नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nanded Information In Marathi

Nanded Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण नांदेड या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.गोदावरीच्या खो.यात आग्नेय महाराष्ट्रात वसलेला नांदेड जिल्हा!

Nanded Information In Marathi

नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nanded Information In Marathi

नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण पूर्वी लावलेला जिल्हा असून याला लागून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे.

नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरू श्री गुरू गोविंद सिंघजी महाराज यांनी सन् 1705 मधे या ठिकाणी आपला देह ठेवला.

अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सल्तनीतले नांदेड आता झपाटयाने बदलु लागले आहे. नंदीतटाचे नांदेड आता लहान गावठाण राहिले नाही तर शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड महानगरपालिका अस्तित्वात आली.

नांदेड या नावाची उत्पत्ती

नांदेड’’ या नावाचा उगम ’’नंदी-तट’’ या शब्दामधुन झालेला असुन ’नंदी’ म्हणजे श्री शंकराचे वाहन आणि ’तट’ म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ!

नंदीने गोदावरी नदीच्या तिरावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे.

नांदेड जिल्ह्याची स्थापना

नांदेड हे सन् 1725 मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजाम संस्थानने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनुन राहीले पण भारत सरकारच्या पोलीस कारवाई नंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.आताचा नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला.

इतिहास

१७ व्या शतकातील नांदेड जिल्ह्याचा इतिहास म्हणे अहमदनगररची निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्यातल्या संघर्षाची गाथा होय. दोन आडीच दशके हा संघर्ष चालला. १६३२ साली दौलताबादही मुघलांच्या ताब्यात आले. निजामशाहीतील कंधार आणि दौलाताबाद सारखी प्रमुख लष्करी ठाणी पडल्यामुळे मुघलांचा प्रभाव वाढला.

नांदेड हे सुभ्याचे प्रमुख ठिकाण झाले. नांदेडच्या किल्यातून सुभ्याचा कारभार होऊ लागला. छत्रपती शिवरायांनी सामान्य रयतेचा विश्वास जागवला. त्याना लढण्याचे सामर्थ्य दिले. सत्तेचा उपभोग स्वत:च्या स्वार्थासाठी करण्यांच्या या मध्ययुगीन कालखंडात काळाची चौकठ भेदुन लोककल्याणाचा विचार करणारे मराठी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजानी निर्मीले.

मुघल-मराठा संघर्षातील लक्षणीय अशी लढाई नांदेड जिल्ह्यात झाली नसली तरी उभय पक्षाच्या पक्षाच्या फौजानी नांदेड परिसरात घोडदौड मारली. १६७० साली व-हाडवरील चढाईच्या वेळी शिवाजी महाराज नांदेडला आले होते. इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनला. इ.स. १६८६ साली मुघलांनो विजापूर जिंकले.

विजापुरची आदिलशाही आणि गोवलकोंड्याची कुतूबशाही या दोन सलतनतीच्या पाडवानंतर औरंगजेबाने मराठ्यावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कंधारचा आपला लष्करी तळही मजबुत केला हमिदुद्दीनखान या किल्लेदाराने याच काळात कंधारच्या किल्यावर आपला तळ ठोकला, मुघल-मराठा संघर्ष तीव्रतर बनत चालला.

हा संघर्ष चालू असतांना नांदेड परिसरातील सामान्य रयतेचे जिव अत्यंत हालाखीचे झाले होते. अनेक लोक स्थालांतरीत होऊ लागले. याच काळात नांदेड मधील कांह घराणी काशी प्रयाग अशा तिर्थक्षेत्री स्थलांतरत झालेली दिसतात. १८ व्या शतकातील संघर्षही मुख्यत: मुघल आणि मराठा यांच्यातला सत्तासंघर्ष होता.

भूवर्णन

जिल्हयाचा उत्तर आणि ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकडयांनी व्यापलेला असुन जिल्हयाच्या दक्षिण.नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत.

हा जिल्हा दख्खन पठाराचाच एक भाग आहे. उत्तरेकडील व दक्षिणेकडील काही भाग वगळल्यास सर्व जिल्हा सपाट व सुपीक आहे. उत्तरेकडील किनवट तालुक्यात सातमाळा (अजिंठा) च्या रांगा व त्याच्या दक्षिणेस निर्मळ डोंगररांगा आहेत. कंधार व मुखेड तालुक्यांत बालाघाट डोंगराच्या अखेरच्या टेकड्या आहेत.

नांदेड, हदगाव, भोकर व दक्षिणेस किनवट (याचा दक्षिण भाग) तालुक्यांतून जिल्ह्यातील भाग किंवा ठाणवारी टेकड्यांची रांग जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात असून त्याची उंची ६४४ मी. आहे. उत्तर सीमेवरील पैनगंगा खोऱ्याच्या सखल भागाची उंची १५० ते ३०० मी. असून अन्यत्र जिल्ह्याची स. स. पासून सरासरी उंची ४०० मी. आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठी नदी गोदावरी परभणी जिल्ह्यातून येऊन या जिल्ह्याच्या मध्यातून वाहते व पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाते. आसना, सीता व सरस्वती या तिच्या या जिल्ह्यातील उत्तरेकडील उपनद्या असून, मांजरा नदी पूर्व सरहद्दीवर दक्षिणोत्तर वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळते.

मन्याड (मनार) ही मांजरा नदीची उपनदी कंधार तालुक्यातून व नंतर मुखेड, देगलूर व बिलोली तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. दक्षिण भागात पूर्वेकडे वाहणारी लेंडी ही मांजरा नदीची उपनदी होय. हदगाव तालुक्यातून वाहणारी कयाधू ही पैनगंगेची उपनदी आहे. पैनगंगा ही जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे वर्धा नदीस मिळते.

हवामान

जिल्ह्यातील हवामान उष्ण, कोरडे असून उन्हाळा फारच कडक असतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८०० ते १०००मि. मी. पाऊस पडतो, तर पूर्वेकडील व ईशान्येकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण वाढत जाऊन तेथे १००० ते १२०० मि. मी. पाऊस पडतो.जिल्ह्याचे हवामान कोरडे व विषम असून मे महिन्यात तपमान ४०° से. पर्यंत असते.

हिवाळा साधारण सौम्य असून तपमान १३° से. असते. पाऊस नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो. हिवाळ्यातही काही भागांत थोडा पाऊस पडतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. उत्तर भागात १२३·८ सेंमी. तर दक्षिण भागात ८५·५ सेंमी. अशी पावसाची सरासरी आहे.

मृदा आणि जमीन

दक्षिणेकडील निकृष्ट डोंगराळ जमीन वगळता जिल्ह्यात इतरत्र काळी–सुपीक जमीन आहे. ती विशेषतः गोदावरीच्या व तिच्या उपनद्यांच्या काठी आढळते. देगलूर तालुक्यातील काळी जमीन सर्वांत उत्तम आहे. भोकर व किनवट तालुक्यांतही डोंगराळ भाग वगळता बाकी सर्वत्र काळी–सुपीक जमीन आहे.

खनिजे

जिल्ह्यात नाव घेण्याजोगी खनिजे नाहीत. फक्त चुनखडक, बेसाल्ट, वाळू, वालुकाश्म व विटांसाठी माती मिळते.

शेती

जिल्ह्यातील ८०% लोक शेती करतात. सर्व शेती पावसावर अवलंबून असते.

ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून १९७२–७३ मध्ये दोन्ही हंगाम मिळून एकूण २,९१,१०६ हे. म्हणजे शेतजमिनीपैकी ४०% जमीन या पिकाखाली होती. हदगाव व किनवट तालुके जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार होत.

एकूण शेतजमिनीच्या १/४ भागात कापूस होतो. बाजरी, तांदूळ, तूर, मूग, भुईमूग, करडई, जवस, उडीद व मिरची ही अन्य खरीप पिकेही काही भागांत होतात.

रब्बीच्या पिकांत गहू, हरभरा व ज्वारी या पिकांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून कंधार व नांदेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. यांखेरीज केळी, द्राक्षे, पालेभाज्या इ. बागायती पिकेही जिल्ह्यात काही ठिकाणी काढतात.

एकूण सु. ६८% जमिनीत अन्नधान्ये आणि बाकीच्या जमिनीत इतर पिके होतात. ओलिताखालील एकूण १८,६५४ हे. क्षेत्रापैकी ३,८६८ हे. कालव्यांखाली २,३७६ हे. तलावांखाली व ११,३८२ हे. विहिरींखाली होते. मन्याड नदीवरील बारुळ येथील प्रकल्प हा एकच नाव घेण्याजोगा प्रकल्प या जिल्ह्यात आहे.

