Olympiad Information In Marathi आजकाल सर्वत्र स्पर्धेचे युग आल्यामुळे या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे फार गरजेचे ठरत असते. अगदी शालेय स्तरापासूनच विविध कौशल्यांनी विद्यार्थ्यांना युक्त केले, तर पुढे जाऊन विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत मिळत असते. यासाठीच पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ओलंपियाड स्पर्धा आयोजित केल्या जात असतात.
ओलिंपियाड स्पर्धा विषयी संपूर्ण माहिती Olympiad Information In Marathi
या स्पर्धेच्या अंतर्गत विज्ञान, गणित, इंग्रजी, किंवा संगणक तंत्र यासह विविध शालेय विषय समाविष्ट असून, या स्पर्धेच्या अंतर्गत विद्यार्थी आपली प्रगती नोंदवू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आढावा घेणे सोयीचे होत असते.
या स्पर्धा अतिशय उत्कृष्ट स्तरावर कार्य करत असून, प्रत्येक शाळेमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. यातील काही स्पर्धा राष्ट्रीय, तर काही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असून, काही खाजगी संस्थांद्वारे देखील या स्पर्धा घेतल्या जात असतात. सर्वात प्रथम १९८९ यावर्षी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या ऑलिम्पियाड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या ओलंपियाड स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचे योग्य आकलन करण्याबरोबरच मूल्यांकन करू शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्या विषयांमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे, व कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यांच्यासाठी अवघड जातात याचे विश्लेषण करणे शक्य होते. आणि त्यानुसार मुले अभ्यास करून मुख्य परीक्षांमध्ये चांगले मार्क घेत असतात.
त्याचबरोबर वैज्ञानिक विचार करण्याबरोबरच तर्कशास्त्र यांसारख्या विषयांचे देखील या ओलम्पियड स्पर्धांमुळे विकसन होत असते. आज देशभरात मोठ्या पातळीवर या ओलम्पियड स्पर्धांचे आयोजन केले जात असून, यासाठी शाळा हे महत्त्वाचे साधन समजले जाते.
कारण आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्या तरी देखील या स्पर्धा घेण्याचे कार्य शालेय स्तरावरच केले जात असते. मुख्यतः या स्पर्धा केवळ पहिली इयत्तेपासून बारावी इयत्तेपर्यंत घेतल्या जात असतात. आजच्या भागामध्ये आपण या ओलिंपियाड स्पर्धा बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
ओलंपियाड परीक्षा म्हणजे काय:
ओलंपियाड स्पर्धा या शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा असून, त्यामध्ये मुख्यतः गणित, विज्ञान, आणि इंग्रजी यांसारखे विषयांचा समावेश असतो. या परीक्षा शालेय विद्यार्थी अर्थात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात. या स्पर्धा परीक्षांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देणे असते.
त्याचबरोबर विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, व कोणत्या क्षेत्रांमध्ये त्यांना जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, याबद्दल देखील मूल्यांकन केले जाऊ शकते. भारतामध्ये अनेक संस्था या ओलंपियाड स्पर्धा आयोजित करत असतात. त्यातीलच एक मुख्य संस्था म्हणजे एस ओ एफ होय अर्थात सायन्स ओलंपियाड फाउंडेशन होय. ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्यरत असणारी ही संस्था सर्वात प्रसिद्ध ओलंपियाड स्पर्धा घेणारी संस्था आहे.
ओलंपियाड स्पर्धा देण्यासाठीच्या पात्रता:
ज्या विद्यार्थ्यांना ओलंपियाड स्पर्धा द्यायच्या असतील, त्यांच्या शाळेने एसओएफ अंतर्गत नोंदणी करणे गरजेचे असते. तसेच या परीक्षेसाठी आयोजित केली जाणारी फी देखील विद्यार्थ्यांनी भरणे गरजेचे असून, विद्यार्थी हा पहिली ते बारावी या येथे दरम्यान शिकत असावा.
जर विद्यार्थ्यांची शाळा एस ओ एफ अंतर्गत नोंदणी केलेली नसेल, तर ई-मेल अथवा संदेशाच्या माध्यमातून शाळा अशा प्रकारच्या परीक्षांसाठी नोंदणी करू शकते.
ऑलिंपियाड परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे:
- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
- विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यासंदर्भातील शिक्षण त्यांना दिले जाऊ शकते.
- विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, व कोणत्या क्षेत्रामध्ये कमी पडत आहेत त्याचे आकलन करून योग्य ते शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाऊ शकते.
- विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्यापूर्वी या परीक्षेमुळे आत्मविश्वास येण्यास मदत मिळत असते.
- या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी मुख्य परीक्षेची ओळखीचा होतो, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सराव देखील झालेला असतो.
- विद्यार्थ्यांना विषय चांगला समजला जातो. त्याचबरोबर कोणत्याही विषयांमध्ये काही तक्रारी असतील, तर शिक्षकांच्या ते लवकरच निदर्शनास येऊ शकते, व त्या पद्धतीचे विद्यार्थ्यांना शिकविले जाऊ शकते. तसेच विद्यार्थी देखील पडणाऱ्या गोष्टींवर प्रश्न विचारू शकतात.
- स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला वाव मिळण्याबरोबरच विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. त्याचबरोबर या स्पर्धेमुळे मानसन्मान देखील मिळत असल्यामुळे, जास्तीत जास्त मार्क मिळवण्याकरिता विद्यार्थी प्रयत्न करत असतात.
- राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जात असल्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर असणाऱ्या स्पर्धेचा अवका लक्षात येण्यास मदत मिळत असते.
निष्कर्ष:
दोन दशकापूर्वी अनेक विद्यार्थी असे असत, ज्यांचे पालक क्वचितच उच्चशिक्षित असत किंवा काही विद्यार्थ्यांचे पालक तर शिक्षण घेतलेले देखील नसत. त्यामुळे त्यांना विद्यार्थी कशा स्वरूपाचा अभ्यास करत आहे, किंवा विद्यार्थीची प्रगती किती झालेली आहे, याबद्दल कुठलीही माहिती राहत नसे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोचिंग क्लासेसची संकल्पना देखील फारशी रुजली नव्हती, त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये जेवढा काही अभ्यास करतील तोच काय त्यांचा अभ्यास असे. आणि त्यामुळे गुणवत्ता देखील काहीशी खालच्या स्तरावरच स्थिरावली होती.
मात्र शिक्षित लोक पालक झाल्यानंतर त्यांच्या मुलांना त्यांनी अतिशय उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले, आणि त्यामुळेच कोचिंग इन्स्टिट्यूट सारख्या संस्था देखील अस्तित्वात आल्या. त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थी रोज काय शिकतात, याचा आढावा घेतला जाऊ लागल्यामुळे शाळांना देखील या विद्यार्थ्यांकडे चांगले लक्ष देणे गरजेचे वाटले. आणि त्यातूनच विविध परीक्षा संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे ऑलिम्पियाड स्पर्धेच्या संकल्पना होय.
या अंतर्गत वेगवेगळ्या शालेय विषयांचा अभ्यासक्रमाच्या अंतर्गत काही टेस्ट निर्माण केल्या जात असतात, आणि या टेस्टच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे, व कोणत्या विषयांचा अभ्यास त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे इत्यादी गोष्टींबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते.
ऑलिंपियाड या स्पर्धा शालेय पातळीवर आयोजित केल्या जात असून, शाळा या सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी मुख्य केंद्र समजले जात असते. मात्र या सर्व परीक्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जात असते. अनेक खाजगी किंवा सेवाभावी संस्था देखील अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित करत असतात. ज्याच्या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्रगतीची माहिती मिळवू शकतात.
आजच्या भागामध्ये आपण या ऑलिंपियाड स्पर्धा विषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये ऑलिंपियाड परीक्षा म्हणजे काय असतात, त्यासाठी कोणकोणती पात्रता धारण करणे गरजेचे असते, कोणते विद्यार्थी अशा परीक्षा देऊ शकतात, व या परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या स्वरूपात फायदे होतात इत्यादी माहिती बघितलेली आहे.
FAQ
ऑलिंपियाड स्पर्धा कशा स्वरूपाच्या असतात?
ऑलिंपियाड स्पर्धा या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतात.
ओलंपियाड स्पर्धेमध्ये कोणकोणते विषय समाविष्ट असतात?
ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक यासह अनेक शालेय विषय समाविष्ट असतात.
देशातील सर्वात पहिली ऑलिंपियाड स्पर्धा कोणाच्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती?
देशातील सर्वात पहिली ऑलिंपियाड स्पर्धा होमी भाभा या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
ओलंपियाड स्पर्धा पार पाडण्याचे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणून कोणाला ओळखले जाते?
ऑलम्पिक स्पर्धा पार पाडण्याचे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणून शाळांना ओळखले जाते.
ऑलिंपियाड परीक्षा कोणकोणते विद्यार्थी देऊ शकतात?
ओलंपियाड परीक्षा हे केवळ इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात.