NDA Exam Information In Marathi NDA ही एक राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा आणि त्यानंतर बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व चाचणी असते. जर तुम्ही तरुण वर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला भारतीय सेना म्हणजेच आर्मीमध्ये किंवा एअर फोर्स तसेच नौसेना यामध्ये जर तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एनडीए NDA ही एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. दहावी किंवा बारावीनंतर विद्यार्थ्यांकरिता काय करावे? असा प्रश्न पडतो. त्याकरिता तुमच्यासाठी एनडीए ही परीक्षा देऊन भारतीय लष्करी सेवांमध्ये करिअर करण्यासाठी उत्तम मार्ग आहे.
एनडीए परीक्षाची संपूर्ण माहिती NDA Exam Information In Marathi
ही परीक्षा तुम्हाला देणे खूप गरजेचे असते. भारतामध्ये दरवर्षी या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी भाग घेत असतात आणि यापैकी बरेच विद्यार्थी हे देशसेवा करण्यासाठी पुढे सुद्धा येतात. यामध्ये यापूर्वी केवळ पुरुष उमेदवार ही भरती देण्यास पात्र होते; परंतु आता या परीक्षा महिलांसाठी सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत तसेच या परीक्षा जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते. त्यामध्ये किती गुण मिळाले पाहिजे आणि ही परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे? आज याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
NDA ही भरती परीक्षा म्हणजे काय?
NDA ही एक भारतीय सशस्त्र दलाची संयुक्त संरक्षण अशी अकादमी आहे, यामध्ये तुम्हाला जर प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही वर्षातून दोनदा यूपीएससी परीक्षा दिलेली असली पाहिजे तसेच या परीक्षेचे मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी असे अर्थ आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी एसएसबी मध्ये मुलाखतीसाठी हजर राहणे सुद्धा आवश्यक असते. ही परीक्षा वर्षातून केवळ दोनदाच घेतली जाते. यामध्ये NDA 1 आणि 2 पहिली अधिसूचना ही जानेवारी महिन्यामध्ये जारी केली जाते आणि दुसरी अधिसूचना ही जूनच्या जवळपास येत असते.
पहिल्या प्रवेश परीक्षा एप्रिलच्या महिन्यामध्ये येतात तर दुसरी परीक्षा ही सप्टेंबरच्या जवळपास घेतली जाते. एनडीए अर्जामध्ये दोन भाग असतात. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी द्वारे घेतली जाते. या परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकतात.
भारतातील ही वायुसेना, सेना, सशस्त्र सेना आणि नौसेना मध्ये भरती होण्यासाठी तुम्हालाही परीक्षा देणे गरजेचे असते. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे भारत, नेपाळ किंवा भूतांचे नागरिक असणे खूप गरजेचे असते. भारतामध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश, केनिया, युगांडा, युनायटेड, टांझीनिया , झांबिया आणि इथिओपिया किंवा मधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती सुद्धा ह्या परीक्षा देऊ शकतात.
परीक्षेसाठी कोणत्या पात्रतेच्या अटी आहेत आहे?
तुम्हाला जर NDA मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याकरिता विद्यार्थ्यांची बारावी पूर्ण केलेली असावी. त्यानंतरच तुम्ही एनडीए ही परीक्षा देऊ शकता.
जर तुम्हाला नौदल किंवा हवाई दलामध्ये सामील व्हायचे असेल तर तुमच्याकडे भौतिकशास्त्र आणि गणित या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अविवाहित व्यक्तीचे एनडीए परीक्षा देण्यास पात्र असतात. लग्न झालेले विद्यार्थी किंवा व्यक्ती ही परीक्षा देऊ शकत नाही.
एनडीए ही परीक्षा देण्यासाठी व्यक्तीची शारीरिक स्थिती सुद्धा चांगली असणे गरजेचे असते. एनडीए परीक्षा देण्यासाठी व्यक्तीची उंची किमान 157 सेंटीमीटर असायला पाहिजे.
तसेच उमेदवाराचे वय हे 16 ते 19 वर्षाच्या दरम्यान असावी लागते.
NDA यासाठी तुम्ही कसे तयार व्हाल?
तुम्हाला जर एनडीए ही परीक्षा द्यायची असेल तर त्याकरता तुम्हाला चांगल्या अभ्यासाची गरज असते. तसेच स्मार्ट अभ्यास योजनेची तुम्ही नियोजन केले पाहिजे. यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मार्क मिळवण्यासाठी तुम्ही अभ्यास करावा तसेच तुमचा वेळ आणि एनडीए 2024 अभ्यासक्रम कसा असेल तसेच मागील वर्षाचा अभ्यासक्रम कसा होता. हे जाणून घेणे गरजेचे असते.
तुम्ही अभ्यास करत असताना सुरुवातीपासूनच खोलवर अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सामान्य ज्ञानाचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल, तेवढा तुमच्या फायद्याचा असेल. त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्रे मासिके इतर पुस्तके वाचून जनरल नॉलेज सुद्धा वाढवले पाहिजे. तुम्हाला दर्जेदार पुस्तकांची निवड करावी लागेल. एनडीएची परीक्षा विषयी सर्व माहिती गोळा करावी.
या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला योग्य पुस्तकाची निवड करणे अतिशय गरजेचे आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक मिळतात त्यामध्ये तुमच्यासाठी कोणती पुस्तक योग्य आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही केलेला अभ्यास हा आठवडा भरातून चेक करत रहा व दररोज त्याचा सराव करा. त्यामुळे झालेला अभ्यास तुमच्या दीर्घकालीन लक्षात राहू शकतो.
NDA चे उद्दिष्ट :
भारतीय सैन्य मधून तुम्ही पदवी प्राप्त केल्यानंतर तुमच्या कामगिरीचा विचार करण्यात येतो तसेच ते भारतातील सर्व प्रमुख मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण असतात. यासाठी त्यांना राष्ट्र पुरस्कार सुद्धा मिळालेले असतात. शूर सैनिकांनी काय साध्य केले हे आपण येथे पाहूया. एनडीएमधून कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया हे गोरखा रायफल्स काँगो 1961 होते.
सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल 17 पुना हॉर्स भारत-पाकिस्तान युद्ध 1971 आणि कॅप्टन मनोज कुमार पांडे या सर्वांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेले आहे. 11 गोरखा रायफल्स कारगिल युद्धामध्ये 19 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. बऱ्याच जणांना अशोक चक्र, महावीर चक्र, वीर चक्र अशाप्रकारे हे पुरस्कार मिळतात.
NDA मध्ये किती पगार असतो?
एनडीए ही एक भारतीय सैन्य आहे, ज्यामध्ये भारतीय सैन्यात भरती केलेल्या विद्यार्थ्यांची भरपाई त्यांच्या पदावरून निश्चित केली जाते आणि वेगवेगळ्या खात्यातील पदांनुसार त्यांना वेतनश्रेणी दिली जाते. प्रशिक्षणाधर्मांचा पगार हा 56 हजार 100 असतो. तर लेफ्टनंट यांचा पगार 56,100 ते 1,75,000, कॅप्टन या पदासाठी 61,000 ते एक लाख 93 हजार पर्यंत पगार असतो.
तसेच ब्रिगेडियर या पदासाठी एक तास 39 हजार ते दोन लाख 17 हजार पर्यंत पगार असतो. मेजर जनरल मध्ये 1,44,000 ते 2,18,000 पर्यंत पगार असतो. लेफ्टनंट जनरल एचएजी स्केल याकरिता 1,82,000 ते 2,24,100 पर्यंत पगार असतो आणि आर्मी कमांडर किंवा लेफ्टनंट जर्नल जो असतो, त्यांना 2 ते 2.5 लाखापर्यंत पगार असतो.
FAQ
NDA यासाठी वयोमर्यादा किती आहे?
16-19 वर्ष.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी एनडीएच्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो का?
होय, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हा एनडीएच्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.
NDA एनडीएच्या परीक्षेचे स्वरूप कसे असते?
एनडीए ही परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाते त्यामध्ये एनडीए 1 आणि 2 असे दोन सत्र वेगवेगळ्या महिन्यात घेतले जातात.
NDA मध्ये GK चे प्रश्न विचारले जातात का?
होय, NDA मध्ये सामान्य विज्ञान, सामाजिक अभ्यास, इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडींवर सुद्धा प्रश्न विचारले जातात.
NDA साठी पुरुष उमेदवाराची उंची महत्वाची असते का?
होय, पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 157 सेमी असणे आवश्यक आहे.