लोकसंख्या

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या  33,61,292 एवढी असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,422 वर्ग कि.मी. इतके आहे.

साक्षरतेचे प्रमाण 45% एवढे असून लिंग गुणोत्तर प्रमाण

1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 943 आहे.जिल्ह्यात एकूण ११ शहरे व १,३२८ खेडी आहेत. शहरी लोकसंख्येचे प्रमाण दर चौ. किमी. ला ८९३ व ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ११४ आहे. एकूण ६५९ खेड्यांचे विद्युतीकरण झाले.

भाषा

जिल्हयाच्या आजुबाजुला तेलंगणा कर्नाटन राज्याच्या सिमा असुन येथील लोक मराठी, तेलगु, तामीळ, आणि हिंदी भाषा बोलतांना आपल्याला आढळतात.

उद्योगधंदे

नांदेड येथे मोठी कापडगिरणी असून १९६३ मध्ये मराठवाडा सहकारी सूतगिरणी नांदेड येथे नोंदली आहे. धर्माबाद, देगलूर, मुखेड, भोकर, पेठ उमरी इ. ठिकाणी हातमाग व्यवसाय चालतो. कापूस पिंजून त्याचे गठ्ठे बांधण्याचा उद्योग हंगामात सु. १,००० लोकांना रोजगार पुरवितो.

कंधारजवळ कलंबर येथे सहकारी साखर कारखाना सुरू झाला असून गूळ करण्याचा उद्योग सु. ३,००० लोकांना हंगामी रोजगार देतो. नांदेड, देगलूर, कंधार, धर्माबाद येथे तेलघाण्या आहेत. काही ठिकाणी कातडी कामाचे लहान कारखाने असून सुतार, लोहार, तांबट व कुंभार यांस काम मिळते. किनवट व हदगाव तालुक्यांत तेथील जंगलांच्या आधारावर लाकूड कापण्याचा उद्योग चालतो.

नांदेड, किनवट, देगलूर येथे औष्णिक विद्युतकेंद्रे आहेत. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाची जलविद्युत दुसऱ्या योजनेपासून या जिल्ह्यालाही मिळू लागली. तथापि एकंदरीत हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेलाच आहे.

दळणवळण

राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 आणि क्र. 204 या जिल्हयातुन गेला आहे.

जिल्ह्यात एकूण २०८ किमी. लांब रेल्वे असून जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे मनमाड–काचीगुडा हा लोहमार्ग जातो व त्यावर या जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, पेठ उमरी व धर्माबाद ही स्थानके आहेत. दुसरा लोहमार्ग मुदखेडहून आंध्र प्रदेशातील आदिलाबादकडे गेलेला आहे व त्यावर मुदखेड, भोकर व किनवट ही स्थानके आहेत.

प्रेक्षणीय स्थळे: नांदेड तालुक्यातील अर्धापूर येथील केशवराज मठ, दर्गा, बारुळ येथील मन्याड नदीवरील धरण, देगलूर येथील गुंडा महाराजांचा मठ व जुनी मशीद हदगाव येथील दत्तमंदिर, कंधार येथील किल्ला, कुंडलवाडी येथील कुंडलेश्वर मंदिर, माहूर येथील दत्तात्रेयाचे जन्मस्थान समजले जाणारे दत्तशिखर व रेणुका देवीचे मंदिर, मालेगाव येथील खंडोबाचे देवालय, मुदखेड येथील अपरंपार स्वामींची समाधी, काझिपुरा मशीद व देवीचे मंदिर मुखेड येथील दशरथेश्वर महादेव व वीरभद्र मंदिरे, नांदेड येथील अमृतसरच्या खालोखाल महत्त्वाचे शिखांचे गुरुद्वार, नगिना घाट, किल्ला, हिंदूंची अनेक देवालये, जामा मशीद, बडी दर्गा इ. मुस्लिमांची पवित्र स्थाने, तामसा येथील बारालिंग मंदिर व गौतम तीर्थ, पेठ उमरी येथील बाबा महाराजांची समाधी, उनकदेव येथील उनकेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारची दोन उष्णोदकाची कुंडे ही प्रेक्षणीय होत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-