Nandurbar Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण नंदुरबार या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहे.
नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nandurbar Information In Marathi
नंदुरबार हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे.
भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात.
नंदुरबार जिल्ह्याच्या चतुःसीमा
नंदुरबार एक आदिवासी जिल्हा आहे , जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य
सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत.
नंदुरबार जिल्ह्याची स्थापना
जुलै १९९८ पासुन धुळे जिल्हयातुन विभाजीत होऊन नंदुरबार ‘जिल्हा’ म्हणुन अस्तित्वात आला. पुर्वी तो धुळे जिल्हयाचाच भाग होता.
आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात असल्यामुळे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणुन देखील ओळखला जातो.
नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास
धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला आहे. १ जुलै १९९८ पासून हे अस्तित्वात आले. या जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे.
खान्देशामधले फार प्राचीन शहर म्हणुन नंदुरबार या शहराची ओळख आपल्याला सांगता येईल पुर्वीचे नंदीगृह! अर्थात यादवांच्या काळात नंदीगृह म्हणुन ओळखले जाणारे आजचे नंदुरबार होय! प्राचीन आख्यायिकेनुसार नंद नावाच्या गवळयांच्या राजाने हे शहर वसविले होते.
फार अगोदरच्या काळात अहिर (अभीर) राजे या खान्देश भागावर राज्य करायचे या अहिर राजांच्या नावामुळेच येथे बोलल्या जाणाऱ्या भाषेला अहिराणी हे नाव पडले.
या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते. नंतर यादवांच्या साम्राज्यावर राजानं राजा सेनचंद्र यांच्यावर राज्य केलं. मुस्लिमांच्या आगमनासह, फारुकी राजा यांना देण्यात आलेली खिताब खान म्हणून खानदेश नाव बदलण्यात आले होते.
खानदेश संपूर्ण क्षेत्र धुळे आणि जळगाव दोन जिल्हे समावेश आहे आणि धुळे येथे मुख्यालय एक जिल्हा म्हणून पाहिली होती. तथापि १९०६ मध्ये प्रशासनिक कारणांसाठी खानदेशला पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश असे दोन जिल्हे विभागण्यात आले.
१९५० मध्ये नवीन तहसील अक्कलकुवा तयार करण्यात आला आणि १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह हे क्षेत्र मुंबई राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर १९६० मध्ये ते महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले.
असे करताना, नंदुरबार आणि नवापुर तहसीलमधील प्रत्येकी ३८ गावे, तळोदा मधील ४३ गावे आणि अक्कलकुवा तहसीलमधील ३७ गावे गुजरात राज्यामध्ये हस्तांतरीत करण्यात आली. १९७१ च्या जनगणनेत, अक्रानी महलची अक्रानी तहसील म्हणून सुधारीत करण्यात आली.
१९६१ मध्ये जिल्ह्याचे नाव पश्चिम खानदेश ते धुली व त्यानंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून बदलले गेले. जुलै, १९९८ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील निर्माण केल्यानंतर, ९३३ गावे ६ तालुक्याच्या समावेश नंदुरबार जिल्ह्यातील हस्तांतरित करण्यात आले होते.
सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर १९९१ च्या जनगणनेनुसार ९३३ गावे होते, जे २००१ च्या जनगणनेनुसार १७ नवीन गावांसह ९५० झाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गावांची संख्या ९४३ झाली.
भूरचना
महाराष्ट्राच्या खानदेश प्रदेशात हा नंदुरबार जिल्हा येतो. सातपुडा पर्वतांच्या रांगेत हा जिल्हा वसलेला आहे
जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा; आणि पश्र्चिमेला गुजरात राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग असून या पर्वतरांगांमुळे नंदुरबार, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांपासून वेगळा झाला आहे.
जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते.
विभाग
जिल्ह्यात 6 तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये अक्कलकुवा, अक्राणी महल (धडगाव), तालोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर अशी आहेत.जिल्ह्यात एक लोकसभा मतदारसंघ आहे जिथे नंदुरबार (एसटी) एसटीसाठी राखीव आहे. चार विधानसभा मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा (एसटी), शहादा (एसटी), नंदुरबार (एसटी), नवापूर (एसटी).धुळे जिल्ह्यातील सावरी (एसटी) आणि शिरपूर (एसटी) विधानसभा मतदारसंघ हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. नंदुरबार ही आदिवासी (आदिवासी) जिल्हा आहे.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व विधानसभा मतदार संघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.
हवामान
नंदुरबार जिल्ह्याचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे आहे. जिल्ह्याच्या पश्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते.
उर्वरित भारताच्या नंदुरबार जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ऋतूं आहेत. उन्हाळा, पावसाळा / हिवाळा आणि हिवाळी हंगाम. उन्हाळा मार्चपासून मध्य जूनपर्यंत असतो. उन्हाळ्यातील बहुतेकदा गरम आणि कोरडे असतात. मे महिन्याच्या दरम्यान उन्हाळ्याच्या शिखरावर असतो ग्रीष्मकालीन शिखरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सियस इतके असू शकते.
जूनच्या मध्य किंवा अखेरीस मान्सून सेट करतो. या हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते. उत्तर व पश्चिम भागामध्ये उर्वरित भागापेक्षा जास्तीत जास्त पाऊस पडतो. जिल्ह्यात सरासरी पाऊस 767 मि.मी. हिवाळी नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत असते. हिवाळा सौम्यपणे थंड परंतु कोरडी आहेत.
नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या
नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या १६,४८,२९५ एवढी असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,९५५ वर्ग कि.मी. इतके आहे. जिल्ह्यातील
साक्षरतेचे प्रमाण ६४.३८% एवढे आहे.
लिंग गुणोत्तर प्रमाण
१००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९७५ असे आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनेक जमाती पाहण्यास मिळतात.
जमाती पुढील प्रमाणे:-
भिल्ल, पावरा, तडवी, वळवी, वसावे, पाडवी, राऊत, पराडके, कोकणा-कोकणी, गावित, मावची, धानका, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत.
नंदुरबार जिल्हयात येणाया सातपुडा पर्वतरांगांमधे आदिवासी लोक मोठया संख्येने राहातात. गोमित, पारधी आणि भिल्ल हे लोक जास्त संख्येने असुन त्यांच्याखालोखाल कोकणा, पावरे, गावीत आणि धनका या जमातीचे लोक देखील येथे आहेत आणि ते आपल्या परंपरा, लोककला, लोकसंस्कृती, राहणीमान आजही टिकवुन आहेत.धडगाव तालुका नंदुरबार जिह्यातील अतिदुर्गम तालुका आहे.
शेती
तांदुळ, भुईमुग, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहु ही येथील मुख्य पिकं, येथील सर्वच तालुक्यांमधे आणि दोनही हंगामामधे घेतले जाणारे पिक म्हणजे ज्वारी होय. येथील दादर ज्वारी प्रसिध्द असुन ते पीक रब्बी हंगामात या ठिकाणी घेतले जाते.
मिरची व तूरडाळीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या जिल्ह्यात कांदा, कापूस, ऊस, केळी व बोर यांचे उत्पादनही बर्याच प्रमाणात घेतले जाते.
नंदुरबार व नवापूर या तालुक्यात मिरची प्रामुख्याने पिकवली जाते.
उद्योगधंदे
एकमेव अशी या जिल्हयातील उद्योग वसाहत तळोदे या ठिकाणी आहे. जिनिंग प्रेसिंगचे उद्योग नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी सूत गिरणी (मोराने, नंदुरबार) या सूत गिरण्यांसह जिल्ह्यात शहादे तालुक्यात लोणखेडे येथे सूत गिरणी आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि-आधारित छोटे उद्योग चालतात. रोशा गवतापासून औषधे व सुगंधी तेल बनवण्याचा उद्योग जिल्ह्यात चालतो.
भाषा
नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी ही प्रमुख भाषा असून तेथे खानदेशी मराठी दिली गुजराती आणि हिंदी या भाषा ही बोलल्या जातात.
वाहतूक
जिल्हयातील महत्वाची रेल्वेस्थानकं म्हणजे नंदुरबार, नवापुर आणि चिंचपाडा रनाळे ही होय.रेल्वे मार्ग आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सेवा सुरळीत सुरू असल्याने नंदुरबार शहर इतर शहरांशी चांगल्या तऱ्हेने जोडल्या गेले आहे.
महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो .गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांत कडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात.चांदसेली घाट व तोरणमाळ घाट हे महत्त्वाचे घाट या जिल्ह्यात आहेत.
प्रसिद्ध स्थळे
प्रकाशे – नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत.
सांगरखेड येथील दत्त मंदिर – शहादा तालुक्यातील सारंगखेड येथील दत्त मंदिर प्रसिद्ध असून येथील दत्त जयंती यात्रेला महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील तळोदा येथील कालिका देवीचे मंदिर व तेथील यात्राही प्रसिद्ध आहे.
गरम पाण्याचे झरे – शहादा तालुक्यात उपणदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कडक थंडीच्या काळातही हे झरे आटत नाहीत. श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणामुळे हे झरे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील फत्तेपूर किल्ला व अक्का राणीचा किल्ला हे किल्लाही प्रसिद्ध आहेत.
तोरणमाळ येथील थंड हवेचे ठिकाण – महाबळेश्र्वरनंतरचे राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ या जिल्ह्यात आहे. सात खेड्यांनी बनलेला हा परिसर नंदूरबारपासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर आहे.
अक्राणी तालुक्यातील डोंगराळ भागात हे ठिकाण असून समूद्रसपाटीपासून ११४३ मी. उंचीवर वसलेले आहे. प्राचीन काळी मांडू घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते, तसेच हे नाथ संप्रदायाचे पवित्र स्थळ असून येथे गोरक्षनाथांचे मंदिर व मच्छिंद्रनाथांची गुंफा आहे. याच परिसरात यशवंत तलाव व कृष्णकमळ तलाव आहेत.
कृष्णकमळ हा नैसर्गिक तलाव असून यात असंख्य कमळे आहेत. तोरणमाळ परिसरातील आदिवासी जीवनही अनुभवण्यासारखे असून येथे नागार्जून मंदिर (गुहेतील अर्जूनाची मूर्ती) व सीताखाई ही ठिकाणे आहेत. श्रीराम व सीता रथातून या भागातून जात असताना, रथामुळे गुहा निर्माण झाली असे मानले जाते.
या गुहेस सीताखाई म्हटले जाते. तोरण नावाची फुले येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात व पठारी, सपाट भागाला माळ म्हटले जाते. यावरून या भागास तोरणमाळ म्हटले जाते.