चिकन बिर्याणी रेसिपी मराठी Non Veg Biryani Recipe in Marathi चिकन बिर्याणी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्य मानले जाते. जे लोक नॉन व्हेज बिर्याणी खात नाहीत. त्याच्यासाठी व्हेज बिर्याणी जे भाजीपाले पासून बनवली जाते. पण काही लोक नॉन व्हेज खातात त्याच्यासाठी आज आपण घेऊन आलो आहे. चिकन बिर्याणी जे आपण सहज आपल्या घरी बनवू शकतो. अगदी काही तासात. या बिर्याणी मध्ये आपण चीकनच्या जागी अंडे, किंवा मटण वापरून आपल सहज अंडा बिर्याणी व मटण बिर्याणी तयार करू शकतो. चिकन बिर्याणी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. जर आपल्याला बाहेरील किंवा हॉटेल मधील स्वादिष्ट बिर्याणी खायची असेल तर चिकन बिर्याणी कशी बनवायची हे रेसिपी पाहणार आहोत.
चिकन बिर्याणी रेसिपी मराठी Non Veg Biryani Recipe in Marathi
वाढीव :
चिकन बिर्याणी आपण हे 5 लोकांकरिता बनवणार आहोत.
चिकन बिर्याणीसाठी लागणारा वेळ :
चिकन बिर्याणी म्हटलं म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे मसाले, पेस्ट तसेच मास किंवा अंडे व तांदूळ या सर्वाचे मिश्रण असते. ही बिर्याणी तयार करण्याकरिता 1 तास लागतो.
कुकिंग टाईम:
चिकन बिर्याणी कुलिंग करण्यासाठी आपल्याला 1 तास वेळ लागतो.
टोटल टाईम :
चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी साहित्य तयार करावे लागते. पूर्वतारीसाठी एक तास लागतो आणि कुकींग करायला एक तास एकूण 2 तासात आपली बिर्याणी तयार होते.
रेसिपीचे प्रकार :
चिकन बिर्याणी हे भारतात सर्वात जास्त स्वादिष्ट खाद्य पदार्थ आहे. हैदराबाद शहरातील हैदराबाद बिर्याणी सर्वात प्रसिद्ध आहे. यामध्ये चिकन दम बिर्याणी, मटण बिर्याणी, अंडा बिर्याणी आणि पनीर बिर्याणी हे या रेसिपीचे प्रकार आहेत. यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे व्हेज बिर्याणी आणि दुसरी नॉनव्हेज बिर्याणी असते. बिर्याणी हे लोकप्रिय खाद्य आहे. जे मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरात मोठ्या प्रमाणावर मिळते. व आपल्या सभोवताली ग्रामीण भागात सुध्दा आता हे आढळून येते.
बिर्याणीसाठी लागणारे साहित्य :
बिर्याणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.
1) अर्धा किलो बासमती तांदूळ.
2) दोन किलो चिकन.
3) चार ते पाच चम्मच लसूण अद्रक पेस्ट
4) दहा ते बारा लवंग.
5) एक वाटी दही.
6) तीन चम्मच मिरची पावडर.
7) एक चम्मच हळद.
9) थोडे मीठ.
10) सहा ते सात शिमला मिरची.
11) एक चम्मच जिरे.
12) 250 ग्रॅम तेल.
13) दोन चम्मच गरम मसाला.
14) थोडा पुदीना व थोडी कोथिंबीर.
15) एक चिमूट केसर.
16) चिकन मसाला किंवा येवरेस्ट मसाला.
17) थोडे बटर याने बिर्याणी चवदार बनते.
18) आवश्यकते नुसार पाणी.
पाककृती :
- पावभाजी रेसिपी मराठी
- बिर्याणी तयार करण्यातसाठी सर्व प्रथम मास स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याचबरोबर तांदूळ आणि भाजीपाला व्यवस्थित स्वच्छ करावा.
- चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम केसर पाण्यात भिजून त्याचे पाणी तयार करा. नंतरचा वापरासाठी हे पाणी व्यवस्थित बाजूला ठेऊन द्या. नंतर कांदा व कोथिंबीर बारीक कापून घावी.
- नंतर गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेऊन त्यात बटर किंवा तेल टाका. तेल थोडे गरम होऊ द्या. नंतर त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, लवंग, तमाल पत्र इत्यादी टाकून. पाच मिनिट परतावा.
- नंतर त्यामध्ये कांदा टाका. कांदा लाल होये पर्यत परतावा.
- आता चिकनमध्ये हिरवी मिरची, हळद, चवेनुसार मीठ, तसेच लसन अद्रक पेस्ट, लाल मिरची पावडर यांचे व्यवस्थित मिश्रण करून घा.
- नंतर चार ते पाच मिनिट हे मिश्रण कांदा झाल्यावर त्यामध्ये टाका. पुढे त्यामध्ये दही टाकून मिश्रण करावे.
- बिर्याणी पाच मिनिट मध्यम आस वरती शिजवा. आणि त्यात गरम व चिकन मसाला टाका. त्याचबरोबर कोथिंबीर व पुदीना आणि केसरचे पाणी घालावे. चिकन मऊ होय पर्यत शिजवा.
- बिर्याणी मसाला तयार होत आहे. तो पर्यत बिर्याणीसाठी लागणारा भात आपण शिजवून घेऊया.
- यासाठी लागणारे बासमती तांदुळ व्यवस्थित स्वच्छ करून 20 मिनिट भिजू घाला.
- एका भांड्यात थोडे तेल किंवा बटर घालून. एक दोन लवंग, तमालपत्र, व गरम मसाला टाकून थोडा वेळ होऊ द्या.
- त्यानंतर या पात्रात स्वच्छ धुतलेले बासमती तांदूळ पाण्या सोबत घाला. म्हणजे सर्व मासला या भातात मिक्स होणार. यामुळे भाताला चव येते, चवेनुसार थोडे मीठ घालावे.
- भात 10 मिनिट भात तयार मध्यम आस वरती शिजवा. 80% भात हा शिजवून घावा. बाकी 20% भात हा बिर्याणी मसाला सोबत होतो.
- भात शिजवून झाल्यावर त्याला एका प्लेट मध्ये व्यवस्थित काढून घावा. भाताला थोडे पसरून थोडे मोकडे करा. म्हणजे भात जास्त गारा होणार नाही.
- आता चिकन बिर्याणीसाठी एक खोल तळाचे भांडे घा. त्याला आतून पूर्ण तेल लाऊन घा, म्हणजे भांड्याला जास्त मसाला किंवा भात चीपकणार नाही.
- त्यामध्ये आता एक लेयर भात टाका व एक लेयर आपण तयार केले का चिकन मसाला टाका.
- या पद्धतीने एक लेयर भात व एक लेयर बिर्याणी मसाला टाका. अशा प्रकारे सर्व मसाला व भात त्यामध्ये टाका. त्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर बारीक कापून टाकावी. पुदीना, थोडा कांदा, तसेच बटर, तूप यामध्ये टाकून झाकण व्यवस्थित बंद करून घ्यावे व मध्यम गॅसचा आसवरती 20 मिनिट ठेवावी.
- 20 मिनिट झाल्यावर बिर्याणी हळूच खाली काढावी. आता व्यवस्थित कालवून घ्या. म्हणजे सर्व मसाला व कलर मिक्स होईल. एकदम स्वादिष्ट आणि रंगिन नॉन व्हेज बिर्याणी दिसेल.
- आपली चिकन बिर्याणी तयार आहे. आता हे तुम्ही कांदा, लिंबू घेऊन खाऊ शकता.
नॉन व्हेज बिर्याणी मध्ये असणारे घटक :
चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी लागलेले सामान व लागलेले चिकन मास यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. हे शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपल्या शरीरात अशक्तपणा दूर होतो. आणि आपण या मध्ये काही भाजपाले सुध्दा टाकले. ज्यातून आपल्याला पोषक घटक मिळतात. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदे मिळतात.
तोटे :
चिकन बिर्याणी हे एक जड अन्न आहे. जे शरीरासाठी जास्त प्रमाणत सेवन केल्यास पोट दुःखी तसेच जीव मळ मळ होऊ शकतो.
बिर्याणी मध्ये काही प्रमाणात मसाले व गरम मसाले वापरले जातात. जास्त प्रमाणात बिर्याणी सेवन केल्याने आपली तब्बेत खराब होऊ शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला चिकन बिर्याणी रिसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.