पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Palghar Information In Marathi

Palghar Information In Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण पालघर या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत, कारण पालघर जिल्हा हा कोकण विभागात महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जुन्या ठाणे जिल्ह्यातून नवीन पालघर जिल्हा तयार झाला.

Palghar Information In Marathi

पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Palghar Information In Marathi

महाराष्ट्र राज्यातील 36 वा जिल्हा पालघर!ऐके काळी ठाणे जिल्हयाचा भाग असलेला आणि जवळजवळ 25 वर्ष चाललेल्या अविरत संघर्षानंतर 1 ऑगस्ट 2014 ला अस्तित्वात आला पालघर जिल्हा!

अरबी समुद्राच्या पश्चिम तिरावर हा जिल्हा वसलेला असुन या जिल्हयाच्या भोवती सहयाद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत.आपल्या देशात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा एकमेव जिल्हा आहे.

पालघर जिल्हा ठाणे जिल्हयापासुन 52 कि.मी. आणि मुंबईपासुन 74 कि.मी. अंतरावर आहे.जिल्हयाच्या पुर्वेला सहयाद्रिच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग असा समुद्र तव्दतच जंगल, डोंगर कपारींनी हा जिल्हा समृध्द आहेया पालघर जिल्हयातील डहाणु येथील चिक्कु आणि वसईची केळी महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द आहेत.

पालघर जिल्ह्याची स्थापना

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली.

पालघर जिल्ह्याचा इतिहास

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचा कब्जा होता त्यावेळी त्या काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचे हे साम्राज्य उध्वस्त करून लावत जवळपास पावणे तीनशे वर्षांपूर्वी मराठी झेंडा वसईमध्ये रोवला.

तर जव्हार येथील मुकणे राजे हे खूप प्रसिद्ध राजे होते, त्याच्या राज्याला शिवाजी महाराजांनी सुद्धा भेट दिली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942 च्या चले जाओ या आंदोलनामध्ये पालघर हे सर्वात महत्त्वाचे केंद्र होते ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात 14 ऑगस्ट 1942 रोजी उठाव झाला होता त्यात पालघर हे उठावाचे मुख्य केंद्र होते. या उठावा मध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते.

त्यामध्ये सातपाटीचे काशिनाथ पागधरे, नांदगावचे गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र तिवारी, मुरबे येथील रामचंद्र चोरी, शिरगावचे मोरे युद्धात स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देताना शहीद झाले या शहीदांना स्मृती आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना म्हणून पालघरमध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे आहे.

पालघर जिल्ह्याचा भूगोल

पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला गुजरात आहे. ईशान्येला नाशिक आहे. दक्षिणेला ठाणे , पश्चिम बाजूला अरबी समुद्र आपल्याला दिसतो आणि वायव्य दिशेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे.

पालघरचे साधारण तीन विभाग पडतात. पहिला विभाग म्हणजे डोंगरांच्या रांगा असून तो जंगल पट्टी या नावाने ओळखला जातो. यामध्ये जव्हार मोखाडा विक्रमगड या तालुक्यांचा समावेश आहे दुसरा विभाग बंदर पट्टी म्हणून ओळखला जातो यामध्ये वसई, पालघर, डहाणू हे तालुके येतात तिसरा विभाग सपाटीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण सखल प्रदेशाचा उत्तर भाग आहे. यात दक्षिणेस उल्हास खोरे व उत्तरेकडील डोंगराळ वैतरणा खोरे तसेच पठार व सह्याद्रीच्या उतारासह विस्तृत अ‍ॅम्फीथिएटरचा समावेश आहे.

पूर्वेकडील सह्याद्रीच्या अगदी उतारापासून उत्तरेकडे आणि जिल्ह्याच्या मध्यभागी पठाराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडील उल्हास दरीपर्यंत जमीन खाली येते. रस्त्याद्वारे पालघर ते मुख्यालयातील वेगवेगळ्या वाड्या भागांचे अंतर खालीलप्रमाणे आहे.

खोडाळा 138 किमी, मोखाडा 112 किमी, जव्हार 75 किमी, विक्रमगड 60 किमी. जिल्ह्यातून वाहणारी मुख्य नदी वैतरणा आहे. नदीला अनेक उपनद्या आहेत; त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारवी आणि भातसा, पिंजाल, सूर्य, दहेरजा आणि तानसा.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगरात गोदावरीच्या उगमस्थानाच्या उलट कोकणातील नद्यांचा सर्वात मोठा वैतरणा होता.वैतरणा नदीचे उगम स्थान हे नाशिक मधील त्रंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर आहे.

लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार आता जिल्ह्याचा समावेश असलेल्या तालुक्यांची लोकसंख्या 2,990,116 आहे. पालघरची शहरी लोकसंख्या 1,435,210 आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 48% शहरी भागात राहतात. जिल्ह्याचे

क्षेत्रफळ 9558 वर्ग कि.मी. असून एकुण गावं 1008 आणि 3818 पाडे आहेत.

पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.

लिंग गुणोत्तर प्रमाण

1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 887 एवढे आहे. पालघर जिल्हयात आदिवासी समाज मोठया संख्येने वास्तव्याला आहे.

धोडिया, कोळी महादेव, दुबळा, कोळी मल्हार, कोकणा, कातकरी आणि वारली या आदिवासी जमाती प्रामुख्याने वास्तव्याला आहेत.

पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे.

हवामान

पालघर या जिल्ह्यास एकून ११२ कि.मी एवढया लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे .जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान सामुरे २४५८ मि.मि. एवढे आहे .

पालघर जिल्ह्याचे तापमान गरम आणि दमट या प्रकारचे असते.  अधिकतम: ४०.६ अंश सेल्शिअल न्यूनतम ८.३ अंश सेल्शिअल असते.

शेत

जव्हार, मोखाडा व विक्रमगड या डोंगराळ जंगलपट्टी भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे .

या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते . तसेच अलीकडच्या काळात हळद लागवडीचा प्रयोगदेखील यशस्वी झालेला आहे . याशिवाय जंगलातील लाकूडफाटा गोळा करणे व जंगलातील मध , लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादाने गोळा करणे हादेखील व्यवसायाचा एक भाग आहे .

पालघरमधील प्रमुख शेती उत्पादने भात, कडधान्य, आंबा, मका, मिरची, उडीद, डहाणू चा चिकू, वसईची केळी पालघर जिल्ह्यातील मुख्य उत्पादने आहेत.

उद्योगधंदे

पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यात कोकाकोला, ओनिडा सारखे कारखाने आहेत.शहराला लागुनच फार मोठी औद्योगिक वसाहत असनु येथे अवजड यंत्राचे, औषधांचे, रसायनांचे, कपडयांचे कारखाने आहेत.समुद्राजवळच्या भागात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे

कोळंबी आणि पापलेट या माश्यांची येथुन जास्त प्रमाणात निर्यात केली जाते.आशिया खंडामधील सगळयात मोठी तारापुर औद्योगिक वसाहत या जिल्हयात भोईसर नजीक आहे.

पालघरमध्ये तारापूर येथे भारताचा पहिला अणु उर्जा प्रकल्प आहे. तारापूर एमआयडीसी येथे बोईसर हे औद्योगिक शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रात आहे. सातपाटी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी बंदर आहे. डहाणू, अर्नाळा, वसई आणि दातीवेयर हेही मासेमारीसाठी मोठी बंदरे आहेत. डहाणू संपूर्ण भारतात त्यांच्या चिकू उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. डहाणूच्या बोर्डी बीचवर दरवर्षी एक विशेष चिकू उत्सव भरतो.

महावितरण जिल्हाभरातील सर्व शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करतो. एप्रिल 2015 मध्ये गुजरात गॅसला जिल्हाभरातील सर्व शहरी व ग्रामीण भागात संकुचित नैसर्गिक गॅस आणि पाईपयुक्त नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यास अधिकृत करण्यात आले आहे.

बंदरपट्टी भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे, कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात.

पालघर तालुक्यातील आलेवाडी, दांडी, दातिवरे, नवापूर, नांदगांव बंदर, मुरबे, सातपाटी, तसेच वसई तालुक्यातील अर्नाळा, किल्ला बंदर, नायगांव, पाचू बंदर, आणि डहाणू तालुक्यामधील चिंचणी, डहाणू व बोर्डी या ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत.

मासे टिकविण्यासाठी शीतगृहे तसेच तसेच आईस कारखाना या व्यवसायात देखील रोजगार निर्मिती होते . पालघर तालुक्यातील सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते .

जिल्ह्यातील सपाट पठारी प्रदेशामध्ये औद्योगिक पट्टे अस्तित्वात आहेत. यामध्ये मुख्यतः कापड उद्योग, रासायनिक कारखाने, अभियांत्रिकी उद्योग, स्टील उद्योग इत्यादीचा समावेश आहे.

बोईसर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक विभागात टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, विराज स्टील, यांसारख्या पोलाद निर्मितीचे कारखाने आहेत, तसेच डी-डेकॉर, सियाराम यांसारख्या कापड निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.

या उद्योगांमुळे या परिसरात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व पूरक व्यवसाय निर्मिती झालेली आहे .वाडा तालुक्यामध्ये ओनिडा, कोकाकोला यासारखे कारखाने आहेत.

वसई तालुक्यातील वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रे विकसित झाली आहेत. डहाणू तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील तारापूर येथे घरोघरी पारंपरिक डायमेकिंग हा प्रमुख व्यवसाय केला जातो .

रस्ते व वाहतूक

रेल्वे स्थानकाच्या सोयीमुळे गुजरात राज्यातील व्यापारी पालघरशी जोडले गेले आणि बरेचसे येथेच स्थायीक झाले.

मुंबई या महानगराच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर पालघर हे विरार रेल्वे स्थानकाच्या पुढे चैथ्या क्रमांकाचे स्थानक आहे, व्यापाराकरता हे रेल्वे स्थानक महत्वाचे मानले जाते.

पालघर शहर रेल्वे, रस्ते आणि समुद्र मार्गाने मुंबई आणि गुजरात राज्याशी जोडलेले आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे शैक्षणिक, औद्योगिक आणि शहरी प्रगतीस खूप वाव आहे. पालघर येथून महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत.

जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे असून रस्ते व रेल्वेने इतर तालुक्यांशी जोडलेले आहेत. यामध्ये डहाणू वसई हे तालुके रेल्वे व रस्ते या दोन्ही मार्गानी जिल्ह्य मुख्यालयाशी जोडलेले आहेत.

पालघर मनोर वाडा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक ३४ ने वाडा विक्रमगड,जव्हार हे तालुके जोडलेले आहेत . जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० कि.मी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -८(मुंबई आहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ) हा मार्ग जात असून डहाणू व तलासरी हे तालुके जोडलेले आहेत.

कला

आदिवासींच्या संस्कृतीमुळे आणि त्यांच्या चित्रकलेमुळे प्रसिध्द आहे.तारपा नृत्य आणि वारली चित्रकला ही आदिवासींच्या समाजजिवनाची ओळख या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment