OTP म्हणजे काय ? otp meaning in marathi
OTP ह्या शब्दाचा इंग्रजीत फुलफॉर्म म्हणजे ( one time password)
विकिमित्र च्या सर्व वाचकांचे स्वागत ,मित्रहो आज आपण OTP ह्या शब्दाचा अर्थ, नक्की OTP म्हणजे काय त्याचे प्रकार , OTP हा का वापरला जातो, व कुठे वापरला जातो ह्याची संपूर्ण माहिती ह्या लेखात बघणार आहोत त्यामुळे हा लेख नक्की वाचा…!
आजचे जग हे ऑनलाइन युगाचे आहे.सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतात,ऑनलाइन बँकेचे व्यवहार करतात,म्हणजे आत्ता घरबसल्या माणूस ऑनलाइन राहून सगळी काम करू शकतो.
आजचे जग हे ऑनलाइन शॉपिंग करण्यात खूप पुढारलेले आहे.प्रत्येक जण हे कामात व्यस्त असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करून आपल्या वेळेची बचत करत असतो.
ऑनलाइन व्यवहार करताना,शॉपिंग करताना,पैशांची देवाणघेवाण करताना,वस्तू खरेदी करताना सुरक्षितता ठेवणे खूप महत्वाचे असते.सुरक्षिततेची काळजी घेतली नाही तर बरेच जण हे ऑनलाइन फ्रॉड ला बळी पडतात.इंटरनेट ने मानवाला जेवढे फायदे करून दिले आहेत तेवढा इंटरनेट चा तोटा देखील मानवाने भोगला आहे.
ऑनलाइन बँक व्यवहार करताना खूप काळजी घेण्याची गरज असते.कारण जर आपण जराही हलगर्जीपणा केला तरी आपले अखे बँक खाते रिकामे होऊ शकते.
आपल्या निदर्शनास हे आलाच असेल की कुठेही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना किंवा कुठल्याही अँप वर नोंदणी करताना आपल्या मोबाईल वर एक कोड येतो व त्या पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी आपल्याला तो कोड त्या त्या रकान्यात घालावा लागटोकिवा भरावा लागतो.तर तुम्ही तो कोड तिथे बरोबर टाकला तर प्रोसेस पुढे जाते.नाहीतर तुम्ही प्रक्रियेत पुढे जाऊ शकत नाही.या कोड ला OTP असे म्हणतात.
आजच्या या लेखात आपण OTP बदल माहिती करून घेतोय.
OTP one time pass word हा एकाच वेळी वापरला जाणार पासवर्ड आहे.कॉम्पुटर च्या साहाय्याने हा कोड निर्माण केला जातो. व ज्या मोबाइल वरून नोंदणी झाली आहे.किंवा कुठलिही प्रोसेस चालू केली आहे त्या मोबाईल वर हा पाठवला जातो, हा पासवर्ड सांख्यिक स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात असतो. किंवा ह्या दोन्हीचे मिश्रण असते.
OTP हा इतर कुठल्याही पासवर्ड पेक्षा खूप सुरक्षित असतो.OTP हा sms(संदेश) किंवा email द्वारे च्या माध्यमातून नोंदणी केलेल्या मोबाइल वर किंवा कुठल्याही डिव्हाईस वर पाठवला जातो.OTP हा चार ते आठ या रेंज मधील कितीही अंकांचा असू शकतो.
OTP ला one time password म्हणतात म्हणजेच तो एकाच वेळी वापरला जाऊ शकतो.हा पासवर्ड पाठवण्यामागचे उदिष्ट असे आहे की ज्या डिव्हाईस किंवा मोबाइल वरून नोंदणी झालेली आहे,तो तुमचाच आहे की नाही हे तपासणे .जे तुम्ही अचूक OTP टाकला तर तुम्ही पुढची प्रक्रिया किंवा प्रोसेस करू शकता,जर हा OTP चुकला तर तुम्ही त्या प्रक्रियेत पुढे जाऊ शकत नाही,यामुळे OTP हा अधिक सुरक्षित असतो.
OTP चे प्रकार
sms OTP जो OTP किंवा
पासवर्ड तुम्हाला sms किंवा संदेश द्वारे पाठवला जातो त्याला sms OTP असे म्हणतात.ज्या नंबर वरून नोंदणी झाली आहे तो तुमचाच आहे का हे तपासण्यासाठी sms OTP चा वापर केला जातो.
Voice OTP
या OTP च्या प्रकारामध्ये OTP हा फोनवरून सांगितलं जातो.हा OTP देखील तुमचा नंबर पडताळन्यासाठी वापरला जातो.
ई-मेल OTP
ई-मेल OTP हा ई-मेल द्वारे पाठवला जातो. व हा OTP तुमचा ई-मेल आयडी तपासण्यासाठी पाठवला जातो.
आत्ता आपण OTP चा वापर का केला जातो हे बघुयात.
जर तुम्हाला फेसबुक किंवा व्हाट्सएपचे अकाउंट उघडायचे असेल. आणि तुम्ही चालू केली की तुम्हाला आधी मोबाईल नंबर विचारला जातो.आणि नंबर नोंदणी झाल्यावर तुम्हाला OTP पाठवला जातो,तो कोड टाकून तुम्ही प्रक्रिया पुढे चालू शकता जे एखादा व्यक्ती तुमच्या नंबर चा गैरवापर करत असेल व त्याने तुमचा नंबर वापरून अकाउंट उघडले असेल तर OTP हा तुमच्या नंबर वर येईल तो व्यक्ती जो तुमच्या नंबर चा गैरवापर करतोय OTP न मिळाल्यामुळे पुढच्या प्रक्रियेत जाऊ शकत नाही,हा OTP द्वारे सुरक्षिततेचा मोठा फायदा आहे.
OTP चा वापर होणारी ठिकाणे किंवा साईट्स
OTP चा वापर ऍमेझॉन,फ्लिपकार्ट, फेसबुक, ट्विटर,व्हाट्सअँप,इन्स्टाग्राम,बँक,अँप नोंदणी, ऍडमिशन फॉर्म,स्कॉलरशिप फॉर्म,बांधकाम कामगार नोंदणी,घरकाम महिला नोंदणी…
हा लेख तुमहाला कसा वाटला नक्की कळवा!!