नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik Information In Marathi

Nashik Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आजच्या पोस्टमध्ये आपण नाशिक या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.

Nashik Information In Marathi

नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik Information In Marathi

पवित्र गोदावरी तिरावर वसलेले नाशिक! पुण्यभुमी…. हिंदुचे पुण्यक्षेत्र…. ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो….. हजारो साधु संत त्याकाळात याठिकाणी वास्तव्याला येतात…. लाखो करोडोंच्या संख्येने श्रध्दाळु त्यादरम्यान नाशिक पुण्यक्षेत्री पतितपावन होण्याकरता गर्दी करतात… असे पुण्यक्षेत्र नाशिक!

नाशिकला पौराणिक, ऐतिहासीक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्यसाधारण महत्व आहे.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक ‘त्र्यंबकेश्वर’ हे ज्योर्तिलिंग याच जिल्हयात असल्याने या जिल्हयाचे महत्व आणखीनच वाढते.साडेतिन शक्तीपिठांपैकी एक ‘वणीची सप्तश्रृंगी’ उंच गडावर याच जिल्हयात विराजमान असुन भक्तांच्या हाकेला साद देत शतकानुशतकं आजही उभी आहे.

गोदावरी तिरी ’रामकुंडा’ वर आजही लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आपल्या ’ मृत ’ आप्तस्वकीयांच्या अस्थी विसर्जीत करण्याकरता येथे गर्दी करतात.श्राध्दविधी पुण्यक्षेत्री केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते या श्रध्देने भाविक या ठिकाणी श्राध्दविधी करण्याकरता देखील मोठया संख्येने येत असतात.

वैदिक विधी, श्रध्दा, प्रथा परंपरा यांची सोनेरी किनार लाभलेले नासिक आधुनिक आणि पुरातन गोष्टींची सांगड घालत आज खुप मोठया प्रमाणात विस्तारले आहे.स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोटनिस, बाबुभाई राठी, वि.वा शिरवाडकर, वसंत कानेटकर अश्या विविध क्षेत्रातील नामवंत विभुती या नाशिकनेच जन्माला घातल्या.

महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते येथील द्राक्ष विदेशात देखील पाठवली जातात. नाशिक जिल्हा दारू च्या उत्पादनाकरता देखील ओळखला जातो त्यामुळे याला ’’भारताची वाईन कॅपीटल’’ म्हणुनही संबोधतात.

नावाचा उगम

नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले.

नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’ मधून वाहते . शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो.

त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.

ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.

महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. या शहराला “नाशिक” हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. “नऊ शिखरांचे शहर” म्हणून “नवशिख” आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे.

राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात.

इतिहास

राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.

याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.

क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.

सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !

नाशिक हें पौराणिक शहर असून येथें देवालयें बरींच आहेत. बौद्ध व जैन गुहाहि पहाण्यासारख्या आहेत. गोविंदेश्वर येथें जी देवळें आहेत तीं सर्वांत उत्तम आहेत. बागलाणमध्यें कळवण येथील जोगेश्वर देवळांतील नकशीकाम फार सुरेख आहे. इ.स. १९०६ त येथें सत्रप वंशाच्या वेळचीं बरींच नाणीं सांपडलीं.

या जिल्ह्यांत एकंदर ३८ डोंगरी किल्ले असून यांचे दोन प्रकार आहेत; सह्याद्रीवर असणारे व मध्यभागाच्या चांदवड पहाडावर असणारे. सह्याद्रीवर एकंदर २३ किल्ले आहेत; पैकीं मुख्य गलन, अंजनेरी, त्रिबक, कुलंग, अलंग व कळसुबाई हे होत.

चांदवड पहाडावर पंधरा किल्ले आहेत; पैकी अंकई, चांदवड व धोडप हे मुख्य होत. हे सर्व किल्ले बहुधां सारखेच आहेत. हे बहुतेक शिवाजीनें बांधले आहेत. मार्कंड हा किल्ला राष्ट्रकूटांच्या वेळेस होता.

भूगोल

नाशिक जिल्हयाच्या उत्तरेला धुळे जिल्हा, पुर्वेला जळगांव, दक्षिण पुर्वेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, दक्षिण पश्चिमेला ठाणे जिल्हा, आणि पश्चिमेकडे गुजरात राज्याची सुरूवात होते.

‘नाशिक’ जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात.

अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे.

याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते.

तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे.

त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत.

नद्या

महाराष्ट्रातील मोठया नदींपैकी एक गोदावरी नदीचा उगम हा याच जिल्हयात त्र्यंबकेश्वर मधुन होतो.

सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत.

त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.

तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.

नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते.

पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात.

तालुके

१ सटाणा २ सुरगाणा ३ मालेगाव ४ देवळा ५ पेठ ६ दिंडोरी ७ चांदवड ८ नांदगाव ९ नाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर.

नाशिक शहरात पंचवटी, भद्रकाली, जुने नाशिक, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, इंदिरानगर, पाथर्डी, अंबड़, सातपूर, नाशिक रोड, जेल रोड, आदगाव, मुंबई नाका, बेलगांव, उपनगर, सिडको इत्यादी प्रमुख उपनगरे आहेत.

अजूनही नाशिक शहराचा विस्तार होत आहे. नाशिक शहरालगत देवळाली आणि भगूर ही दोन शहरे महानगरीय नाशिक क्षेत्रात आली आहेत.

लोकसंख्या

  • लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे.
  • नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 61,95,252 एवढी असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,582 वर्ग कि.मी. एवढे आहे. जिल्ह्याचे
  • साक्षरतेचे प्रमाण 89.95% एवढे आहे.

हवामान

नाशिक जिल्ह्याचे कमाल तापमान 41.9 सेल्सिअस तर किमान तापमान 8.07 अंश सेल्सिअस एवढे असते. पश्चिम भागातील इगतपुरी ,पेठ ,सुरगाणा तालुक्यात 2000 मिली पेक्षा जास्त पाऊस पडतो तसेच पूर्वभागातील प्रमाण कमी असते.

सुरगाणा, इगतपुरी, पेठचे हवामान हे कोकणा सारखे असते तर निफाड ,सिन्नर, दिंडोरी ,बागलाण येथील हवामान पश्चिम महाराष्ट्र सारखे असते. नांदगाव ,येवला, चांदवड आदि भाग येथील हवामान विदर्भासारखे असते यामुळे नाशिकला “मिनी महाराष्ट्र” म्हणून ओळखले जाते.

पावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते.

ब्रम्हगिरी हा उंच पर्वत त्र्यंबकेश्वर मधे असल्याने पाण्याने भरलेले ढग या ठिकाणी अडतात आणि या ठिकाणी खुप मोठया प्रमाणात पाउस पडत असल्याने नाशिक जिल्हयाला पाण्याची टंचाई जाणवत नाही.

इतकेच काय तर नाशिकला पाउस पडल्यास औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो, औरंगाबाद येथील नाथसागर हे अथांग जलाशय गोदावरी नदीवरच बांधन्यात आले.

शेती

शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहे. एकूण ८,९८,००० कामगारांपैकी ६,४७,००० शेतकरी व शेतमजूर आहेत; म्हणजे कामगारांपैकी ७२% कामगार शेतीवर आहेत.

नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने नाशिकला ‘राज्याचे किचन’ म्हंटले जाते. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक जिल्हा आहे.

नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदा यासाठी देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो व फुले निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहे.

जिल्ह्यात शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचे जाळे पसरले आहे. साखर कारखाने, बेदाणा केंद्र, वाइनरी, शीतगृहे यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे नाशिकची पीकसंस्कृतीही बदलत चालली आहे.

नाशिकमधील पिके

नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.

पीकपद्धती व प्रमुख पिके

द्राक्ष, कांदा, भात, गहू, मका, बाजरी, डाळिंब ही नाशिकमधील प्रमुख पिके आहेत. १९९५ पूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, हरभरा या पिकांवर नाशिकचा भर होता.

मात्र, यानंतर कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला. आज द्राक्ष, कांदा, टोमॅटो या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, बागलाण ही तालुके द्राक्ष शेतीसाठी ओळखली जातात.

मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यांत प्रामुख्याने कांदा व डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा ही तालुके भात, नाचणी, वरईच्या पिकांसाठी ओळखली जातात.

माती व खनिजे

नाशिक जिल्ह्यात काळी माती असं संपूर्ण जिल्ह्यात चुनखडी व कंकर जास्त प्रमाणात आढळून येतात.

भाषा

नाशिक जिल्ह्याची भाषा मराठी आहे.

नाशिक मधील काही महत्त्वाचे ठिकाणे

तोफखाना केंद्र :

नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे.

नाणे संग्रहालय :

अंजनेरी नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नाशिक ते त्रंबकेश्वर रोडवर नाणे संग्रहालय आहे.

गारगोटी संग्रहालय :

हे सिन्नर येथील मालेगाव  एम आय डी सी क्षेत्रामध्ये नाशिक पासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे.

बुद्ध विहार आणि दादासाहेब फाळके संग्रहालय :

हे नाशिक शहराजवळ नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर आहे.नाशिक बस स्टँड पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे.

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

दूध सागर धबधबा :

नाशिक पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरील सोमेश्वर येथे आहे.

दुगारवाडी धबधबा :

त्रंबकेश्वर जवळ रोडवर त्रंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे.

नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळे

नाशिक मधील महत्वाच्या ठिकाणांबरोबरच येथील धार्मिक स्थळ सुद्धा पर्यटकांना आकृष्ट करत आहे.

कुशावर्त तीर्थ :

त्रंबकेश्वर शहराच्या मध्यभागी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अंदाजे 300 मीटर अंतरावर स्थित आहे.

काळाराम मंदिर  :

सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले.प्रभू रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले ,त्या ठिकाणी हे मंदिर होते.

पंचवटी :

नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे.  काळाराम मंदिराजवळ वृक्षांचा समूह असून हा समूह पाच वर्षे वृक्षापासून तयार झाला असल्याने या परिसरात “पंचवटी “असे म्हटले जाते.

धम्मगिरी :

गोयंका द्वारा स्थापित धम्मगिरी एक ध्यान केंद्र आहे.

रामकुंड :

रामकुंड नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे. ते मध्यवर्ती बसस्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे.

श्री सोमेश्वर मंदिर  :

हे मंदिर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर गंगापूर रस्त्यावर आहे.

श्री सप्तशृंगी गड :

सप्तशृंगी गड नाशिक पासून  60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून 4 659 फूट उंचीवर आहे.

श्री त्रंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग मंदिर :

त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

पांडवलेणी :

नाशिक नवीन बस स्थानकापासून 5 किलोमीटर व महामार्ग बस स्थानकापासून 4किलोमीटर अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत.

मांगीतुंगी मंदिर :

मांगीतुंगी मंदिर नाशिक पासून 125 किलोमीटर अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र ,दिंडोरी :  हे नाशिक पासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment