हाका नूडल्स रेसिपी मराठी Noodles Recipe in Marathi

हाका नूडल्स रेसिपी मराठी Noodles Recipe in Marathi आपल्याला दररोजच्या जेवणमध्ये भाजी पोळी  खाऊन कंटाळा आला असेल तर, आम्ही खास तुमच्याकरिता ही हाका नूडल्स रेसिपी घेऊन आलो आहोत.  अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी तयार करून बघा.  तुम्हाला जर नवीन एखादी रेसिपी खायची इच्छा झाली असेल तर बऱ्याचदा आपण बाहेरून चायनीज न्यूडल्स ऑर्डर करतो;  परंतु जर आपण घरच्या घरीच रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या नूडल्स जर तयार केले, तर आपल्याला बाहेरून मागवण्याची गरज भासणार नाही.  त्याकरिता आपल्याला जे साहित्य हवे आहे, ते खालील प्रमाणे दिले आहे.  ज्याप्रमाणे चायनीज फूड खूप चविष्ट असते.  त्याचप्रमाणे यामध्ये देखील सॉसचा उपयोग करून अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी तयार होऊ शकते.

 Noodles Recipe

हाका नूडल्स रेसिपी मराठी Noodles Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

हाका नूडल्स ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते.  त्यामध्ये शेजवान नूडल्स, चिकन नूडल्स, एग नूडल्स, हाका नूडल्स बऱ्याच जणांना ही रेसिपी खूपच अवघड वाटते त्यामुळे घरी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

परंतु तसं अजिबात नाही.  शहरांमध्ये अनेक स्ट्रीट फूड आपल्याला चाखायला मिळतील परंतु ग्रामीण भागातील परिसरात असे पदार्थ मिळणे खूपच कठीण आहे.  त्यामुळे खालील माहितीच्या आधारे तुम्ही ही रेसिपी आपल्या घरी नक्की बनवून बघा व आनंद घ्या.  आपल्याकडे चायनीज पदार्थ तसे केले जात नाही; परंतु आपण आपल्याला हव्या तशा भाज्या आणि सॉस मिक्स करून चायनीज बनवत असतो.  सर्वात जास्त खाल्ला जाणारा न्यूडल्स हा प्रकार आहे.

ही रेसिपी किती व्यक्तींकरिता  बनणार आहे ?

हा का न्यूडल्स ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

हाका न्यूडल्स रेसिपीची पूर्व तयारी करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

हाका नूडल्स कुकिंग करण्याकरिता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

हाका नूडल्स बनवण्याकरता आपल्याला एकूण वेळ 25 मिनिटे एवढा लागतो.

हाका नूडल्स  तयार करण्याकरता लागणारी सामग्री  :

1) हाका न्यूडल्स

2)  पाणी

3)  किसलेले गाजर

4) चिरलेली कोबी

5) फरसबी बारीक कापून

6) पातीचा कांदा

7)  चिरलेला कांदा

8)  लसणाच्या पाकळ्या सहा ते सात

9)  चिली सॉस

10) सोया सॉस

11)  रेड चिली सॉस

12) व्हिनेगर

13) मीठ चवीपुरते

14) तेल

हाका न्यूडल्स बनवण्याची पद्धत  :

  • कचोरी रेसिपी मराठी
  • हाका न्यूडल्स सर्वप्रथम पाण्यात शिजवून घ्याव्यात शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
  • एका पातेल्यात तेल गरम करण्याकरता ठेवावे त्यामध्ये कांदा, पातीचा कांदा, गाजर, कोबी, फरसबी, लसण पेस्ट घालावी व चांगली परतून घ्यावे.
  • लसणाचा वास यायला लागला की, त्यामध्ये मीठ सोया सॉस रेड चिली सॉस चिली सॉस व्हिनेगर घालून पुन्हा परतून घ्यावे.
  • सर्व मिश्रण एकत्रित मिक्स झाले की, वरून शिजलेले हक्का नूडल्स घालून पुन्हा परतून घ्यावे.  दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित वाफ येऊन झाली की, गरमागरम हक्का नूडल्स रेसिपी तयार आहे.
  • तुम्ही हे नूडल्स एका डिशमध्ये घेऊन त्यामध्ये शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही सोप्या व साध्या पद्धतीमध्ये हाका न्यूडल्स ही रेसिपी तयार करू शकता.

हाका नूडल्समध्ये असणारे पोषक घटक  :

हाका नूडल्स मध्ये आपण वेगवेगळ्या भाज्यांचा देखील समावेश करू शकतो त्यामुळे त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, कॅलरीज, कर्बोदके, खनिजे, कोलेस्ट्रॉल  व विटामिन ए, बी, सी इत्यादी पोषक घटक असतात.

फायदे :

शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते जेवण केल्याचा अनुभव आपल्याला होतो.  त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये हाका नूडल्स आपण खात असाल तर शरीरातील ऊर्जा कायम राहते.

तसेच शरीराला मिळणारे पोषक तत्व देखील मिळतात.  नूडल्स खाणे शरीरासाठी पोषक आहेत.  परंतु त्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली नसावी.

नूडल्समध्ये प्रथिने आणि फायबरचं प्रमाण कमी असतं.

तोटे  :

नूडल्स हे अनेक रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्न असतं, त्यामुळे नूडल्सला हेल्दी फूड असे म्हणता येणार नाही.  न्युडल्स सतत खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याचा देखील धोका असतो.

नूडल्समध्ये फॅटी ऍसिडचे प्रमाण खूप असते.

तसेच नूडल्स बनवताना त्यामध्ये हलक्या दर्जाचे तेल शुगर सिरप व स्वादासाठी वापरण्यात येणारे पदार्थ असे अनेक पदार्थ असतात.  जे आपल्या शरीराला हानिकारक असतात.

रासायनिक प्रक्रिया केलेले निवडत जर तुम्ही सतत खात असाल तर त्यामुळे डोकेदुखी रक्तदाब श्वासाचे आजार यासारखे आजार होतात.

तर मित्रांनो,  तुम्हाला हाका नूडल्स रेसिपी विषयी  माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment