P. V. Sindhu Information In Marathi पी. व्ही. सिंधू ही भारतातील उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू आहे. तिने भारतातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट नावलौकिक करून देशाचे सुद्धा नाव जगामध्ये गाजवले आहे. तिने जिद्द आणि चिकाटीने बॅडमिंटन खेळामध्ये आपले विशेष अशी एक स्थान निर्माण केले आहे. भारतीय महिला बॅडमिंटन असून तिने ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला एकेरी बॅडमिंटन मध्ये रोप्य पदक मिळवून देणारी ही भारतीय पहिली महिला होती. तसेच तिच्या अलौकिक कामगिरीमुळे तिला भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे. हा पुरस्कार सर्वात पहिल्या कमी वयाच्या खेळाडूला मिळालेला आहे जिचे नाव पी.व्ही. सिंधू आहे.
पी. व्ही. सिंधू यांची संपूर्ण माहिती P. V. Sindhu Information In Marathi
पी व्ही सिंधू हिचा जन्म व बालपण :
पी. व्ही. सिंधू यांचा जन्म आंध्र प्रदेश मधील हैदराबाद येथे 5 जुलै 1995 ला एका तमिळ कुटुंबामध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव रमण आणि आईचे नाव विजया असे होते. हे दोघेही राष्ट्रीय स्तरावरील माजी हॉलीबॉल फोटो होते. पी. वी. रमण यांनी 1986 मध्ये साऊथ कोरियामध्ये झालेल्या अशियन स्पर्धेत कास्यपदक पटकावले होते.
त्यांनी हॉलीबॉल खेळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून 2000 मध्ये भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. सिंधू तिची आई विजया ही मूळची आंध्र प्रदेश मधील विजयवाडा येथील आहे. तिची आई आणि वडील राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे लहानपणापासूनच पी व्ही सिंधू हिच्यामध्ये खेळाविषयी आवड निर्माण झाली होती तसेच तिच्या आई-वडिलांनी जसे खेळामध्ये आपले करिअर केले तसेच तिने सुद्धा हॉलीबॉल पेक्षा बॅटमिंटनमध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.
पी. व्ही. सिंधू हिचे शिक्षण :
पी. व्ही. सिंधू हिचे शालेय शिक्षण हे ऑक्सिलियम हायस्कूल हैदराबाद मधून पूर्ण झाले. त्यानंतरचे शिक्षण तिने एसटी अन्स कॉलेज ऑफ वुमेन हैदराबाद येथे पूर्ण केले. तसेच तिने शिक्षणाबरोबर बॅडमिंटनमध्ये सुद्धा सराव केला.
बॅडमिंटन या खेळातील कारकीर्द :
पी. व्ही. सिंधू हिला लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळायला आवडायचे, त्यामुळे तिने बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय लेव्हलचे खेळाडू तसेच 2001 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन फुललेला गोपीचंद याचा प्रभाव तिच्यावर पडला. त्यामुळे तिने वयाच्या आठव्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली.
बॅडमिंटनचे तिचे प्रथम शिक्षक म्हणून महबूब अली हे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॅडमिंटन खेळामध्ये असलेली मूलभूत माहिती शिकून घेतली. त्यानंतर शिकंदराबाद येथे भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट मधून तिने प्रशिक्षण घेतले व पुढे फुललेला गोपीचंद अकॅडमी मध्ये तिने प्रवेश घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
जेव्हा सिंधू 14 वर्षाची झाली, तेव्हा तिने 2009 पासून बॅटमिंटन खेळण्यास सुरुवात केली आणि येथूनच तिची कारकीर्द सुरू झाली 2009 ला श्रीलंका मधील कोलंबो येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी झाली आणि त्यामध्ये तिला कास्यपदक मिळाले होते.
2010 मध्ये तिने इराण हजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंजमध्ये कास्यपदक जिंकले जे एकेरी स्पर्धेत होते तसेच त्यानंतर तिने BWF वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिपची उपाध्यपूर्व फेरीमध्ये झाली, तेव्हा चिनी खेळाडूचा पी. व्ही. सिंधू कडून पराभव झाला.
2011 हे वर्ष तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण त्यावर्षी मालदीव इंटरनॅशनल चॅलेंज आणि इंडोनेशिया इंटरनॅशनल चॅलेंज तसेच भारतात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तिने जिंकला होत्या. 2012 मध्ये ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिप मध्ये ताई त्झु – यिंगकडून पराभव झाला आणि त्याच वर्षी तिने जपानी खेळाडू नोझोमीहारचा पराभव करून अशीही ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकली.
