Nagpur Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण ऑरेंजसिटी अर्थात संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हा विषयी माहिती पाहणार आहोत.नागपुर हे शहर भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे सर्वात मोठे शहर म्हणुन ओळखले जाते.
नागपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nagpur Information In Marathi
भारतातील दुस.या क्रमांकाचे हरित शहर म्हणुन देखील या शहरानं गौरव मिळवलेला आहे.वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागपुर लवकरच महानगरांमधे गणल्या जाईल.
नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते.
भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत.
नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.२००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चेत आहे.
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे * नागपूर येथील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली.
नागपूरचे नामकरण
शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं.देवगड चे गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते.
नागपूरचा इतिहास
नागपूर शहराची स्थापना देवगड (छिंदवाडा) येथे गोंड वंशाच्या राजाने केली. संत्र्यांची राजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे महाराष्ट्राचे तिसरे मोठे शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शहरांपैकी एक आहे. येथे बांधलेली अनेक मंदिरे, ऐतिहासिक इमारती आणि तलाव येथे येणाऱ्या पर्यटकांच्या केंद्रस्थानी आहेत.
या शहरातून वाहणाऱ्या नाग नदीमुळे नागपूरला हे नाव मिळाले. नागपूरची स्थापना 1703 मध्ये देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शाह याने केली. 1960 पर्यंत हे शहर मध्य भारताच्या राज्याची राजधानी होती. 1960 नंतर येथील मराठी लोकसंख्या लक्षात घेता, महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून याचा समावेश करण्यात आला. 9,890 चौरस किमी क्षेत्रामध्ये पसरलेल्या या जिल्ह्यात 13 तहसील आणि 1969 गावांचा समावेश आहे.
या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली.
पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते.
पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.
भूगोल
नागपूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग छीदवाडा आणि मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्याने व्यापलेला आहे आणि पूर्वेला भंडारा जिल्हा आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडे अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आहे. तर, वायव्येचा काही भाग अमरावती जिल्ह्याने व्यापलेला आहे. नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आणि मावननिर्मित तलाव आहेत.
यात अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा आहे. अन्य नैसर्गिक तलावांमध्ये गोरेवाडा आणि तेलंगखेडी तलावाचा समावेश आहे. सोनेगाव आणि गांधीसागर हे तलाव मनुष्यनिर्मित असून, शहरातील ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी त्यांची निर्मिती केली आहे.
नाग नदी, पिली नदी आणि काही नाले हे शहराकरिता सांडपाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग आहेत. हिरवेगार शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. छत्तीसगडनंतर भारतातील दुसरे सर्वाधिक हिरवेगार आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरला मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर शहर हे नैसर्गिक संसाधनांनंी समृद्ध आहे. कृषी क्षेत्रासोबतच सोयाबिन, जवार आणि खनीज संपत्तीचे विपूल साठे या जिल्ह्यात आहेत. सागवन आणि गवताचे सर्वात मोठे उत्पादन नागपूर जिल्ह्यात होत असते. याशिवाय, मँगनिजचे मोठे साठेही या जिल्ह्यात आहेत.
कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले.
काहींच्या मते, जुन्या नागपूरमधून नागनदी वाहात असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे, तालुका आणि गावांच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे, त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले. याच अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेच्या सिम्बॉलवर नाग दाखविण्यात आला आहे.
नद्या व धरणे
नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे.
कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत येउन पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला मिळते. तिला लागूनच मौदा हे अतिशय महत्वाचा तालुका आहे, तसेच माथणी हे महत्वाचे गाव आहे.
नागपूर जिल्ह्यात ५१ छोटे प्रकल्प असून, त्यामध्ये पेंच नदीवरील पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत. या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे.
एकुण 14 तालुके या जिल्हयात आहेत ती पुढील प्रमाणे:-
काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.
नागपूर जिल्ह्यात
- पंचायत समित्या १४,
- महानगरपालिका ०१ =नागपूर महानगरपालिका,
- नगरपालिका १२,
- नगरपचायती ०६ =हिंगणा, मौदा, भिवापूर, कुही, महादुला पारशिवनी,
- ग्रामपंचायत ७७० अशी राजकीय रचना आहे.
लोकसंख्या
नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 42,53,570 एवढी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,892 वर्ग किलोमीटर आहे .लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 948 इतके आहे. नमस्कार मित्रांनो ,आज आपण ऑरेंजसिटी अर्थात संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हा विषयी माहिती पाहणार आहोत.नागपुर हे शहर भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे सर्वात मोठे शहर म्हणुन ओळखले जाते.
भारतातील दुस.या क्रमांकाचे हरित शहर म्हणुन देखील या शहरानं गौरव मिळवलेला आहे.
वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागपुर लवकरच महानगरांमधे गणल्या जाईल.
नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते.
भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत.
नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.२००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चेत आहे.
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे * नागपूर येथील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली.
नागपूरचे नामकरण
शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं.
देवगड चे गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते.
नागपूरचा इतिहास
नागपूर शहराची स्थापना देवगड (छिंदवाडा) येथे गोंड वंशाच्या राजाने केली. संत्र्यांची राजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे महाराष्ट्राचे तिसरे मोठे शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शहरांपैकी एक आहे. येथे बांधलेली अनेक मंदिरे, ऐतिहासिक इमारती आणि तलाव येथे येणाऱ्या पर्यटकांच्या केंद्रस्थानी आहेत.
या शहरातून वाहणाऱ्या नाग नदीमुळे नागपूरला हे नाव मिळाले. नागपूरची स्थापना 1703 मध्ये देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शाह याने केली.
1960 पर्यंत हे शहर मध्य भारताच्या राज्याची राजधानी होती. 1960 नंतर येथील मराठी लोकसंख्या लक्षात घेता, महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून याचा समावेश करण्यात आला. 9,890 चौरस किमी क्षेत्रामध्ये पसरलेल्या या जिल्ह्यात 13 तहसील आणि 1969 गावांचा समावेश आहे.
या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली.
पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते.
पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.
भाषा
मुख्य मातृभाषा मराठी असुन हिंदी देखील मोठया प्रमाणात बोलली जाते.
हवामान
सरासरी पर्जन्यमान 1205 मि.मि. उन्हाळा जास्त प्रमाणात असुन मे महिन्यात तापमान 45 अंशाला पार करते. हिवाळा हा ऋतु सुखावह असला तरी कधी कधी तापमान 10 सेल्सियसच्या खाली उतरते.
बंगालचा उपसागर आणि अरेबिअन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराचे हवामान आर्द्र आणि कोरडे आहे. या शहरात वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात 1205 मिमी इतका पाऊस पडत असतो.
14 जुलै 1994 रोजी या शहरात एकाच दिवशी 304 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या काळात उनही तितकेच तापत असते. मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते.
नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ हिवाळ्याचा असतो. हिवाळ्यात 10 अंशपर्यंत तापमान खाली येत असते. 29 मे 2012 रोजी या शहरात 48.6 अंश सेल्सिअस इतक्या महत्तम तापमानाची आणि 1937 मध्ये 3.9 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.
नागपूर जिल्ह्यात सरासरी 1064.1 मिमी इतका सरासरी पाऊस पडत असतो. उमरेड, कुही आणि भिवापूर तहसिलीत सर्वाधिक पाऊस होतो, तर जिल्ह्यातील अन्य तहसिलींच्या तुलनेत काटोल आणि नरखेड तहसिलींमध्ये कमी पाऊस होतो.
मृदा
जिल्ह्यात मुख्यत्वे मध्यम-काळी कपाशीची जमीन असून मोरांड-हलकी, पिंगट रंगाची खरडी-वाळूमिश्रित करड्या रंगाची बरडी-लालसर, रेताड व दगडगोट्यांची या मृदा आहेत. सावनेर, वर्धाखोरे व नागपूर, कामठी मैदान या भागांत काळी माती आहे.
जिल्ह्यातील मोरांड माती कापूस आणि ज्वारीच्या पिकाला सोयीस्कर असून ती बहुतेक सर्व तालुक्यांत आढळते. रामटेक तालुक्याच्या उत्तर भागात व सुर नदीच्या खोऱ्यात तिचा रंग बराच हलका आढळतो. जिल्ह्याच्या पूर्व भागात भातशेतीची जमीन म्हणजे खरडी, तर बरडी ही डोंगरमाथ्यावर व उतारांवर आणि विशेषतः काटोल तालुक्यात आहे.
खनिज संपत्ती
नागपूर जिल्ह्यात मँगनीजच्या खाणी मोठ्या प्रमाणात असून, त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागांत संगमरवर, चुनखडी, लोह खनिज, डोलोमाइट, टंगस्टन आणि दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
खनिज संपत्तीच्या दृष्टीने नागपूर जिल्हा समृद्ध आहे. बोखारा (गोधनी), कामठी व उमरेड येथे दगडी कोळसा रामडोंगरी, कोदेगव्हाण, मनसर, कांद्री, खापा, गुमगाव, पारशिवनी येथे मंगल कोराडी येथे अभ्रक भिवापूर येथे लोखंड कांद्री, पटगौरी, देवलापार येथे चुनखडी चोरखैरी, खैरी, खापरी, बाजारगाव येथे चिकण माती यांखेरीज फेल्स्पार, गारगोटी, टंगस्टन, अँटिमनी वगैरे खनिजेही मिळतात.
प्रमुख पिके
संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते.
शेती हा प्रमुख व्यवसाय असून १९७३–७४ मध्ये एकूण जमिनीपैकी ५५% जमीन लागवडीखाली होती. जिल्ह्यातील सु. ६,८९,३०० (३५·५%) कामकऱ्यांपैकी ३,४५,३०० (५२·२%) लोक शेतीव्यवसायात असून १,५१,००० (२१·९%) शेतकरी व १,९४,३०० (२८·२%) शेतमजूर आहेत.
ज्वारी सर्व तालुक्यांत होते, पण प्रामुख्याने काटोल, सावनेर व नागपूर तालुक्यांत होते, गहू-रामटेक, नागपूर व उमरेड तालुक्यांत कापूस–काटोल, सावनेर, नागपूर तालुक्यांत धान-रामटेक व उमरेड येथे होते. ज्वारी, तूर, कापूस, भुईमूग व धान ही खरीप पिके आहेत तर गहू, हरभरा, जवस, वाटाणा ही रब्बी पिके आहेत.
जिल्ह्यातील फळबागाही प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध नागपुरी संत्री ही कोहळी, मोहपा, काटोल, कळमेश्वर, उबाळी, कोंढाळी, सावनेर, नरखेड येथून येतात. काटोल, सावनेर, धापेवाडा, कुही येथील आंबे प्रसिद्ध आहेत.
यांशिवाय बिना व कोराडी येथे सीताफळे आणि बोरे अरोली व कोदामेंढी येथे सोनकेळी धामणा येथे द्राक्षे थारसा येथे ऊस होतो. विड्याच्या पानांचे तांडे (मळे) रामटेक, नरखेड, पारशिवनी, मोवाड इ. ठिकाणी आहेत.
ओलिताखाली मुख्यत्वे तांदूळ, गहू, संत्री, कडधान्ये, मिरच्या इ. पिके होतात.
पोशाख
जाडेभरडे धोतर, सदरा, फेटा किंवा टोपी हा पुरुषांचा वेष, तर लुगडे-चोळी हा स्त्रियांचा वेष असतो. शहर व गावातील फरक यात जमेस धरलेला नाही.
मुख्य अन्न
लोकांचे मुख्य अन्न ज्वारीची भाकरी, तुरीच्या डाळीचे वरण आणि रुचीसाठी हिरव्या मिरच्यांची किंवा लसणाची चटणी, कांदा व तेल हे आहे.
वनस्पती व प्राणी
जिल्ह्यातील १८·५% क्षेत्र जंगलव्याप्त आहे. जंगलांचे मुख्यतः दोन विभाग आहेत. रामटेक तालुक्यात पेंच नदीच्या पूर्व व पश्चिम बांजूस, सातपुड्याच्या पायथ्याकडील भागात एक आणि तुटकतुटक तुकड्यांनी बनलेला काटोलपासून उमरेडपर्यंत पसरलेला दुसरा.
सावनेर व रामटेक तालुक्यांत दाट जंगले आहेत, तर काटोल व उमरेड तालुक्यांत विरळ आहेत. त्या भागांत गवती कुरणेही आहेत. जिल्ह्यातील जंगलात साग, ऐन, शिसव, सालई, बाभूळ, धावडा, खैर, बोर, बांबू, पळस, मोह, टेंबुर्णी, बेल इ. वनस्पती आहेत.
रामटेक तालुक्यातील साग उधई (वाळवी) न लागणारे म्हणून, लाकडी सामानाकरिता उपयोगी हे. सालईच्या लाकडाची खोकी संत्री रवाना करण्यासाठी वापरतात. रंग, लाख, चारोळी, डिंक, मध, गुंजा वगैरे वस्तू व जळाऊ लाकूड आणि कोळसा, जंगलातील वनस्पतींपासून मिळतो. टेंबुर्णीची पाने विड्यांसाठी उपयोगी पडतात.
जिल्ह्यातील तलावांत अनेक प्रकारचे मासे मिळतात. काही ठिकाणी मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. जंगलात वाघ, चित्ता, तरस, अस्वल, बारशिंगा, चितळ, सांबर, काळवीट, चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, साळिंदर इ. वन्यपशू, अनेक प्रकारचे पक्षी व सर्प आहेत. वन्यप्राणिसंरक्षणासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे.
उद्योग व व्यवसाय
या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे.
नागपूर जिल्ह्यात अनेक लहानमोठे उद्योगधंदे चालतात. नागपूर (लगुडी व खण), उमरेड (जरीकाठी धोतरे, उपरणी) या दोन प्रमुख हातमाग केंद्रांशिवाय कामठी, जलालखेडा, मौदा, सावनेर, भिवापूर, धापेवाडा, खापा येथे हातमागावर कापड विणतात. नागपूर, खापा, जलालखेडा, कामठी येथे यंत्रमागही आहेत.
नागपूर, कामठी, खात, कोदामेंढी येथे विडीउद्योग नागपुर, कामठी, उमरेड, नरखेड येथे तेलघाणी बिना, कामठी, मनसर, कुही, उमरेड, खापरखेडा येथे विटा व कौले नागपूर, सावनेर, काटोल, केलोद, नरखेड, कोंढाळी येथे कापूस पिंजून गठ्ठे बांधण्याचे कारखाने असून, नागपूर येथे कापडगिरणी आहे. कन्हान येथे सिमेंटच्या नळांचा कारखाना आहे. यांशिवाय कन्हान येथे मंगल शुद्ध करण्याचा कारखाना उमरेड, मौदा येथे धानाच्या गिरण्या (भात सडण्याच्या गिरण्या) आहेत.
कन्हान येथे चहा डब्यात भरण्याचा व जनावरांच्या हाडांचा चुरा करण्याचा कारखाना कामठीला कागदाची गिरणी नागपूरला साबण, बर्फ, फुगे इ. वस्तू बनविण्याचे व इतर वीस-पंचवीस प्रकारचे लहानमोठे कारखाने आहेत.
जिल्ह्यातील लोकसंख्येपैकी हजारी १५ लोक कारखान्यांत काम करतात. जिल्ह्याची विजेची गरज भागविण्यासाठी खापरखेडा (१२० मेवॉ. तास) आणि कोराडी येथे औष्णिक वीजउत्पादन केंद्रे आहेत.
वाहतूक
राष्ट्रीय महामार्ग : नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह्न६९ आणि नागपूररत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ह्न २०४ गेलेला आहे.
रेल्वे
नागपुराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील रेल्वे स्थानक महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या (विशेषतः मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या महानगरांना जोडणाऱ्या) ते मध्यवर्ती असल्यामुळे येथूनच जातात. नागपूर रेल्वे स्थानकाबरोबरच अजनी, इतवारी, कळ्मना, कामठी व खापरी ही स्थानके शहराच्या जवळ आहेत.
नागपूर स्टेशनात जवळपास १६० रेल्वे गाड्या थांबतात. त्यात प्रवासी, दुरंतो एक्सप्रेस, मेल, राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ ह्यांचा प्रामुख्यानी समावेश आहे. त्यात ६५ गाड्या दररोज धावतात. दररोज जवळपास दीड लाख प्रवासी नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात.
हवाईमार्ग-नागपूरजवळ सोनेगाव विमानतळ असून तेथून देशातील मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास या प्रमुख ठिकाणी प्रवासी व टपाल विमाने जातात-येतात.
नागपूर जिल्ह्यात मार्च २०१९ मधे मेट्रो सेवा सुरु करण्यात आली.
प्रसिद्ध पर्यटन स्थळे
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे * नागपूर येथील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. ,
नागपू येथे ‘अंबाझरीचा तलाव’ व ‘सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला आहे.
नागपूर जिल्ह्यात बोर अभयारण्य (नागपूर व वर्धा जिल्हा मिळून), पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प आहे.
नागपुरातील कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रोन पॅलेस या बौद्ध धम्म मंदिराचे २३ नोव्हेंबर १९९९ ला उद्घाटन झाले. अतिशय सुंदर वास्तू असणारे हे मंदिर ड्रॅगन पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.
केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (नीरी) स्थापना नागपूरमध्ये १९५८ मध्ये करण्यात आली असून, देशपातळीवर कार्य करणाऱ्या या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
रामटेक येथील रामाचे मंदिर आणि संस्कृत विद्यापीठ प्रसिद्ध असून या ठिकाणी वाकाटक कालीन अनेक मंदिरे आहेत. ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत.
या मंदिरांपैकी केवल नृसिंह मंदिरात दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती गुप्त या वाकाटक प्रवरसेनाच्या राणीचा शिलालेख आहे. भारताचा मध्यवर्ती बिंदू झिरो माईल याच शहरात आहे.
तेलंखेडी, अंबाझरी तलाव, बगीचे, महाराज बाग, वस्तुसंग्रहालय, गांधीनगर, वैद्यकीय महाविद्यालय, सीताबर्डीचा किल्ला इ, गोष्टी प्रेक्षणीय आहेत. अदासा, आंभोरा, बेला, धापेवाडा, कोराडी ही गावे मंदिरांसाठी व यात्रांसाठी प्रसिद्ध आहेत.
रामटेक हे डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाण प्रवाशांचे आकर्षणकेंद्र बनलेले आहे. रामटेकजवळ खिंडसी येथे रामसागर हा जलाशय असून तेथील वनशोभा लक्षणीय आहे. रामटेकच्या उत्तरेस देवलापूर हे ठिकाण शिकारीसाठी प्रसिद्ध असून चितळ, हरिण, कोल्हा, ससा, वाघ वगैरे प्राणी या जंगली भागात पाहावयास मिळतात.
याशिवाय कामठी, कळमेश्वर, हिंगणा, जलालखेडा, जुनापाणी, भिवगड, काटोल, केलोद, खापा, मनसर, मोहपा, नगरधन, सावनेर, उमरेड इ. गावे निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.
धन्यवाद!!!