पानसी फुलाची संपूर्ण माहिती Pansi Flower Information In Marathi

Pansi Flower Information In Marathi घराच्या आसपास अनेक फुलझाडे लावलेले आपण बघत असतो. या फुलझाडांमुळे घराला सुंदर देखावा येण्यास मदत मिळत असते. फुले हे कुठेही लावले तरीदेखील त्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यामध्ये त्यांचा हातभार लाभत असतो. मुख्यतः विविध प्रकारच्या बागांमध्ये या फुलांचे लागवड केली जात असते. असेच एक फुल म्हणजे पानसी फुल होय.

Pansi Flower Information In Marathi

पानसी फुलाची संपूर्ण माहिती Pansi Flower Information In Marathi

घरासमोर सुंदरता आणण्यासाठी तसेच विविध बाग बगीचा मध्ये वातावरण सुशोभित करण्याकरिता या फुलाची लागवड केली जात असते. पाचशे पेक्षाही अधिक प्रजातीमध्ये आढळणारे हे फुल थंड हवामानामध्ये घेतले जात असे, मात्र आजकाल ते उष्ण हवामानामध्ये देखील चांगल्या रीतीने घेतले जाते. आजच्या भागामध्ये आपण पानसी या फुलाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावपानसी
प्रकारफुल
पाकळ्यांची संख्यापाच
पाकळ्यांचा आकारगोलाकार
आकारमानपाच ते आठ सेंटीमीटर पर्यंत
साधारण आयुर्मानदोन वर्ष
रंगबहुरंगी

मनमोहक सुगंध आणि सुंदर रंगासाठी ओळखले जाणारे फुल म्हणून पानसीच्या फुलाला ओळखले जाते. अगदी कुंडीमध्ये, घरामध्ये देखील हे फुल लावले जाऊ शकते. तर बाहेर देखील या फुलाची लागवड करून घराला किंवा आसपासच्या परिसराला शोभा आणली जाऊ शकते.

साधारणपणे दोन ते तीन इंचाचे हे फुल कापसासारखे अतिशय नाजूक स्वरूपाचे असते. या फुलांमध्ये पाकळ्यांची संख्या ही सुमारे तीन ते पाच इतकी असते. अतिशय नाजूक असणारे हे फुल आकाराला देखील खूपच छान असते. या फुलाचा रंग मुख्यतः पिवळसर, पांढरा किंवा जांभळा व निळा स्वरूपाचा असतो.

इतर काही फुले विविध रंगांमध्ये देखील आढळून येऊ शकतात. या फुल झाडाला अतिशय नाजूक पाने येतात, ज्यांचा आकार हृदयासारखा असतो. आणि त्याच्या मध्यभागी थोडीशी खाच असते. पानांचा रंग गर्द हिरव्या स्वरूपाचा असतो.

या वनस्पतीच्या विविध प्रजातीनुसार त्याचा आकार लहान मोठा असतो, तरी देखील साधारणपणे सात ते दहा इंचापर्यंत ही वनस्पती किंवा फुले वाढू शकतात. या वनस्पतीला थंड हवामान आणि पाणी गरजेचे असते. त्याचबरोबर खत टाकले असता अतिशय उत्कृष्टरित्या ही वनस्पती वाढत असते.

या वनस्पतीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, या वनस्पतीकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तेवढे या वनस्पती पासून चांगल्या फुलांची निर्मिती होत असते…

या वनस्पतीला थंडी आवडत असल्यामुळे शक्यतो सूर्यप्रकाशापासून या वनस्पतीला दूर ठेवावे, त्याचबरोबर पाण्याचा ताण देखील या वनस्पतीला सहन होत नाही. एकदा ही वनस्पती लावली तर दोन वर्षांपर्यंत चांगली फुले देत असते. त्यानंतर झाड जिवंत राहते मात्र त्याला फुल येत नाहीत. आणि हळूहळू काही दिवसात झाड देखील वाळून जाते…

पानसी वनस्पती लागवडीची किंवा वाढवण्याची पद्धत:

पानसी ही वनस्पती लागवड करणे खूप अवघड असेल, असे अनेकांना वाटते. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो ही अतिशय सोप्या पद्धतीने लागवड केली जाऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम एक कुंडी घेऊन त्याच्या तळाला थोडेसे छिद्र पाडावे. हे भांडे किमान दहा ते बारा इंच रुंद असले पाहिजे.

त्यानंतर या भांड्यामध्ये व्यवस्थित रित्या माती, शेण खत, आणि गांडूळ खत भरावे. यातील मातीचे प्रमाण ६०% असावे, तर शेणखत आणि गांडूळ खत प्रत्येकी २०% असावे. त्यानंतर हे सर्व मिश्रण कुंडीमध्ये भरून, त्यामध्ये या फुलाच्या बियाण्याची लागवड करावी. या बियाण्यावर पुन्हा एक इंच मातीचा थर देऊन, यामध्ये पाणी टाकावे. नियमित पाणी देऊन या कुंडीची काळजी घ्यावी. तुम्हाला अवघ्या दीड ते दोन महिन्यांमध्ये चांगल्या फुलाची उगवण दिसून येईल.

पानसी फुलांची काळजी:

मानसी हे फुल थंड हवामानामध्ये घेतले जाते असे आपल्या प्रत्येकालाच माहिती असेल. त्यामुळे त्यांना ऊन सहन होत नाही. म्हणून त्यांना नेहमी वाढिच्या अवस्थेमध्ये सावलीच्या ठिकाणी ठेवले जावे.

