पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी Paneer Tikka Masala in Marathi पनीर टिक्का ही रेसिपी सर्वांच्याच आवडीचे आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात या रेसिपीला मागणी असते. पनीर टिक्का रेसिपी नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. पनीर टिक्का आणि रोटी बऱ्याच लोकांची पसंत आहे. परंतु घरच्या घरी हॉटेल सारखी पनीर टिक्का रेसिपी करायची म्हटली तर आपल्याला तसा मसाला जमत नाही अशा अनेकांच्या तक्रारी असतात; परंतु आम्ही तुमच्याकरता खास पनीर टिक्का रेसिपी विषयी माहिती घेऊन आलो आहोत. अगदी सहज सोप्या पद्धतीने हॉटेल सारखा पनीर टिक्का मसाला रेसिपी तुम्हाला बनवता येईल. कारण प्रत्येकालाच वेगळं काही करून खाण्याची आवड असताना, त्यांना हॉटेलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही तसेच ज्यांच्या भागांमध्ये अशा प्रकारच्या रेसिपीज मिळत नाही. खास त्यांच्याकरता घरच्या घरी पनीर टीका मसाला तुम्ही करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हालाही कळवा.
पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी Paneer Tikka Masala in Marathi
रेसिपी प्रकार :
पनीर टिक्का मसाला ही रेसिपी आपण विविध पद्धतीने करू शकतो किंवा ती बनवण्याची पद्धत मात्र वेगळी असू शकते. पनीर पासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात पनीर कुर्मा, पनीर भुर्जी, पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर कोफ्ता इत्यादी. पनीर पासून तिखट पदार्थ बनवतात असे नसून गोड पदार्थ सुद्धा बनवले जातात. पनीर टिक्का मसाला ही रेसिपी भारतातील प्रत्येक हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही रेसिपी बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टोमॅटो मिरची, कांदा खोबरे भाजून त्यांची पेस्ट बनवली जाते व मिरची पावडर मसाला टाकून त्याची ग्रेव्ही बनवली जाते. आणि नंतर त्या ग्रेव्हीमध्ये लालसर झालेले पाहिजे तुकडे टाकले जातात पनीर टिक्का मसाला ही रेसिपी भारतीय असून भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध असते. तर चला मग जाणून घेऊया पनीर टीका मसाला रेसिपीसाठी लागणारे साहित्य.
साहित्य :
1) तीन टोमॅटो
2) मोठे दोन कांदे
3) दोनशे ग्रॅम फ्रेश पनीर
4) दोन सिमला मिरची
5) एक मोठा चमचा बेसन
6) अर्धी वाटी ताजे दही
7) आलं लसूण पेस्ट दोन चमचे
8) एकहिंग
9) लाल तिखट एक चमचा
10) हळद
11) दोन चमचे धने जिरे पावडर
12) कोथिंबीर
13) एका लिंबाचा रस
14) कसुरी मेथी एक चमचा
15) किचन किंग मसाला छोटा चमचा
16) गरम मसाला एक छोटा चमचा
17) चवीनुसार मीठ
18) तेल
19) दोन कप पाणी.
पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर पनीर मसाला तयार करून घ्यायचा आहे.
- पनीर मसाला तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये शिमला मिरचीची चौकोनी केलेले काप, आले-लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, एक लहान चमचा कश्मीरी लाल तिखट, चवीपुरते मीठ, धने-जिरे पावडर लिंबाचा रस आणि चार मोठे चमचे दही एकत्र करून ते मॅरीनेट करायचे आहे. तोपर्यंत पनीर फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवून द्या.
- नंतर त्यामध्ये चार चमचे तेल घालून हे सर्व मिश्रण फ्राय करून घ्या. तोपर्यंत तीन ते चार मिनिट मिश्रण शिजवून घ्या. हे मिश्रण शिजवत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही.
- हे मिश्रण फ्राय करत असताना जळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.
- आता ग्रेव्हीसाठी लागणारी कृती :
- एका कढाईमध्ये चार छोटे चमचे तेल घाला. तेल तापले की त्यामध्ये एक चमचा जिरे टाका.
- नंतर त्यामध्ये हिंग, बारीक चिरलेला कांदा झाला कांदा चांगला परतून झाला की, त्यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट टाका.
- नंतर त्यामध्ये तीन छोटे चमचे टोमॅटो प्युरी टाकून हे मिश्रण चांगले परतून घ्या व कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्या.
- नंतर झाकण काढून त्यामध्ये धने जिरे पावडर, हळद चवीपुरते मीठ, कस्तुरी मेथी व दोन चमचे कश्मीरी लाल तिखट पावडर घाला.
- सर्व मसाले एकजीव झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून झाकण ठेवून द्या.
- दोन मिनिटानंतर झाकण काढून हा मसाला तेल सुटून एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
- आता सर्व मिश्रणात पनीर घालायचे आहे व वरून एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे.
- सर्व साहित्य एकत्र परतून घेऊन त्यामध्ये एक कप गरम पाणी घाला, या भाजीला उकळी आली की गॅस बंद करून घ्या आणि वरून कोथिंबीर टाका.
- अशाप्रकारे गरमागरम व चविष्ट पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार आहे. पनीर टिक्का मसाला रेसिपी आपण तंदुरी रोटी, पोळी, पराठा किंवा जीरा राईस सोबत खाऊ शकतो.
पोषक घटक :
पनीर टिक्का मसाला मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे घटक असतात त्यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, सोडियम, पोटॅशियम, शुगर, कॅलरी, लोह इत्यादी शरीरासाठी आवश्यक असणारे घटक पनीरमध्ये असतात. पनीर टीका एक हेल्दी व पौष्टिक रेसिपी आहे.
फायदे :
पनीर टीका ही रेसिपी शरीरासाठी आवश्यक व पौष्टिक आहे. जे लोक मांसाहारी नाहीत त्यांच्या करिता पनीर खूपच पौष्टिक आहे. पनीर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यांची शरीर देखील हेल्दी राहते.
पनीरचे सेवन नियमित केल्याने आजारांपासून दूर राहता येतो. पनीर मध्ये प्रोटीन असतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पनीर खाल्ल्याने शरीरातील फॅट कमी होऊन वजन कमी होते तसेच वजन कमी करायचे असेल तर पनीर आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घेणे फायद्याचे आहे.
पनीर टीका मसाल्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे व दात मजबूत राहतात, तसेच पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात.
तोटे :
पनीर टीका मसाला खाणे तसे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु पनीर मध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते वापरण्यात येणारा मसाला ग्रेव्ही यामुळे हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असेल तर त्यांनी पनीरटीका खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पनीर जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. कच्चे पनीर खाणे गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरू शकत.
तर मित्रांनो, पनीर टिक्का मसाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.