परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Parbhani Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण परभणी जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत, कारण परभणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

Parbhani Information In Marathi

परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Parbhani Information In Marathi

औरंगाबाद आणि नांदेडनंतर परभणी हे महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील सर्वात मोठे शहर आहे. परभणी औरंगाबादच्या प्रादेशिक मुख्यालयापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे, तर ते राज्याची राजधानी मुंबईपासून 491 किमी अंतरावर आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा

विभागातील आठ जिल्हयांपैकी एक परभणी!

पुर्वीचा ’प्रभावतीनगर’ नावाने ओळखला जाणारा आजचा परभणी…

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत.

परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.

परभणी जिल्ह्याचा इतिहास

प्राचीन काळातील, परभणी देवी प्रभावतीच्या विशाल मंदिराच्या अस्तित्वामुळे “प्रभावती नगरी” म्हणून ओळखली जात असे. “प्रभावती” नावाचा अर्थ देवी लक्ष्मी आणि पार्वती आहे.  सध्याचे नाव परभणी हे प्रभावतीचे एक भ्रष्ट प्रकार आहे.

परभणी 650 पेक्षा जास्त वर्षे मुस्लिमांच्या कारकीर्दीत, डेक्कन सल्तनत, मोगल आणि नंतर हैदराबादच्या निजामाच्या अधीन होती. 1948 मध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशन पोलो पर्यंत निझामाच्या कारकीर्दीत हे शहर हैदराबादच्या रियासत राज्याचा भाग राहिले.

त्यानंतर तो भारतीय स्वतंत्र प्रजासत्ताकाचा भाग झाला. 1956 पर्यंत हे शहर हैदराबाद राज्यातील एक भाग राहिले. त्यावर्षीच्या प्रशासकीय सुधारणांच्या अंतर्गत आणि हैदराबाद राज्याच्या तुटण्यामुळे, परभणी आणि लगतची शहरे बहुभाषिक मुंबई राज्यात हस्तांतरित केली गेली.

1 मे 1960 पासून हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे.

परभणी जिल्ह्याचा भूगोल

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे

याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा (सु. १६०·९३ किमी.) व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी (सु. ६४·३७ किमी.) या नद्या वाहतात.

जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो.

दख्खन पठाराचाच एक भाग असल्याने जिल्हा समुद्रसपाटीपासून सरासरी ४५७·६० मी. उंचीवर आहे. भूरचनेच्या दृष्टीने त्याचे दोन ठळक विभाग पडतात. उत्तर भागात अजिंठा टेकड्यांचा भाग येतो व त्याला ‘जिंतूर – हिंगोली टेकड्या’ हे स्थानिक नाव आहे.

त्यांची उंची ४५० मी. पेक्षा जास्त असून त्यांचा जास्तीत जास्त उंच भाग (५८० मी.) जिंतूर तालुक्यात आहे. दक्षिण सीमेवर बालाघाट टेकड्यांचा भाग येतो. त्यांची सरासरी उंजी ५२५ मी. च्या आसपास आहे. मध्य भागात गोदावरी व तिच्या उपनद्या दुधना आणि पूर्णा यांच्या खोऱ्यांचा भाग येत असून, हा भाग पूर्वेला उतरत जातो.

परभणी जिल्ह्याची राजकीय रचना

परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत ते पुढीलप्रमाणे:-

– जिंतूर, पाथ्री, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत.

तहसील

१. परभणी, २. गंगाखेड, 3. सोनपेठ, 4. पाथरी, 5. मानवत, 6. पालम, 7. साईलू, 8. जिंतूर, 9. पूर्णा

जिल्ह्याचे सेलू (सै़लू) व हिंगोली असे दोन विभाग केले आहेत. सेलूमध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी आणि परतुर हे तालुके व हिंगोलीमध्ये हिंगोली, वसमत (बसमथ), कळमनुरी व जिंतूर हे तालुके येतात. परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार परभणी शहराची लोकसंख्या 18,36,086 आहे. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या अनुक्रमे 157,628 आणि 149,563 आहे, हे प्रमाण 1000 पुरुषांसाठी 949 महिलांचे आहे. परभणी शहरातील साक्षरतेचे प्रमाण 84.34 टक्के असून पुरुष साक्षरता 90.71 टक्के व महिला 77.70 टक्के आहे.

परभणी शहरात हिंदू धर्म हा बहुसंख्य धर्म असून यात 138,562 अनुयायी आहेत. परभणी शहरात इस्लाम हा दुसरा प्रमुख धर्म आहे आणि त्याचे पालन करून अंदाजे 126,702 आणि बौद्ध धर्मात 36,203 ख्रिश्चन धर्मानंतर 697 जैन धर्म 2,870 आहे.

