पनीर कोफ्ता करी रेसिपी मराठी | paneer kofta curry recipe in marathi

पनीर कोफ्ता करी रेसिपी मराठी | paneer kofta curry recipe in marathi

खवय्ये बंधू आणि भगिनींनो आज आपण पनीर कोफ्ता करी रेसिपी मराठी ( paneer kofta curry recipe in marathi ) या लेखात पाहणार आहोत.

कोफ्ता करी रेसिपी मराठी साहित्य ( paneer kofta curry recipe in marathi ingredients )

  • 4 कप कांदा पेस्ट
  • 2 कप टोमॅटो प्युरी
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट(तुमच्या अवडीनुसासर प्रमाण कमी जास्त करू शकता)
  • 1 चमचा धनेपूड
  • 1 चमचा जिरेपूड
  • 1 कप दूध
  • 3 ते 4 चमचे तेल
  • 8 ते 9 पनीर चे तुकडे
  • मीठ चवीनुसार
  • गारनिशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • 4 द्राक्षे तुकडे केलेलं

कोफ्ता करी बनवताना आधी करी बनवून घ्यावी.म्हणजे तुमचे कोफ्ते नरम पडणार नाहीत.

कोफ्ता करी रेसिपी मराठी कृती ( paneer kofta curry recipe in marathi )

सर्वप्रथम करी बनवण्यासाठी 4 कप कांदा पेस्ट व 2 कप टोमॅटो प्युरी घ्यावी. एका कढईत 3 ते 4 चमचे तेल गरम करून घायचा आहे. त्यात जिरे टाकून चांगले तडतडू द्यावे.चांगली फोडणी बसली की त्यात कांदा पेस्ट चांगली परतून घ्यावी, कांदा पेस्ट चांगली परतली की टोमॅटो प्युरी घालून चांगलं तेल सुटेस पर्यंत परतून घ्यावे. मसाल्याला चांगले तेल सुटले की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून चांगली मिसळून घ्यावी.

दाल मखनी रेसिपी मराठी | dal makhani recipe in marathi येथे वाचा

या मसाल्यात आत्ता सुके जिन्नस घालून घायचे आहे.अर्धा चमचा हळद,एक ते दीड चमचा लाल तिखट,एक चमचा गरम मसाला,एक एक चमचा प्रत्येकी जिरेपूड,धनेपूड,हे सर्व मसाले घालून मसाला चांगला तेल सुट्सपर्यंत परतून घ्यावा मसाला परतून घेताना त्यावर अर्धे झाकण ठेवले तरी चालेल.

आपल्याला करी किती घट्ट हवी ह्याचा अंदाज घेऊन पाणी घालावे .उ उकळी काढून घ्यावी.त्यात एक कप दूध घालावे मग चांगली उकळी आली व भाजी हवी तितकी घट्ट झाली की गॅस बंद करावा.
आता कोफ्ते बनवून घ्यावे.

कोफत्यासाठी लागणारे साहित्य ( paneer kofta ingredients in marathi )

कोफत्यासाठी कृती

एका बारीक कढईत एक चमचा बटर घाला. त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घाला तो ब्राऊन होईसपर्यंत परतून घ्यावा.त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला,काजूचे तुकडे,मनुके घालून परतून घ्यावे.त्यांनतर एक कप किसलेलं पनीर घालून मीठ घालून परतून घ्यावे.

हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यावे व थंड करून घ्यावे.त्या मिश्रणात शिजवून किसलेला बटाटा,व त्यात कॉर्न फ्लॉर घालून मिश्रण एकजीव करून घ्याव.व झाकून ठेवाव.

या मिश्रणा चे गोळे करून घ्यावे. एका वाटीत कॉर्न फ्लेक्स चा चुरा किंवा ब्रेड क्रम्स घ्यावे त्यात हे गोळे घोळवून तेलात तळून घ्यावे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यावे.

कोफ्ता करी सर्व्ह करण्यासाठी आधी बनवलेली करी उकळून घ्यावी व त्यात कोफ्ते घालावे 5 मिन गॅस मंद आचेवर ठेऊन प्लेट मध्ये काढून घ्यावे व त्यात कोथिंबीर घालून गारनिशिंग करावे व त्यावर द्राक्षाचे तुकडे घालून गारनिशिंग करावे व डिश सर्व्ह करावी.

तर पनीर कोफ्ता करी रेसिपी मराठी ( paneer kofta curry recipe in marathi ) कशी वाटली नक्की कळवा.

Leave a Comment