पालक पराठा मराठी Palak Paratha Recipe in Marathi हिरवे पालेभाज्यांचा जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश करावा बऱ्याचदा आपल्याला डॉक्टरांकडून ऐकायला मिळतं. पालक, मेथी, शेपू इत्यादी भाज्या पौष्टिक आहेत. यापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. पालक पराठा हा एक पौष्टिक पदार्थ आहे. पालक या भाजीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले जातात. आज आपण पालक या भाजीपासून पराठे रेसिपी तयार करणार आहोत. तेही अत्यंत चविष्ट व कुरकुरीत ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून तयार करावी लागते. तर चला मग या रेसिपी विषयी माहिती बघूया.
पालक पराठा मराठी Palak Paratha Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
पालक या भाजीमध्ये जीवनसत्व, कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. पालक पराठ्यांमध्ये वापरून त्याची स्वादिष्ट व खमंग असे पराठे तयार केले जातात. आजकाल बाहेर स्टॉलवर देखील पालक पराठे हे उपलब्ध असतात. परंतु आपण आपल्या घरी स्वच्छ पद्धतीने पालक पराठे रेसिपी तयार करू शकतो. पालक भाजी पासून आपण पालक पनीर, पालक भजी, पालक पकोडे, पालक पुरी, पालक सूप, पालक भाजी, पालक आमटी यांसारखे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. परंतु आज आपण पालक या भाजीपासून पराठे रेसिपी तयार करणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया पालक पराठे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
या रेसिपीला कुकिंग करण्याकरिता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
पालक पराठे रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
पालक पराठे रेसिपी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :
1) तीन वाटी गव्हाचे पीठ
2) दोन वाटी बारीक चिरलेला पालक
3) एक चमचा जिरे
4) तूप
5) एक चमचा आलं लसूण पेस्ट
6) पाव चमचा हळद
7) एक चमचा साखर
8) अर्धा चमचा गरम मसाला
9) अर्धा चमचा ओवा
10) चवीनुसार मीठ
11) पाणी
पालक पराठा बनवण्याची पाककृती :
- वांग्याचे भरीत मराठी रेसिपी
- पालक पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम पालकाची भाजी स्वच्छ धुवून निवडून घ्यावी. नंतर ही भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या पेस्ट बनवत असताना त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्या.
- नंतर एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये ओवा, जिरे, लसूण पेस्ट, पालक पेस्ट, साखर, गरम मसाला, मीठ घालून हे मिश्रण छान मळून घ्या. हे पीठ मळत असताना पाण्याचा वापर देखील केला तरी चालेल.
- मळलेले पीठ दहा मिनिटे झाकून ठेवा. म्हणजे ते चांगले मुरेल. पराठे करण्याआधी हे पीठ छान आणखीन मळून घ्या.
- नंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
- आता एक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा व त्यावर पुढील प्रमाणे पराठे जाडसर लाटून दोन्ही बाजूंनी तूप टाकून खरपूस छान भाजून घ्या.
- भाजल्यानंतर पराठा प्लेटमध्ये काढा. अशाप्रकारे सर्व पराठे तयार करून घ्या. आता तुम्ही हे पराठे पुदिना चटणी, टोमॅटो सॉस, लोणचे, आलू चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.
- तुम्ही पालक पराठ्यामध्ये हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरचीचा वापर देखील करू शकता.
- पालक पराठ्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवल्यास तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गरमागरम पराठा तयार करू शकता.
- पालक पराठे मधील पोषक घटक :
- पालक भाजी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पौष्टिक आहे. पालक या भाजीमध्ये फायबर, विटामिन के, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात. त्यातील बहुतांश कॅलरीज, प्रथिने आणि कर्बोदके देखील मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून पालक पराठे हे एक पोषक पदार्थ आहे.
पालक पराठे खाण्याचे फायदे :
पालक पराठे एक पौष्टिक पदार्थ आहे. पालक पराठे खाल्ल्यामुळे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे विटामिन तसेच खनिजे मिळतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पालक पराठे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही, तसेच वारंवार भूक देखील लागत नाही. पालकांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.
पालकमध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पालक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आपले शरीर फिट राहते तसेच रक्तातील शर्करा देखील नियंत्रणात राहते.
पालकच्या नियमित सेवनाने डोळ्यांची तेजी कायम राहते. डोळ्यांच्या विकारासाठी पालक हे उत्तम औषधी आहे. पालकांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील असते. त्यामुळे हाडे बळकट होण्यास मदत होते. तसेच नियमित पालकांचे सेवन केल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते.
तोटे :
पालक पराठे ही रेसिपी पौष्टिक असली तरीही या रेसिपीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे जर आपण पालकाची अति प्रमाणात सेवन केले तर आपल्याला उलट्या किंवा मळमळ सारखा त्रास होऊ शकतो. तसेच पोटदुखी देखील होऊ शकते, म्हणून आपण पालक पराठे हे प्रमाणातच खायला पाहिजेत.
तर मित्रांनो, तुम्हाला पालक पराठे ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.