विकीमित्र मध्ये आपले स्वागत! नमस्कार वाचकहो, संगणक Computer हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक झालेला आहे. संगणकाशिवाय आजचे युग अशी कल्पना देखील धडकी भरवते. संगणक हा विविध भागांचा मिळून बनलेला असतो. मात्र मोजके काही भाग सोडता आपल्याला संगणकाच्या प्रत्येक भागाची विस्तृत माहिती नसते. या लेखामध्ये आपण संगणकाचे भाग (information about computer parts in marathi) व त्याचे कार्य याबद्दल माहिती बघूया…
संगणकाचे भाग (parts of computer in marathi )
सी पी यु CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट central processing unit
सी पी यु म्हणजे संपूर्ण संगणक संचाचा आत्मा होय सी पी यु हा अनेक लहान लहान विद्युत भागांनी circuits बनलेला असतो. आजमितीस वापरण्यात येणाऱ्या सी पी यु मध्ये सुमारे 42 कोटी ट्रांजिस्टर Transistors बसवलेले असतात. संपूर्ण संगणकाचे काम या सीपीयू मधूनच चालते सीपीयू मधील इनपुट Input विभागाला सर्व इनपुट उपकरणे Input Devices जोडलेले असतात. या विभागाचे काम फक्त विविध उपकरणांकडून संवेदना घेणे व त्या पुढे प्रक्रिया विभागाला processing unit पाठविणे इतकेच असते या विभागाकडून प्रक्रिया विभागाला पाठविलेली माहिती अथवा संवेदनांवर प्रक्रिया केली जाते व योग्य तो परिणाम तयार केला जातो व आउटपुट विभागाकडे output unit पाठवला जातो.
आउटपुट विभाग सदर माहितीला वापरकर्त्याला समजेल अशा प्रकारे रुपांतरीत करते व आउटपुट डिव्हाइसेस output devices म्हणजेच उपकरणांच्या द्वारे वापरकर्त्यापर्यंत पोहोचवते. संगणकाच्या प्रक्रिया युनिट ला माहिती देताना व घेताना भाषेचा बदल केला जातो ज्याला एन्कोडींग encoding व डिकोडिंग decoding म्हटले जाते. त्याचप्रमाणे सीपीयू मध्ये ए अँड एल यु A&LU म्हणजेच अरीथमॅटिक अँड लॉजिक युनिट Arithmetic & Logic Unit नावाचा देखील एक विभाग असतो. ज्यामध्ये सांख्यिकी माहिती व तर्कसंगत माहितीवर प्रक्रिया केली जाते.
याखेरीज या सर्व विभागांची सुसूत्रता साधण्याचे काम सॉफ्टवेअर्स Softwares करत असतात संपूर्ण संगणक ज्या सॉफ्टवेअर द्वारे नियंत्रित केला जातो त्याला ओ एस OS ऑपरेटिंग सिस्टम Operating system असे म्हणले जाते. तसेच विविध प्रकारच्या कामासाठीही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरली जातात.
इनपुट उपकरणे (Computer Input devices in marathi)
कीबोर्ड Key-Board (computer keyboard information in marathi)
कीबोर्डला मराठी मध्ये कळफलक असे म्हणले जाते संगणकाला विविध कामे करण्यासाठी आज्ञा द्याव्या लागतात त्या आज्ञा देण्याचे काम हा कीबोर्ड करत असतो. कीबोर्ड वर फंक्शन की function key नुमेरिक की numeric key, अल्फाबेटिकल की Alphabetical key या आणि इतरही अनेक प्रकारच्या कीज म्हणजे बटने असतात. कि-बोर्ड वरील सगळी बटणे एका विशिष्ट क्रमानेच लावलेली असतात. सध्या आपण वापरत असलेला कीबोर्ड हा QWERTY प्रकारातील आहे. त्याचप्रमाणे QWERTZ, AZERTY, QZERTY इत्यादी प्रकारचे देखील कीबोर्ड असतात.
माउस Mouse (computer mouse information in marathi)
कीबोर्ड नंतरचा महत्वाचा इनपुट भाग म्हणजे माऊस. माऊस संगणकाच्या स्क्रीनवर एका बाणाच्या रूपात आढळतो व विविध आज्ञा देण्यासाठी वापरला जातो माउस ला राईट बटन लेफ्ट बटन व स्क्रोल बटन या प्रकारची तीन बटन असतात. माऊसच्या सहाय्याने नेवीगेशन कीबोर्ड पेक्षाही सुसह्य होते माऊसचे मेकॅनिकल माऊस ऑप्टिकल माऊस व वायरलेस अथवा कॉर्डलेस माऊस असे प्रकार आहेत मेकॅनिकल माउस च्या तळाला एक गोटी सदृश्य बॉल असतो ज्याच्या फिरण्याने माऊस सीपीयू ला संवेदना पाठवतो. मात्र ऑप्टिकल माऊस मध्ये बोल ऐवजी एक प्रकाश टाकणारा बल्ब आणि सेंसर असतो वायरलेस आणि ऑप्टिकल माऊस हा वायर सोडता इतर बाबतीत समानच असतो. माऊसचे बटण दाबण्याच्या क्रियेला क्लिक असे म्हणतात. क्लिक डबल क्लिक राईट क्लिक याद्वारे आपण संगणकाला हव्या त्या आज्ञा देऊ शकतो.
स्कॅनर scanner (computer scanner information in marathi)
विविध प्रकारच्या हार्ड कॉपीना सॉफ्ट कॉफी मध्ये रूपांतरित करण्याचे काम स्कॅनर करतात म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या कागदावरील चित्र अथवा मजकुराला संगणकाला समजेल व त्यावर प्रक्रिया करू शकेल अश्या भाषेत रूपांतरित करण्याचे काम स्कॅनर करते.
स्कॅनर चे ऑप्टिकल स्कॅनर बारकोड रीडर स्कॅनर अक्षरे व चिन्हे ओळखणारे स्कॅनर असे प्रकार आहेत.
आउटपुट उपकरणे (Computer Output devices in marathi)
मॉनिटर Monitor (computer monitor information in marathi)
आपल्या घरातील दूरदर्शन अर्थात TV सारख्या दिसणाऱ्या भागाला मॉनिटर असे म्हणतात यालाच व्ही डी यु VDU व्हिज्युअल डिस्प्ले युनिट Visual Display Unit देखील म्हटले संगणकाला आज्ञा देण्यासाठी तसेच प्रक्रिया केलेली माहिती बघण्यासाठी मॉनिटरचा वापर होतो साधारणपणे 15 इंचा पासून ते एकवीस इंचापर्यंत या आकारात मॉनिटर उपलब्ध आहेत. साईजनुसार मॉनिटर च्या किमतीमध्ये तफावत आढळते तसेच विविध ब्रँड नुसार देखील मॉनिटरच्या किमतीत बदल होत जातो. जुन्या काळातील मोठ्या मॉनिटरला सी आर टी CRT कॅथोड रे ट्यूब म्हणतात. आज-काल एल सी डी LCD किंवा एल इ डी LED प्रकारचे मॉनिटर वापरले जातात. मॉनिटर वरील चित्रांच्या दर्जा रेझोलेशन नुसार ठरतो. आज-काल काही लॅपटॉप टच स्क्रीन प्रकारात देखील मिळतात.
प्रोजेक्टर Projector (projector information in marathi)
मॉनिटर व प्रोजेक्टर यांचे कार्य एकच असते जेव्हा मोठ्या समुदायाला एखादी गोष्ट बघणे अथवा दाखविणे गरजेचे असते त्यावेळेस प्रोजेक्टर वापरला जातो. प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित माहिती प्रकाशाच्या सहाय्याने प्रोजेक्टर फिल्म वर उमटते व इतर लोक बघू शकतात प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित माहिती झूम करून लहान अथवा मोठी केली जाऊ शकते. प्रोजेक्टर च्या किमतीमध्ये देखील ब्रँड नुसार बदल होतो
स्पीकर speaker (speaker information in marathi)
स्पीकर शिवाय संगणक संच अपूर्ण आहे विविध प्रकारच्या ध्वनी फाईली किंवा चलतचित्र फाईली संगणकावर सुरू करण्यासाठी स्पीकर हा आवश्यक असतोच. बहुतेक बऱ्याचशा सीपीयू मध्ये स्पीकर बसवलेला असतो मात्र वापरकर्ते शक्यतो बाह्य स्पिकरला प्राधान्य देताना दिसतात. कारण यामध्ये विविध वाद्यांचा समतोल योग्यप्रकारे ऐकायला मिळू शकतो. तसेच सिनेमा बघताना लाईव्ह असल्याचा आभास देतो.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला computer parts information in marathi, parts of computer in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका. आशा आहे आपण या माहितीने नक्कीच समाधानी असाल.