हवामान

पठारावरील स्थानामुळे जिल्ह्याचे हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. मे महिन्यात दिवसाचे तपमान ४०° से. वर जाते, तर रात्री ते २५° से. च्या खाली येते. हिवाळ्यातील तपमान दिवसा ३०°से., तर रात्री १५° से. इतके असते.

उन्हाळ्यात तपमान कधीकधी ४५° से. इतके वाढते, तर हिवाळ्यात रात्री १०° से. इतके खाली येते. पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थोडासा पाऊस मिळतो.

पर्जन्यमान सामान्यतः ८२·६६ सेंमी. असून भूरचनेप्रमाणे त्यात फरक पडतो. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यांत पर्जन्यमान सु. ११० सेंमी. पेक्षा अधिक असते, तर बालाघाटच्या पर्जन्यछायेत येणाऱ्या खोऱ्यातील तालुक्यांत ते ७५ ते ८० सेंमी. च्या आसपास असते.

मृदा व खनिजे

बेसाल्ट हा तळखडक व कोरड्या हवामानातील विशिष्ट विदारण क्रिया यांमुळे पठारावरील इतर अनेक जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यातील रेगूर मृदा काळी, कसदार असून तिचा पोत बारीक आहे. कमी पाऊस पडणाऱ्या या भागात अशा मृदेचे पाणी टिकवून धरण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

मृदेमध्ये लोह, कॅल्शियम इत्यादींचे प्रमाण भरपूर असले, तरी नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने नत्रखते वापरणे आवश्यक ठरते. मृदेचा थर डोंगराळ भागांत पातळ असून नद्यांच्या खोऱ्यांतील भागांत त्यांनी आणून टाकलेल्या गाळामुळे जाड असल्याचे आढळते. हा मध्यभागच आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे.

रेगूर मृदा पावसात ओली झाल्यावर फुगते, तर उन्हाळ्यात तिला भेगा पडतात. या भेगांतून पृष्ठभागावरचे सुटे कण आत जातात. पावसाळ्यात पावसाच्या थेंबांनी वरचे कण खाली गेल्यावर खालचे कण वर येतात. अशा प्रकारे जमिनीची नांगरट आपोआपच होते.

या क्रियेला अत्यंत महत्त्व आहे. नाहीतर पाऊस पडल्यानंतर माती इतकी चिकट होते की, नांगराच्या साहाय्याने फार वेळ नांगरट करणे शक्य नसते. मात्र जमिनीचा पोत बारीक असल्याने जलसिंचनासाठी मृदा फारशी उपयुक्त नाही. पाण्याचा निचरा ही एक महत्त्वाची समस्या आहे.

बेसाल्ट खडकाने आच्छादलेल्या या जिल्ह्यात खनिजे नाहीत. इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा दगड व रस्त्यांसाठी लागणारी खडी याच गोष्टी खाणींतून मिळतात.

शेती

डोंगराळ भाग सोडल्यास जिल्ह्याचा इतर भाग नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापला असल्यामुळे, लागवडीस योग्य जमिनीचे प्रमाण एकूण जमिनीच्या ७५% इतके आहे. अर्थात हे प्रमाण भूस्वरूपानुसार बदलते. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी यांसारख्या डोंगराळ तालुक्यांत ते कमी असून खोऱ्यांतील तालुक्यांत ते अधिक आहे.

मात्र यांपैकी केवळ १३-१४ टक्के क्षेत्रातच एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होते. ज्वारी हे येथील मुख्य पीक असून बाजरी, गहू व भात ही पिकेही थोड्या प्रमाणात घेतली जातात. तूर, हरभरा यांसारखी द्विदल धान्येही पिकतात.

नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस व भुईमूग ही महत्त्वाची पिके होतात. अन्न पिकांखालील जमिनीचे प्रमाण ६७·३% आहे. मात्र जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या भागांत नगदी पिकांखालील जमीन वाढत असून, त्यामानाने अन्नपिकांखालील जमीन घटत आहे. जिल्ह्यातील एकूण कामगारवर्गापैकी सु. ८२·५% लोक शेतीच्या व्यवसायात गुंतले आहेत.

शेती बहुतांशी जनावरांच्या साहाय्यानेच केली जाते. जनावरांचा शेती व घरगुती दूधपुरवठा यांखेरीज फारसा उपयोग केला जात नाही. कोंबड्या हे प्रथिने पुरविणारे अन्न असले, तरी १९७२ मध्ये कोंबड्यांची संख्या हजार माणसांमागे केवळ १०५ इतकीच होती.

जिल्ह्यातील प्रमुख पिके कापूस आणि ज्वारी हेच आहेत. साखर तसेच इतर पिकांच्या आयात-निर्यातीसाठी परभणी हे प्रमुख केंद्र मानले जाते.

परभणी जिल्ह्यातील राहणीमान

आहार

लोकांचे मुख्य अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, वरण किंवा आमटी, भाजी मांस आणि कधीकधी भात हे होय.

पोशाख

धोतर, सदरा, डोक्याला टोपी किंवा रुमाल हा पुरुषाचा मुख्य पोषाख. मात्र जमात व आर्थिक परिस्थित्यनुसार त्यात फरक पडतो. शहरांतील लोकांच्या पोषाखात आधुनिकता वाटते. स्त्रिया लुगडे आणि चोळी वापरतात.

उद्योगधंदे

परभणीची अर्थव्यवस्था मुख्यत: शेती आणि शेतीवर अवलंबून असते. या प्रदेशातील उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे, परंतु कोणताही मोठा उद्योग नाही.

सरकी काढणे, गासड्या बांधणे, निरनिराळे अन्नपदार्थ बनविणे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. लाकूडकाम, मोटार व सायकल दुरुस्ती यांसारखे अनेक छोटे उद्योगधंदेही जिल्ह्यात आढळतात. पूर्णा नदीवरील येलदरी व सिद्धेश्वर या धरणांमुळे शेतीविकासास व वीजनिर्मितीस चालना मिळाली आहे.

वने आणि प्राणी

वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने पाण्याचा तुटवडा हा महत्त्वाचा अडसर होय. त्यामुळे जंगलक्षेत्र एकंदरीत कमीच. एकूण क्षेत्राच्या केवळ ३% क्षेत्र जंगलाखाली असून त्यातही पानझडी आणि काटेरी झाडे-झुडपे सापडतात.

जंगलक्षेत्र डोंगराळ भागात आढळते. नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन शेतीखाली आणण्याच्या दृष्टीने तेथे जंगलतोड झालेली आहे. जंगलांत साग, सालई, पळस, खैर, बाभूळ, बोर यांसारखी झाडे आढळतात.

तुटपुंजे व विरळ जंगल आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार थोड्या प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी अजूनही आढळतात परंतु त्यांच्या संख्येत पुष्कळच घट होत आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे.

नैसर्गिक जलाशय कमी असल्यामुळे जिल्ह्यात पक्षी फारच कमी आहेत. कबूतर, मोर, कवडे, सुतार, पाणकावळा, पाणबदके इ. पक्षी जलाशयांच्या आसपास आढळतात. जंगलांपासून मुख्यतः जळाऊ लाकूड, तेंडूची पाने व रोशा गवत मिळते.

खेळ

परभणीमध्ये फुटबॉल, स्विमिंग पूल, टेनिस, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट क्लब, बास्केटबॉल क्लब, बेसबॉल क्लब अशा अनेक क्रीडा प्रतिष्ठान उपलब्ध आहेत. हे क्लब पीएमसीच्या क्रीडा विभागामार्फत चालविले जातात.

याव्यतिरिक्त, परभणीकडे “जिल्हा स्टेडियम” एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे. हे पीएमसीच्या मालकीचे आहे आणि क्रीडा विभाग संचालित करते.

परभणी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

  • परभणी – मराठवाडा कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील शिवाजी उधान प्रेक्षणीय असून येथील रोशनखान गाढीही प्रसिद्ध आहे.
  • मानवत – मानवत ही कापडाची मोठी बाजारपेठ आहे.
  • गंगाखेड – तालुक्याचे मुख्य ठिकाण ‘दक्षिण काशी’ नावाने ओळखले जाते. येथे संत जनाबाईची समाधी आहे.
  • चारगणा – जिंतुर तालुक्यात दगडी झुलता मनोरा आहे.
  • जिंतुर – तालुक्याचे ठिकाण . येथील गुहा व जैन शिल्पे प्रसिध्द.
  • पूर्णा – पूर्णा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम.
  • जांभूळभेट – मोरसाठी प्रसिध्द.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

डोहाचे मनोगत मराठी निबंध
शेतकऱ्याचे आत्मवृत मराठी निबंध
पोपटाचे मनोगत मराठी निबंध
दप्तराचे आत्मवृत्त मराठी निबंध

Leave a Comment