. आज तुम्हीच लोकं मला पाहून नाक मुरडतात.

लोकांना, तुम्हां मानवाला काय दिले नाही, अगदी सुरुवातीच्या काळात मानव शेतीसाठी पाण्याचा उपयोग करण्यासाठी माझ्या आश्रय बघूनच माझ्याकाठी राहू लागला. माझ्या अवती-भवती वस्ती करु लागला व माझ्या मध्ये राहणाऱ्या जीव, माशांचा उपयोग स्वतःच्या आहारात तसेच उदरनिर्वाहासाठी करू लागला. पण जसा जसा मानव विकसित झाला तसा तसा त्याला माझ्या उपकाराची जाणीवच राहिली नाहीये आणि तो माझ्या जीवावर उठला आहे.

मनुष्याला आपल्या बुद्धीचा खूपच अभिमान झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण, तसेच अनेक प्रकल्प वगैरे केले जातात पण तेच प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपभोग घेऊ दिला तर जलचर, मासे तरी सुखाने जगतील पण पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी माझ्या पात्राचे व पाण्याचे प्रदूषण आज हा मानव करत आहे. गणपती विसर्जनासाठी आल्यावर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहामध्ये सोडून मला दूषित करता. कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकतात. खरं तर मला तुम्ही सर्वचजण खूपच पवित्र मानता पण तुम्हीच माझ्या ह्या पवित्रपणाला डाग लावत आहात.

पण हो मात्र एक आहे पर्वतरांगांमधून वाहतांना माझा मार्ग हा अजूनही जंगलातूनच निघतो. तिथे आजही मी निर्मळ खळखळ शांतपणे वाहतच आहे. तेथील प्राणी आजही माझ्या गोड आणि स्वच्छ पाण्याचा आस्वाद घेऊन तृप्त होत आहेत. मुक्या जनावरांच्या सरहद्दीत आजही निवांतपणे वाहत आहे. मानव विकासाच्या शिखरावर असतानाही माझी ही स्थिती बघून मला फार वाईट वाटते.

तुमच्या या नवीन पिढीने यातून काहीतरी बोध घ्यावा अन योग्य त्या उपाययोजना कराव्यात म्हणून माझी ही एक धडपड. माझी तुमच्याकडे एवढीच एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझा छळ करू नका! मला निवांत संथपणे वाहू द्या. अखंड दूर-दूर मला वाहू द्या. सांग ना ! करशील ना माझं स्वप्न पूर्ण?

एवढे बोलून नदीने आपले बोलणे थांबवले अन मी शुद्धीवर आलो एवढं मोठं डबकं एकेकाळी सतत वाहणारी नदी आहे. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण नदीचा संवाद एकूण आम्ही भानावर आलो. आता आम्ही या नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारला विनंती करणार आणि या सरितेला नदीला स्वच्छ करणार तिचे स्वप्न पूर्ण करणार ! हे ठरवूनच आम्ही तिचा निरोप घेतला.

तर हा होता मी मी नदी बोलतेय मराठी निबंध तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर खाली आपला अभिप्राय नक्की कळवा, आणि आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करायला विसरू नका, म्हणजेच त्यांना सुद्धा मदत होईल.

नक्की वाचा – wrestling essay in marathi

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण नदीचे आत्मवृत्त म्हणजेच nadiche atmavrutta essay in marathi बद्दल जाणून घेतले .

Leave a Comment