नानखटाई रेसिपी मराठी Nankhatai Recipe in Marathi

नानखटाई रेसिपी मराठी Nankhatai Recipe in Marathi  नानखटाई ही रेसिपी सर्वांच्या ओळखीचे आहे. कारण लहानपणी आपण ही सर्वांनीच खाल्ली असेल, अतिशय खायला चविष्ट व तोंडात विरघळणारी नानखटाई अनेक लोकांना आवडते. नानकटाई ही कुरकुरीत अशा बिस्किटांसारखी असते. आज आपण नानखटाई रेसिपी विषयी माहिती पाहणार आहोत. ही रेसिपी तयार करण्याकरता अतिशय सोपी व कमी वेळात तयार होईल तसेच लहान पासून मोठ्यांना सर्वांनाच ही रेसिपी आवडेल. तर तुम्हीही नक्की ट्राय करा व नानखटाई रेसिपी करून बघा.

Nankhatai Recipe

नानखटाई रेसिपी मराठी Nankhatai Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

नानखटाई ही रेसिपी पारशी लोकांची सर्वात लोकप्रिय स्नॅक्स आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी व कमी वेळात बनते शिवाय लहान मुलांना तर खूपच आवडते. नानखटाई ही रेसिपी आपल्याला बेकरीमध्ये मिळून जाईल परंतु त्यामध्ये जर अंडे मैदा साखर लोणी यांचा उपयोग करून ती बनवली असेल तर शाकाहारी लोकांना ती खाल्ल्या जात नाही. त्यामुळे आपण स्वतः आपल्या हाताने अंडे न घालता बेकरी सारखीच तोंडामध्ये विरघळणारी नानखटाई रेसिपी तयार करू शकतो. तेही अत्यंत कमी वेळेत. तर चला मग पाहूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

या रेसिपी मध्ये किती नानकटाई बनतील ?
तर दिलेल्या साहित्यामध्ये 10 नानखटाई बिस्किटे बनतील.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

नानखटाईच्या पूर्वतयारी करता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

नानखटाई कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

नानखटाई रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

नानखटाई करिता लागणारे साहित्य :

1) एक वाटी बटर
2) दीड वाटी साखर
3) सव्वा वाटी मैदा
4) अर्धी वाटी तांदूळ पीठ
5) पाव चमचा बेकिंग पावडर
6) चिमूटभर मीठ

नानखटाई बनवण्याची पाककृती :

  • आंबोली रेसिपी मराठी
  • नानकटाई बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, तांदुळाचे पीठ, बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून तीन-चार वेळा चाळणीने चाळून घ्यावे.
    असे केल्यामुळे सर्व मिश्रण मिक्स होईल.
  • नंतर बटर आणि साखर एकत्र करून हँड मिक्सरच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यावे.
  • हे मिश्रण अगदी हलके झाले पाहिजे त्यामुळे आठ ते दहा मिनिटे फेटून घ्यावे.
  • ओव्हन 325 डिग्री F वर फ्री हिट करावा. नंतर फेटलेल्या मिश्रणामध्ये थोडे थोडे करून हँड मिक्सरच्या सहाय्याने चाळलेले पीठ घालून फेटून घ्या.
  • हे मिश्रण नरमसर आणि हलकं झाले पाहिजे, तोपर्यंत फेटून घ्यायचे आहे. ओहनच्या सेफ भांड्यात या मिश्रणाचा अर्धा इंचाचा थर द्यावा.
  • थराचा पृष्ठभाग समान असला पाहिजे. नंतर त्यावर सुरीने अलगद आवडीच्या आकारामध्ये काप पाडून घ्या.
  • हे मिश्रण अगदी बेक केल्यावर कडक होईल आणि तेव्हा जर आपण सुरीने कापले तर त्याचे तुकडे पडतील. त्यामुळे आधीच त्यावर काप पडून घ्यावे.
  • ब्रेडचा रंग लाईट ब्राऊन होईपर्यंत बेक करून घ्यावे.
  • बेक करून झाले की सुरीच्या खुणा केल्या आहेत. इथून परत एकदा सुरीने फिरवून घ्यावी. शॉर्ट ब्रेड थंड होऊ द्या. नंतर थंड झाल्यावर वेगळे करून घ्यावे.

अशाप्रकारे नानखटाई रेसिपी तयार आहे. थंड झाल्यानंतर ही रेसिपी तुम्ही आठ ते पंधरा दिवस खाऊ शकता.

पोषक घटक :

नानखटाई हा एक मिठाईचा प्रकार आहे. शुगर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, प्रोटीन, प्रथिने यासारखे घटक असतात. जे आपल्या शरीराला तात्काळ एनर्जी पुरवतात. व अशक्तपणा देखील कमी होतो. म्हणून जेवण झाल्यानंतर मिठाई खाणे फायदेशीर ठरते.

फायदे :

घरी केलेली मिठाई कधीही बाजारात विक्री होणाऱ्या मिठाईपेक्षा चांगलीच असते, घरी केलेल्या मिठाईमुळे आपल्या शरीराला कोणतीही हानी होत नाही.

घरगुती बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये ग्लाईसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती नसते.

ही मिठाई जेवण झाल्यानंतरच खावी, त्याने आपल्याला तात्काळ एनर्जी मिळते व रक्तातील शुगर देखील नियंत्रणात राहते.

तोटे :

नानखटाई एक गोड पदार्थ असल्यामुळे लहान मुलांना जंत होण्याची संभावना असते. त्यामुळे लहान मुलांना सकाळी गोड पदार्थ खाण्यापासून टाळावे.

मिठाई खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी वाढते, त्यामुळे आपले वजन देखील वाढू शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला नानखटाई या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment