पाणीपुरी रेसिपी मराठी Pani Puri Recipe In Marathi

पाणीपुरी रेसिपी मराठी Pani Puri Recipe In Marathi  पाणीपुरी हा एक लोकप्रिय चटपटा खाद्य आहे.  जे भारतात सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे, लोक याचा उपयोग नास्ता म्हणून करतात.  पाणीपुरीमध्ये अनेक प्रकार आहेत.  यापैकी भेळपुरी, शेवपुरी, तसेच दहीपुरी असे अनेक प्रकार पाणीपुरी मध्ये येतात, आणि हे सर्व प्रकार अतिशय स्वादिष्ट आहेत.  आपण बाहेर किंवा नास्ता सेंटरवर पाहिले असेलच  आपल्याला किती छान आणि मसालेदार पाणीपुरी मिळते.

भारतात अनेक ठिकाणी पाणीपुरी वेग वेगळ्या प्रकारे पाणीपुरी बनवली जाते.  आपल्या सभोवताली शहरी तसेच ग्रामीण भागात आता लवकरच पाणीपुरी मिळून जाते.  पण काही ठिकाणी मिळू शकत नाही, आणि काही लोकांना पाणीपुरी खूप आवडते पण तर बाहेर जाऊ शकत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे.  स्वादिष्ट आणि चमचमीत पाणीपुरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची यांची रेसिपी, आता आपण पाणीपुरी रेसिपी पाहणार आहोत.

Pani Puri

पाणीपुरी रेसिपी मराठी Pani Puri Recipe In Marathi

पाणीपुरीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

पाणीपुरी तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते.  त्यानंतर आपण लवकर पाणीपुरी तयार करू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

पाणीपुरीसाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते, आणि नंतर कुकिंग करावी लागते.  यासाठी आपल्याला टोटल टाईम 50 मिनिट वेळ लागतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

पाणीपुरी  ही रेसिपी आपण 4 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

पाणीपुरीचे प्रकार :

पाणीपुरी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध चाट/ खाद्य मानले जाते.  पाणीपुरी ही अनेक ठिकाणी वेग वेगळ्या प्रकारे बनवली जाते.  पाणीपुरीचे विविध प्रकार आहेत, त्यापैकी गोलगप्पा पुरी, शेव पुरी, भेल पुरी, दही पुरी, मसला पुरी, गोड पाणी पुरी असे अनेक प्रकार यामध्ये आहेत.  हे सर्व प्रकार खूपच स्वादिष्ट आणि चवदार आहेत.

पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत :

1) 50 गोल पुरी/ गोलगप्पे.

2) 2 मध्यम कांदे.

3) 50 ग्रॅम बारीक शेव.

4) 1 मध्यम वाटी पुदीना पाने.

5) कोथींबीर.

6) 7 ते 8 हिरवी मिरची.

7) 1 ते 2 आल्याचे तुकडे.

8) 1 ते 2 लिंबू.

9) 4 ते 5 चम्मच काळे मीठ.

10) 2 चमचे लाल मिरची पावडर.

11) 2 चमचे धनिया पावडर.

12) 4 ते 5 मध्यम आलू/बटाटे.

13) थोडा चाट मसला.

14) चवीनुसार मीठ.

15) 1 वाटी चना.

पाककृती :

  • सर्वात प्रथम आपण पाणीपुरी बनवण्या अगोदरच्या रात्री चणे 8 तास भिजू घालावे.
  • नंतर भाजीपाला स्वच्छ धुऊन घ्यावा, आणि कांदा व कोथिंबीर बारीक कापून घ्यावी व नंतरच्या कामासाठी बाजूला ठेऊन द्या.
  • चणे आणि बटाटे/आलूत थोडे मीठ घालून, एका प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या होये पर्यत शिजवा.
  • नंतर पुदीना पाने, हिरवी मिरची, थोडे आले, व्यवस्थित बारीक करा, व नंतर त्यात लिंबाचा रस टाका.
  • नंतर मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्या.  गुळगुळीत पेस्ट होयेपर्यत बारीक करा, आणि
  • आवश्यक असल्यास 1 ते 2 कप पाणी टाका.
  • आता ही पेस्ट एका खोल भांड्यात काढून घ्या.  त्यात थोडी साखर, चाट मसाला, काळे मीठ व दोन ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिसळा.
  • चवीनुसार थोडे मीठ घाला, आणि आवश्यक तेवढे पाणी घाला.  व थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • आता आपण पाणीपुरीसाठी लागणारा मसला तयार करूया, एक खोल भांडे घ्या, आणि सर्व मसाला साहित्य जवळ घ्या.
  • एका भांड्यात उकडलेले बटाटे/आलू आणि चणे घ्या.  त्यात लाल मिरची पावडर, जीरा व धानिया पावडर, थोडा चाट मसाला आणि कोथींबीर टाका.
  • चवीनुसार यामध्ये मीठ घाला, यांचे व्यवस्थित मिश्रण करून द्या.  आता आपला मसाला तयार आहे.
  • आता पाणीपुरीचे पाणी आणि मसाला घ्या, आणि एक एक करून गोलपुरीच्या मध्यभागी बोटाने एक लहान छिद्र करून त्यात मसाला भरावा.
  • आणि नंतर त्यामध्ये बारीक कांदा आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून तिखट पाणी टाका.
  • आपण हे एका प्लेटमध्ये घेऊन स्वादिष्ट व मसालेदार पाणीपुरी यामध्ये आपण थोडी गोड खटाई, थोडे दही, बारीक शेव, आणि थोडे काळे मीठ घेऊन खाऊ शकतो.

पाणीपुरीमध्ये असणारे घटक :

पाणीपुरी बनवण्यासाठी अनेक पोष्टिक पदार्थ वापरल्या जातात.  जसे आलू, पुदीना, कोथींबीर यामध्ये अनेक घटक असतात.  यामध्ये कॅलरी, कर्बोदके, प्रथिने, चरबी, संतृप्त चरबी, सोडियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम लोह हे सर्व घटक असतात.  हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

पाणीपुरीमध्ये असणारे घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे.  यातील पुदीना आपल्याला पोटदुखी सारखा आजार होऊ देत नाही.

पाणीपुरीचे पाणी पिल्याने पोट साफ राहते, आणि ऍसिडीटी व पोटात गॅस तयार होत नाही.

यामध्ये असणारे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन, चरबी यामुळे आपले शरीर निरोगी राहते.  यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात.

तोटे :

पाणीपुरी आपण जास्त प्रमाणात सेवन केली की आपल्याला पोटदुःखी होऊ शकते.

यामध्ये तिखट हिरवी मिरची वापरल्या जाते.  यामुळे आपल्याला मळ मळ आणि उलटी होऊ शकते.

म्हणून आपण हे योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे.  नाहीतर आपण आजारी पडू शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला पाणीपुरी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment