NMMS Exam Information In Marathi NMMS ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या पार्श्वभूमीतील शैक्षणिक दृष्ट्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती चा कार्यक्रम आहे. या शिष्यवृत्तीमुळे मागासवर्गीय विद्यार्थी सुद्धा त्यांचा सर्वांग विकास शिक्षणामार्फत करू शकतील याचे उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते.
NMMS परीक्षाची संपूर्ण माहिती NMMS Exam Information In Marathi
बरेचसे विद्यार्थी आपले अर्धवट शिक्षण मध्येच सोडून जातात कारण त्यांची आर्थिकस्थिती किंवा इतर कारणे पूर्ण करण्यास ते सक्षम नसतात. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते. परंतु युनिसेफचे रिपोर्टनुसार आपल्या देशाचे 36 टक्के विद्यार्थी शालेय शिक्षण सोडून देतात कारण त्यांच्याकडे आर्थिक सपोर्ट नसतो.
बऱ्याचदा या कारणामुळे सुद्धा उच्च शिक्षणापासून बरेचसे विद्यार्थी वंचित राहून जातात आणि ही भारतासाठी खूप चिंताजनक गोष्ट आहे. याची दखल घेताना शासनाने ही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. शालेय शिक्षण पूर्ण न करू शकणारे जास्तीत जास्त मुलं ही एससी /एसटी किंवा ओबीसी कॅटेगिरीचे आहेत. त्यामध्ये तीन ते अठरा वर्षातील मुलं 60 लाख शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांचे सर्व कारण म्हणजे त्यांना शाळेत पाठवले जात नाही आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन NMMS ही योजना सुरू करण्यात आली आहे.
NMMS या योजनेद्वारे भारत सरकार मार्फत लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते आणि हे शिष्यवृत्ती चार वर्षापर्यंत आठवीपासून ते बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे देण्यात येते. NMMS ही दरवर्षी भारत सरकार द्वारे परीक्षा घेण्यात येते त्यातून विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊन त्यांना चार वर्षापर्यंत ही शिष्यवृत्ती लागू करण्यात येते.
NMMS चा फुल फॉर्म काय आहे?
National means merit scholarship हा NMMS चा फुल फॉर्म आहे. ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली असून उच्च शिक्षण घेण्यासाठी ते विद्यार्थी सक्षम व्हावेत. हा या मागचा उद्देश आहे. परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून मदत केली जाते. त्यांना दर महिन्याला एक हजार रुपये मिळतात असे बारा महिन्याचे त्यांना बारा हजार रुपये दिले जातात. या योजनेमध्ये जो विद्यार्थी पास होतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्याला दरवर्षी 12 हजार रुपये देण्यात येतात. दर महिन्याला त्यांना एक हजार रुपये देण्यात येतात.
विद्यार्थ्याला दरवर्षी शिष्यवृत्ती घेण्यासाठी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स जमा सुद्धा करावी लागतात. या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे शालेय खर्च भागतात आणि ही योजना घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न मात्र एक ते दीड लाख रुपये पेक्षा कमी असायला पाहिजे.
या परीक्षेला कोणत्या पात्रता आहे :
महाराष्ट्र NMMS ही परीक्षाला अर्ज करण्यासाठी काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात. इयत्ता आठवीच्या कोणत्याही रेगुलर असणारा विद्यार्थी सातवीमध्ये टोटल 55% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करत असेल तर तो विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरतो.
उमेदवाराने सरकारी शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थीच्या शाळेत शिकत आहे, त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी. जो विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत आहे. त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असायला पाहिजे .
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55 टक्के मार्क्स असणे आवश्यक आहेत. एससी /एसटी कॅटेगिरीसाठी पाच टक्के उत्तीर्ण केलेली असावी.
विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळवलेले पाहिजेत. SC/ST साठी पाच टक्के किंवा अकरावी बारावीमधील NMMS स्कॉलरशिप सुरू ठेवण्यासाठी जास्त मास असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांचे मागील वर्गाचे सीबीएससी रिझल्ट किंवा इतर अन्य बोर्डचे रिझल्ट जाहीर करण्याचा तीन महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील क्लास मध्ये प्रवेश मिळवणे सुद्धा आवश्यक असते.
महाराष्ट्र NMMS स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा.
NMMS स्कीमला अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होईल. त्या वेबसाईटवर तुम्हाला परीक्षेची अर्ज भरण्याची तारीख संस्थेच्या आत सर्व डॉक्युमेंट्स आणि ऑनलाइन अर्ज भरून घ्यायचा आहे. हा अर्ज वेळेपर्यंत भरला पाहिजे, नाहीतर मुदत संपल्यानंतर तुम्ही या परीक्षेला बसू शकणार नाही किंवा हा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
NMMS परीक्षेचे स्वरूप कसे आहे?
ही परीक्षा मुख्यतः दोन भागांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते.
पहिल्या भागात बौद्धिक चाचणी आणि दुसरी म्हणजे शैक्षणिक योग्यता चाचणी.
बौद्धिक चाचणी : बौद्धिक चाचणीमध्ये तुमची मानसिक क्षमता बघितली जाते आणि त्यामध्ये 90 मिनिटांचा तुम्हाला वेळ दिलेला जातो आणि ही चाचणी 90 मार्कसाठी असते. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असतो. या पेपरमध्ये एकूण 90 प्रश्न असतात आणि 90 प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला हा पेपर सोडवताना विशेष काळजीपूर्वक सोडवायचा आहे.
शैक्षणिक योगिता चाचणी : या परीक्षेचे दुसरे स्वरूप म्हणजे तुमचे शैक्षणिक योग्यता मोजणे हे आहे. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक अभ्यासाबद्दल काही प्रश्न सुद्धा विचारण्यात येतात, त्याची तुम्हाला उत्तरे द्यावे लागतील. हे शैक्षणिक योगिता चाचणी सुद्धा 90 मार्क्सची असते. ज्यामध्ये 90 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो. कुठल्याही प्रश्नांना न चुकता या प्रश्नांचे योग्य उत्तरे तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन्ही पेपर मिळून एक मार्क दिला जातो.
परीक्षेचे निकाल कसे लागतात?
परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट जारी केला जातो. तेव्हा अधिकृत वेबसाईट तुम्हाला भेट द्यावे लागते. नंतर डिरेक्टरेट ऑफ एज्युकेशनचे ऑफिशियल होमपेज स्क्रीनवर दिसेल त्यानंतर सार्वजनिक परिपत्रकांमधून NMMS चा निकाल लिंक वर जाहीर झालेला तुम्हाला दिसतो.
FAQ
NMMS चा फुल फॉर्म काय आहे?
National means merit scholarship.
NMMS ची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे?
www.mscepune.in
NMMS ही परीक्षा कधीपासून सुरू झाली?
2008 मध्ये नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप परीक्षा सुरू झाली.
ही स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी कोणते बँक अकाउंट असणे आवश्यक आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय बँक, कॅनरा बँक यांसारख्या सार्वजनिक बँकांमध्ये बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.
NMMS एक्झाम चे मुख्य उद्देश काय आहे?
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य देण्यासाठी व पुढील शिक्षणामध्ये मदत म्हणून परीक्षा घेण्यात येते. हे परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक हजार रुपये दिले जातात म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपये मिळतात. याच पैशाचा उपयोग विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी करू शकतात.