Papaya Fruit Information In Marathi अनेक प्रकारच्या जीवनसत्व आणि खनिजांनी संपन्न असलेल्या फळांमध्ये पपई या फळाचा समावेश होतो. पिवळसर केशरी रंगाचा गर असणारे हे फळ जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ब यांनी भरपूर असते. त्वचेसाठी अतिशय उत्तम समजली जाणारी ही पपई अनेक प्रकारे वापरली जाते. त्यामध्ये भाजी बनवणे, तुटी फ्रुटी बनवणे म्हणून खाणे, ज्यूस बनवणे अनेक गोष्टी करता वापरली जाते.

पपई फळाची संपूर्ण माहिती Papaya Fruit Information In Marathi
पपई चेहऱ्यावर लावल्याने देखील सौंदर्य निर्माण होण्यास मदत मिळत असते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पपई या फळाची लागवड केली जात असून, अनेक लोक आनंदाने व आवडीने हे फळ खात असतात. अतिशय मधुर चवीचे हे फळ शरीरातील उष्णता देखील वाढवत असते, त्यामुळे काही लोकांकडून हे फळ टाळले जात असले, तरी देखील काही खास आवडीने हे फळ खात असतात.
या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर इतरही घटक उपलब्ध असतात, ज्यामध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, यांसारख्या घटकांचा देखील समावेश होतो. त्वचेला आरोग्य प्राप्त करून देण्याबरोबरच त्वचेला अतिशय तुकतुकीतपणा आणण्यासाठी, सोबतच बद्धकोष्ठता जाणवणाऱ्या रुग्णांसाठी देखील पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.
सोबतच रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी देखील पपई ओळखली जाते. पचायला अतिशय हलकी असणारि पपई शरीराला ऊर्जा देखील प्रदान करत असते. अशा या बहुगुणी पपई फळाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…
नाव | पपई |
इंग्रजी नाव | पपाया |
प्रकार | फळ |
किंगडम | प्लांटी |
शास्त्रीय नाव | कॅरीका पपया |
वंश | कॅरीका |
उपयोग | त्वचारोग |
पिकल्यानंतर बाहेरून पिवळसर होणारे फळ म्हणजे पपई होय. अ आणि ब जीवनसत्त्वासाठी ओळखले जाणारे फळ त्वचा रोगांमध्ये देखील फारच फायदेशीर असते. त्यामुळे अनेक ठिकाणी या पपई फळाची साल तोंडाला लावली जाते. या पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात.
जर तुम्ही शंभर ग्राम पपई सेवन केली, तर त्यातून तुम्ही दोन ग्राम प्रथिने मिळवू शकता, आणि कॅलरीज ची संख्या सुमारे ९८ पर्यंत असू शकते. लोहाने भरपूर असणारे हे फळ फायबर च्या स्वरूपात देखील चांगले असते. त्यामुळे पोटासाठी मोठ्या प्रमाणावर या पपई फळाचा वापर केला जातो.
अन्न पचण्यास सोपे करणारे हे फळ मांसाहारांमध्ये देखील वापरले जाते, जेणेकरून मांसाहाराचे पदार्थ लवकर शिजतात. आरोग्यदायी असण्याबरोबरच हे फळ चवदार देखील आहे, त्यामुळे अनेक लोक हे फळ खाण्याकडे प्राधान्य दर्शवत असतात.
मात्र एकदा झाडावरून तोडल्यानंतर व पिकल्यानंतर फार काळासाठी या फळाला ठेवता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर या फळाचे सेवन करावे लागते त्यामुळे या फळाच्या निर्यातीत अनेक अडथळे निर्माण होत असतात. पपई फळापासून तयार केलेला ज्यूस बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर देखील फायदेशीर असतो. यावरून तुम्ही याची आरोग्यदायी फायदे जाणू शकता.
पपई सेवनाचे फायदे:
पपई हे फळ अतिशय गुणकारी व आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे अनेक लोक याचे सर्रास सेवन करताना आढळून येतात. आजकाल जाणवणाऱ्या महत्त्वाच्या समस्येमधील कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर देखील पपई खूपच गुणकारी असून, रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी यामुळे सहजरित्या कमी होत असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, किंवा हाडे मजबूत करायची असेल, तरीदेखील सॅलड स्वरूपाचा पपई खाणे सांगितलेले आहे. आणि याचा आयुर्वेदामध्ये देखील उल्लेख आढळून आलेला आहे. मासिक पाळी येत नसेल तरीदेखील पपई खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र ज्या महिलांनी गर्भधारणा केलेली आहे अशा महिलांसाठी हे फळ चांगले ठरत नाही.
केसांचे किंवा त्वचेचे आरोग्य सुधारायचे असेल तरीदेखील बाहेरून पपईचे फळ लावले जाते, तसेच पोटातून देखील हे फळ खाऊन परिणाम दिसू शकतो. पपईच्या सेवनामुळे कर्करोगांच्या रुग्णांमधील अनियंत्रित वाढणारी पेशींची संख्या कमी केली जाऊ शकते, जेणेकरून कर्करोग बरा होण्यास मदत मिळत असते. व तो अधिक मोठ्या प्रमाणात वाढत नाही.
पपई सेवनाचे तोटे किंवा दुष्परिणाम:
अनेक लोकांद्वारे पसंत केली गेलेली पपई कच्चा स्वरूपात खाल्ल्यास, अनेक लोकांना चिडचिडेपणा जाणवू शकतो, किंवा एलर्जी देखील होऊ शकते.
कच्च्या पपईचा चीक शरीराला लागल्यास तेथे एलर्जी देखील दिसून येऊ शकते.
रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करत असाल, तर पपई न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सोबतच थायरॉईडच्या पेशंटला आणि गर्भवती महिलांना पपई खाऊ नये असे सांगितले जाते. पपई खाणे फायदेशीर असले तरी देखील याच्या अतिसेवणामुळे मुतखड्यासारखे आजार उद्भवू शकतात.
एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पपई खाण्यास देऊ नये, असे सांगितले जाते. त्याचबरोबर अतिसार नेहमी जाणवत असणाऱ्या व्यक्तींनी हे फळ खाऊ नये, मात्र बद्धकोष्ठता झाली असेल तर हे फळ आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात हे फळ खाल्ले जाते, मात्र मुख्यतः सॅलड स्वरूपात याचे सेवन अधिक केले जाते.
निष्कर्ष:
कुणीही आजारी पडले की हमखास फळे खायला दिली जातात. कारण आजारपणामुळे शरीराचे झालेले नुकसान फळे खाल्ल्यामुळे लवकर भरून निघत असते. फळांमध्ये अनेक प्रकारचे घटक आढळून येतात, ज्यामध्ये शरीराला पुन्हा शक्ती देण्याची क्षमता असते. त्यामुळे फळे हे अतिशय फायदेशीर असून, समाजातील अनेक घटकांद्वारे या फळाची मोठी मागणी असते. शरीराला उष्णता प्रधान करणारे हे फळ अनेक लोक आवडीने खात असतात.
पिवळसर केशरी रंगांमध्ये असणाऱ्या या फळाला चव फार मधुर स्वरूपाची असते. त्यामुळे कोणीही या फळाकडे सहजरित्या आकर्षित होत असते. पपई फळाच्या सालीमध्ये त्वचा रोग बरे करण्याचे गुणधर्म असून, खाल्लेल्या पपईची साल तोंडाला लावल्यास अनेक त्वचारोग बरे होण्याबरोबरच त्वचा उजळण्यास मदत मिळते असे सांगितले जाते.
आजच्या भागामध्ये आपण पपई या सर्वांच्या आवडीच्या फळाबद्दल संपूर्ण माहिती बघितली असून, या माहितीमध्ये पपईमध्ये उपलब्ध असलेले विविध पोषक घटक, पपई सेवनापासून मिळणारे फायदे, पपईचे गुणधर्म, यांसारखी अनेक स्वरूपाची माहिती बघितलेली आहे.
FAQ
पपई या फळाला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते, व त्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
पपई या फळाला इंग्रजीमध्ये पपाया या नावाने ओळखले जाते, तर त्याचे शास्त्रीय नाव कॅरीका पपाया असे आहे.
पपई चे फळ कोणकोणत्या गोष्टींमध्ये फायदेशीर ठरत असते?
पपई हे बहुगुणी फळ असून, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे, हृदय रोगावर नियंत्रण मिळवणे, कर्करोग बरा करणे, ऍसिडिटी किंवा जळजळ थांबविणे, प्लेटलेट ची संख्या वाढवून पचनक्रिया सुधारणे, त्वचेच्या विविध आजारांना बरे करणे, मासिक पाळी येण्यासाठी फायदेशीर ठरणे, दृष्टी दोष नियंत्रणात आणणे, आणि वजन कमी करणे यांसारखे फायदे होत असतात.
पपई कोणी खाऊ नये असे सांगितले जाते?
पपई हे एक उष्ण स्वरूपाचे फळ असल्यामुळे, गर्भवती महिलांनी हे फळ सेवन करू नये असे सांगितले जाते. अन्यथा गर्भपात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
पपई या फळाच्या सेवनाने काय तोटे होऊ शकतात?
पपई हे फळ अतिशय चांगले असले तरी देखील अति प्रमाणात खाल्ल्यामुळे पोट खराब होऊ शकते. त्याचबरोबर उलट्या मळमळ जाणवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण घटने, एलर्जी होणे, किंवा श्वासोच्छवासास त्रास जाणवणे, इत्यादी प्रकारचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.
पपई हे फळ कोण कोणत्या स्वरूपात खाल्ले जाऊ शकते?
पपई फळ हे सोलून त्याचे छोटेसे तुकडे स्वरूपात खाल्ले जाऊ शकतात. त्याचबरोबर मिक्सरमधून या फळांचा रस काढून तोही खाल्ला जाऊ शकतो. पपई पासून अनेक प्रकारच्या मिठाईंचे प्रकार बनवले जातात, तसेच जाम, टूटीफ्रूटी, यांसारखे पदार्थ बनवले जातात. या माध्यमातून देखील तुम्ही पपईचे सेवन करू शकता.