पालक भाजी रेसिपी मराठी Palak bhaji Recipe in Marathi

पालक भाजी रेसिपी मराठी  Palak bhaji Recipe in Marathi  पालेभाज्यांचे महत्व आपल्या आरोग्यासाठी किती आहे, हे आपण सांगू शकत नाही.  कारण पालेभाज्यांमध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीरासाठी मोलाचे कार्य करतात.  आपल्या आरोग्यासाठी पालेभाज्यांचा जेवणामध्ये नियमित वापर करण्याचा सल्ला डॉक्टर तसेच आहार तज्ञ नेहमीच सांगत असतात.  पालक हा आपल्या शरीरामध्ये अन्नपचन चांगले करण्यासाठी आवश्यक असतो.  त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते.  शिवाय पालकातून शरीराला अत्यंत आवश्यक असलेली पोषणमूल्य देखील मिळतात.  काही लोकांना पालेभाज्या व त्यातल्या त्यात पालकाची भाजी आवडतच नाही.  लहान मुलांना देखील पालेभाज्यांचा कंटाळा येतो.  तर आज आपण अशीच पालक भाजी रेसिपी बघणार आहोत, जी तुम्हाला नक्कीच आवडेल.

Palak bhaji

पालक भाजी रेसिपी मराठी  Palak bhaji Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

पालकाची भाजी करण्याची पारंपारिक पद्धत व प्रकार अनेक आहेत.  परंतु आत्ताच्या मुलांना व मोठ्यांना देखील चायनीज फुड, स्नॅक्स व तळलेले पदार्थ खूप आवडतात.  त्यामुळे पालक ही रेसिपी बरेच जण खात नाहीत. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर त्याचा होत असतो.  परंतु पालकाची अनेक  प्रकारची भाजी आपण करू शकतो, जी मुलांना देखील आवडू शकेल.  जसे की पालक पराठा, आलू पालक भाजी, पालक आमटी, पालक पनीर, मटर पालक, पालक भजी व पालक पुरी इत्यादी.  तर चला मग जाणून घेऊया पालक भाजी रेसिपी तयार करण्याकरता लागणारे सामग्री.

ही रेसिपी किती जणांकरिता आहे ?

ही रेसिपी आपण 4 जणांंकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करताना वेळ  :

पालक रेसिपी करत असताना, आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते. त्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

पालक भाजी शिजवण्याकरता आपल्याला 15 मिनिटे लागतात.

टोटल टाईम  :

पालक भाजी रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 25 मिनिटे लागतो.

साहित्य :

1)  एक बारीक चिरलेली पालकाची जुडी

2)  दोन चमचे तेल

3)  अर्धा कप चिरलेला कांदा

4) अर्धा चमचा जिरे

5) एक आलं लसूण पेस्ट

6)  दोन ते तीन हिरव्या मिरच्या

7)  पाव चमचा हळद

8)  पाव चमचा लाल तिखट

9) अर्धा कप तूर डाळ

10) दिड कप पाणी

11)  अर्धा चमचा कस्तुरी मेथी

12)  पावसाचा गरम मसाला

13) आवश्यकतेनुसार मीठ

14)  एक बारीक चिरलेला टोमॅटो

पाककृती  :

  • पुदिना चटणी मराठी
  • सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्यावा व तो बारीक चिरून घ्यावा.
  • नंतर तूर डाळ स्वच्छ धुऊन घ्या.  छोट्या कुकरमध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा परतून घ्या तसेच आले लसूण ची पेस्ट व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून चांगले परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घाला व शिजवून घ्या.
  • नंतर त्यामध्ये हिंग, हळद, तिखट व धने पूड घाला हे मिश्रण चांगले परतून घ्या.  मग यामध्ये धुतलेली तूरडाळ टाका.  नंतर त्यामध्ये दीड कप पाणी टाका व कुकर चे झाकण लावून डाळ चांगली शिजवून घ्या.
  • डाळ शिजली की ते रवीने घुसळून घ्या त्यामध्ये चिरलेला पालक गरम मसाला व कस्तुरी मेथी घालून घ्या.
  • नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला व ढवळून घ्या तसेच कुकर परत गॅसवर ठेवून डाळ पालक शिजेपर्यंत शिजवून घ्या.
  • डाळ घट्ट झाली असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घाला व उकळी आल्यानंतर चविष्ट डाळ पालक तयार आहे.
  • डाळ पालक भाजी भात, पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकता.

पोषक घटक  :

डाळ आणि पालक एकत्रित मिक्स करून भाजी केल्यामुळे त्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन तयार होते तसेच ते शरीरासाठी खूपच आवश्यक असते.  पालकामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला ते खूप आवश्यक आहे.  तसेच डाळीमध्ये प्रोटीन, प्रथिन आणि पिष्टमय पदार्थ असतात.  जे शरीरातील अन्नपचन क्रिया सुरळीत करते

फायदे  :

जाड पाडा खाल्ल्याने आपल्या शरीराला प्रथिने, लोह आणि कॅल्शियम ही महत्त्वाची खनिजे मिळतात.

ज्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते तसेच हाड व स्नायू मजबूत होतात.

डाळ पालकचे जेवण केल्यामुळे आपल्या शरीराला फायबर आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळतं.

पालक हे डोळ्यांसाठी देखील महत्त्वाची आहे नियमित पालक भाजी खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगलं राहतं.

डाळ -पालक खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.  तसेच पोटाचे आरोग्य देखील व्यवस्थित राहते.

तोटे  :

डाळ व पालक भाजीचे अति प्रमाणात सेवन केले तर त्यातील फायबरमुळे आपले पोट दुखण्याची शक्यता असते तसेच ऍसिडिटीचा त्रास सुद्धा होऊ शकतो.

त्यामुळे आपण ही डाळ पालक भाजी प्रमाणातच खाल्ली पाहिजे.  ही भाजी प्रमाणात खाल्ली तरच आपल्या शरीराला त्याचा फायदा मिळतो.  अन्यथा त्यापासून आपल्या शरीराला हानी देखील होऊ शकते.

तर मित्रांनो, डाळ पालक भाजी रेसिपी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा पोहे रेसिपी घरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल.

Leave a Comment