2014 इंडिया ओपन ग्राउंड फ्री बोर्डच्या अंतिम फेरीमध्ये तिला सायना नेहवाल ने पराभूत केले होते तेव्हा थायलंडचा बॅटमिंटन स्टार बुसाननचा पराभव करून ओंगबामरूंगफानचा पराभव करून तिने अशीही चॅम्पियनशिप जिंकली. 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिला एकेरी फेरीमध्ये पराभूत झाल्यानंतर बी डब्ल्यू एफ जागतिक बॅटमिंटन चॅम्पियनशिप मध्ये तिने सलग दोन पदके जिंकणारी भारतीय पहिली महिला ठरली.
2015 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यामध्ये कोरियन खेळाडू सुंजीहून याने प्लीज रुईचा पराभव केला आणि त्याच वर्षी स्ट्रेस फॅक्चरमुळे तिला सहा महिने खेळणे थांबवावे लागले होते. स्कॉटलंडच्या स्क्रीन मारो कडून पराभूत झाल्यानंतर महिला एकेरी स्पर्धेत मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोड जिंकून पी व्ही सिंधू चे 2016 मध्ये एक महत्त्वाची वर्ष बनले.
2017-18 मध्ये तिने दिल्लीतील इंडिया ओपन सुपर सिरीजमध्ये जागतिक क्रमवारीत एक नंबर खेळाडू कॅरोलिनाला पराभूत करून प्रसिद्ध मिळवली आणि त्याच वर्षी ती जपानच्या कुहारला हरवून कोरिया ओपन जिंकणारी भारतीय पहिली महिला ठरली. त्यावेळी तिला उपजिल्हाधिकारी म्हणून पद मिळाले. पी. व्ही. सिंधुने 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि मिश्र संगीत स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच तिने सलग दुसऱ्या जागतिक स्पर्धेत रोप्य पदकासह जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चार पदके जिंकले. सीजन एंडिंग बी डब्ल्यू एफ सुवर्णपदक जिंकून तिने देशाला संबंधित केले.
पी. व्ही. सिंधूची वैयक्तिक माहिती :
पी व्ही सिंधू सिंधू हे 2013 च्या जुलै महिन्यापासून भारत पेट्रोलियमच्या हैदराबाद कार्यालयात सहाय्यक क्रीडा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. ऑलिंपिक मध्ये योग्य पदक मिळाल्यानंतर तिची उपक्रीडा व्यवस्थापक म्हणून सुद्धा निवड करण्यात आली. जुलै 2017 मध्ये तिला ब्रिज स्टोन इंडियाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. याचा पदभार तिने ऑगस्टमध्ये स्वीकारला होता. 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात तिला भारतीय दलाची ध्वजावाहक होती.
मार्च 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात असे मनमूद केले आहे की, प्रत्येक दिवसाच्या अनुमोदनाच्या कमाईच्या बाबतीत पी व्ही सिंधू ही भारतीय क्रिकेटर विराट कोहली नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ती जेबीएल, ब्रिजस्टोन टायर्स, स्पोर्ट्स, ड्रिंक गेटो, रेड पेन रिलीवर, नोकिया, मिंत्रा इत्यादी कंपनीशी सुद्धा तिने करार केले आहेत.
फेब्रुवारी 2019 मध्ये तिने चिनी क्रीडा ब्रँड लिंग सोबत 500 दशलक्षचा चार वर्षाचा क्रीडा प्रायोजक करार केला आहे आणि तिचा हा करार बॅडमिंटन मधील जगातील सर्वात मोठा करार आहे असा मानला जातो.
पी व्ही सिंधू हिला मिळालेले पुरस्कार :
- पी व्ही सिंधू हिला 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे.
- भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री मिळालेला आहे. हा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला.
- राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार 2016 मध्ये मिळाला.
- पद्मभूषण हा पुरस्कार दिला 2020 मध्ये मिळाला.
FAQ
पी. व्ही. सिंधू चे पूर्ण नाव काय आहे?
पुसारला वेंकट सिंधू.
पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी निगडित आहे?
बॅडमिंटन.
पी. व्ही. सिंधू यांचा जन्म कधी झाला?
5 जुलै 1995 रोजी.
पी. व्ही. सिंधू चा जन्म कुठे झाला?
पी. व्ही. सिंधूचा जन्म हैदराबाद मधील तेलंगणा या शहरात झाला.
पी. व्ही. सिंधू हिच्या वडिलांचे नाव काय आहे?
पी. वी. रमण