Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर जवान रणांगणामध्ये उतरले तसेच ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी आंदोलने केले. त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यामधीलच एक सुभाषचंद्र बोस हे होते, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचा इतिहास हा एक पराक्रमाचा इतिहास आहे. त्यांनी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी जनतेला म्हटले, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” असे ब्रीद वाक्य त्यांचे होते.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म व बालपण :
सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडीसा या राज्यातील कटक शहरांमध्ये झाला. सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ होते तसेच त्यांच्या आईचे नाव हे प्रभावती होते. ते लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचे होते. सुभाषचंद्र यांच्यावर स्वामी रामचंद्र आणि विवेकानंद यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. शाळेमध्ये असताना त्यांच्यावर रामचंद्र आणि विवेकानंद यांचा प्रभाव पडला होता. विवेकानंद रामकृष्णांच्या ग्रंथांमुळे त्यांना अत्यंत धार्मिक गोडी निर्माण झाली. विवेकानंदाच्या शिकवणीने त्यांची मानवाच्या समानतेवरील श्रद्धा दृढ झाली.
सुभाष चंद्र बोस यांची शिक्षण :
सुभाष चंद्र बोस हे खूप हुशार होते. त्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्या मनामध्ये देशभक्ती जागृत केली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष चंद्र बोस आपल्या गुरुच्या शोधात हिमालयामध्ये गेले, गुरुचा शोध असफल राहिला, त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना अन्यायविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती आपोआप घडली. कोलकत्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रजी प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्याची उर्मटपणे वागत असतात म्हणून सुभाष चंद्र बोस यांनी महाविद्यालयां मध्ये संप पुकारला होता.
सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांची इच्छा अशी होती की, त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषचंद्र इंग्लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यामध्ये राष्ट्रसेवेची इच्छा प्रबळ होती. एकीकडे आयसीएसचे उच्च पद त्यांच्याकडे तर दुसरीकडे देशसेवेचा कठीण प्रण त्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न उभे राहिले शेवटी देश सेवेला त्यांनी करण्याचे भाग पाडले आणि नोकरी करायची नाही असा निर्णय घेतला त्यांनी आपला राजीनामा दिला.
स्वातंत्र्य लढ्यात प्रवेश व कार्य :
कोलकत्यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चिंतरंजन दास यांच्या कार्यामुळे सुभाष चंद्र बोस हे प्रभावित झाले व त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची इच्छा झाली. इंग्लंडहुन त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतामध्ये परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले व मुंबईत गांधीजी मनीभवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत होते.
20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस हे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. गांधीजींनी सुद्धा कोलकत्याला जाऊन दास बाबून बरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाष बाबू कोलकत्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना पाहून खूप आनंद झाला होता, त्याकाळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये असहकार आंदोलने चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाष बाबू या आंदोलनांमध्ये सुद्धा सहभागी झाले होते.
1922 साली दास बापूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकत्ता महानगरपालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवली आणि जिंकली स्वतः दासबाबू कोलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाष बाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाष बाबरने आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकत्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे त्यांनी दिली.
1930 मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा त्यांनी ठरवले की, 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाडला जाईल परंतु 26 जानेवारी 1931 च्या दिवशी कोलकत्यात सुभाष बाबू तिरंगी ध्वज फडकवत एका मोठ्या मोर्चाचे नेतृत्व करत होते.
तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यांमध्ये ते जखमी झाले व सुभाष बाबू यांना तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकार बरोबर तह केला व सर्व कायद्यांची सुटका करण्यात आली; परंतु सरदार भगतसिंग व अधिक क्रांतीकारकांची सुटका करण्यात इंग्रजांनी नकार दिला. भगतसिंगची फाशी रद्द व्हावी ही मागणी गांधीजींनी सरकारकडे केली. सुभाष बाबूंची इच्छा होती की, याबाबत इंग्रज सरकार जर दात देत नसेल तर गांधीजींनी सरकार बरोबर केलेल्या करारा मोडावा.
आपण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले देण्यात आली. भगतसिंग न यांस न वाचवू शकल्यामुळे सुभाष चंद्र बोस हे गांधीजी तसेच काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर खूप नाराज झाले. दोघांमध्ये देशांचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.
आझाद हिंद सेनेची स्थापना :
दुसरे महायुद्ध सुरू असताना सुभाष चंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कलकत्ता येथे नजर कैदेत ठेवले होते. तेथून ते 17 जानेवारी 1941 रोजी धाडसाने निष्डून अनेक अडचणींचा सामना करून जर्मनी येथे पोहोचले. जर्मनीमध्ये भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून स्वतंत्र सेना त्यांनी उभी केली. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम हिटलरची भेट घेतली होती आणि जर्मन सरकारची सहानुभूती मिळवली होती.
त्यांनी जर्मनला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले. सुभाष चंद्र बोस यांच्या भाषणाने हिंदी सैनिक भारावून गेले होते. तिकडे जपानने सिंगापूरच्या ब्रिटिशांचा आरमारी तळ काबीज केला होता. रासबिहारी बोस यांनी तेथे जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची सेना बनवली. या सैनिकांची भेट घेण्यासाठी नेताजी नव्वद दिवसाच्या पानबुटीतील प्रवासाने 1943, जुलै रोजी मृत्यूशी झुंज देत जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले व रासबिहारी बोस यांच्या विनंतीवरून त्या सेनेचे नेतृत्व नेताजी यांनी स्वीकारले.
5 जुलै 1943 ला सिंगापूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. “चलो दिल्ली” हे घोषणा केली. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी भारतीय नागरिक आणि स्त्रिया सुद्धा दाखल झाल्या. सुभाष चंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले.
आझाद हिंद सेनेने भारतात प्रवेश करून इंफाळ, कोहिमा इत्यादी ठिकाणी ब्रिटिश फौजांवर विजय मिळवला व नेताजी यांनी दिल्ली के लाल किल्ले पर तिरंगा लहराने के लिये, “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा” ही भारताच्या इतिहासातील घोषणा अजरामर झाली. या लढाईमध्ये जपानची ताकद कमी पडली आणि आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत कमी झाली किंवा थांबली.
त्यामुळे लढाई थांबली यातच ब्रिटिशांनी विमानातून पदके टाकून ब्रिटिश सैन्यात परत यावे अशी लालच आजाद हिंद सेनेच्या सैनिकांना दाखवली. परंतु त्या सैनिकांनी बेईमानी केली नाही. जपानच्या हिरो सीमा व नागासाकी या शहरावर अनुभव टाकण्यात आले. त्यामुळे जपानने शरणागती पत्कारली.
सुभाष चंद्र बोस यांचे निधन :
18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथील विमानतळावर विमानाचा अपघात होऊन सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले असे सांगण्यात आले.
FAQ
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय होते?
सुभाष चंद्र जानकीनाथ बोस.
सुभाष चंद्र बोस यांचा जन्म कधी झाला?
23 जानेवारी 1897 रोजी.
सुभाष चंद्र बोस यांनी कोणती घोषणा केली?
“तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा”.
सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला?
18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात.
कोणत्या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले?
डमडम विमानतळ, कोलकत्ता.