पानसी वनस्पती पाण्याला अतिशय संवेदनशील असल्यामुळे, या रोपाला नियमित पाणी दिले जावे. या झाडाला पाणी देताना कधीही पटकन पाणी टाकून देऊ नये, तर झारीच्या साह्याने हळूहळू पाणी टाकावे.

या फुलाच्या लागवडीकरिता कुंडी भरायच्या आधी व्यवस्थितरित्या शेणखत व गांडूळ खत मिक्स करावे, जेणेकरून या झाडांच्या मुळांना व्यवस्थितरित्या अन्न व पाणी शोषता येते. झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये देखील शेणखत व गांडूळ खत कुंड्यांमध्ये टाकले जाऊ शकते.

जर या पानसी वृक्षाच्या वनस्पतीवर कुठल्याही प्रकारची रोग अथवा कीड दिसून आल्यास, निंबोळी अर्काची फवारणी किंवा निंबोळी तेल फवारले जाऊ शकते. जेणेकरून वनस्पती निरोगी राहण्यास मदत मिळते.

पानशीच्या वनस्पतीवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडत असतात, तसेच विविध कीटक देखील यावर अतिक्रमण करत असतात. जेणेकरून फुले येण्यास अडथळा निर्माण होत असतो. ज्यामध्ये मोजाईक व्हायरस, पावडरी मिलड्यु, डाऊनी मिलड्यु, मुळकुज, मुकुट रोग, रस्ट, गोगलगायी, इत्यादी प्रकारच्या कीटक व रोगामुळे या वनस्पतीला वाढीसाठी अडथळा निर्माण होत असतो.

पानसी फुलाच्या विविध प्रजाती किंवा जाती:

पानसी फुल वेगवेगळ्या प्रजातींमध्ये आढळून येते, ज्यांमधील ज्वाली जोकर ही प्रजाती वसंत ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची निर्मिती करत असते. बाहेरून जांभळ्या तर आतून केशरी रंगाची फुले या प्रजातीची असतात. त्याचबरोबर राजकुमारी मलिका ही निळ्या व जांभळ्या फुलांसाठी ओळखली जाते. यातील मध्यभाग हा पिवळ्या रंगाचा असतो.

फमा मल्लिका ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फुलणारी वनस्पती असून, ही एकच रंगाची फुले व मिश्र रंगाची फुले अशी दुहेरी प्रकारची फुले देण्यामध्ये प्रसिद्ध आहे.

पानसी फुलांचे उपयोग:

  • ही वनस्पती अत्यंत आकर्षक व सुंदर सुवासाची असल्यामुळे परसबागेमध्ये तसेच घरासमोर चांगले वातावरण निर्मिती करता या फुलांचा वापर केला जातो.
  • कुंड्यांमध्ये लागवड करून घराच्या आतील सौंदर्य या फुलांमुळे वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर घरामध्ये एक उत्तम सुवास देखील पसरतो.
  • पुष्पगुच्छ निर्मितीमध्ये या फुलांचा वापर केला जातो, त्याचबरोबर कट फ्लावर्स म्हणून देखील या फुलांना मोठी मागणी असते.
  • इतर गोड पदार्थांना रंग व चव प्रदान करण्यासाठी देखील या फुलांचा वापर केला जातो. ज्यामध्ये केक सारख्या पदार्थांचा समावेश होतो.

निष्कर्ष:

फुल बघितलं की प्रत्येक माणसाचे मन प्रसन्न होत असते. फुले निसर्गसौंदर्य वाढवण्याबरोबरच विविध कार्यक्रमाची शोभा वाढवण्यामध्ये देखील कारणीभूत ठरत असतात. फुलांमुळे सर्वत्र मंद सुगंध पसरत असतो. त्यामुळे वातावरण देखील अतिशय प्रसन्न होण्यास मदत मिळत असते.

आजच्या भागामध्ये आपण एका फुलाबद्दल अर्थात पानसी फुला बद्दल माहिती बघितली आहे. यामध्ये पानसी फुल म्हणजे काय, त्याची लागवड कशी करावी, त्याबद्दल विविध माहिती, या वनस्पतीचे विविध तथ्य, पानसी फुलाची काळजी कशी घ्यावी, त्याच्या लागवडीच्या विविध पद्धती इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

पानसी फुलांमधील पाकळ्यांची संख्या आणि आकार कसा असतो?

पानसी फुलांमधील पाकळ्यांची संख्या पाच तर आकार हा गोलसर असतो.

पानसी फुलांचे आकारमान किती असते?

पानसी फुलांचे आकारमान साधारणपणे पाच सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटर पर्यंत असते.

पानसी फुलांचा रंग कोणकोणत्या स्वरूपामध्ये आढळून येतो?

पानसी फुलांचा रंग हा केशरी, पिवळा, किरमीजी, गुलाबी, शाही जांभळा इत्यादी रंगांमध्ये आढळून येतो.

पानसी फुलाची वनस्पती साधारणपणे किती वर्ष जगू शकते?

पानसी फुलाची वनस्पती साधारणपणे दोन वर्षांपर्यंत जगू शकते.

पानसी चे फुल वाढण्याकरिता कोणती परिस्थिती आवश्यक असते?

पानसी हे फुल वाढण्याकरिता थंड हवामान अतिशय फायदेशीर ठरत असते. त्यामुळे या झाडाला वसंत व शरद ऋतूमध्ये चांगली फुले येत असतात.

Leave a Comment