पास्ता रेसिपी मराठी Pasta Recipe in Marathi

पास्ता रेसिपी मराठी Pasta Recipe in Marathi पास्ता ही रेसिपी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज किंवा इटालियन पदार्थांची मागणी करत असतो.  त्यामध्ये पिझ्झा, पास्ता हे आपले आवडते असतात.  हॉटेलमध्ये जशा प्रकारचे पदार्थ मिळतात तसे आपण आपल्या घरी पदार्थ बनवू शकत नाही, अशी बऱ्याच जणांची चुकीची समजूत असते; परंतु आपण हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ तशाच सोप्या व सरळ पद्धतीने बनवू शकतो.  तेही अति मसाल्यांचा वापर न करता आरोग्यासाठी आवश्यक एवढा चमचमीत आणि तितकाच स्वादिष्ट पास्ता आपण घरच्या घरी बनवू शकतो.  तर आज आपण पास्ता रेसिपीमध्ये मसाला पास्ता रेसिपी पाहणार आहोत.

 Pasta Recipe

पास्ता रेसिपी मराठी Pasta Recipe in Marathi

पास्ता रेसिपी प्रकार  :

आजकाल रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पास्ता ही रेसिपी उपलब्ध आहे.  व्हाईट सॉस पास्ता, मसाला पास्ता, व्हेज पास्ता, रेड सॉस पास्ता, चीज पास्ता, मॅकरॉणी पास्ता, टोमॅटो पास्ता,

पिंक सॉस पास्ता,  इटालियन पास्ता व चायनीज पास्ता इत्यादी प्रकारांमध्ये पास्ता उपलब्ध आहे.  या वेगवेगळ्या पद्धतींच्या पास्त्याची चव देखील वेगवेगळी असते परंतु सर्वच पास्ते खायला अतिशय उत्तम प्रकारच्या असतात.  या वरील प्रकरण पैकी आपण आपल्या घरी रेस्टॉरंट सारखा पास्ता रेसिपी बनवू शकतो तेही काही मिनिटांमध्ये.  तर जाणून घेऊया त्यासाठी लागणारी सामग्री.

ही रेसिपी किती जणांकरिता आहे?

ही रेसिपी आपण 2 जणांंकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

पास्ता रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पास्ता कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे वेळ लागतो.

टोटल  टाईम :

पास्ता या रेसिपीसाठी एकूण टाईम आपल्याला 20 मिनिटे लागतो.

साहित्य  :

1)  पास्ता एक वाटी

2)  एक कांदा बारीक चिरलेला

3)  एक टोमॅटो बारीक चिरलेला

4)  एक गाजर छोटे बारीक चिरलेले

5) अर्धी सिमला मिरची बारीक चिरलेली

5) एक चमचा तिखट

6) अर्धा चमचा गरम मसाला

7) चवीनुसार मीठ

8) तेल

9)  एक चमचा आलं लसूण बेस्ट

10) तीन चमचे मक्याचे उकडलेले दाने

मसाला पास्ता बनवण्याची पाककृती  :

  • सर्वप्रथम आपल्याला पास्ता उकडून घ्यायचा आहे, त्यासाठी गरम पाणी ठेवा आणि त्यामध्ये मीठ आणि पास्ता टाकून उकडून घ्या.
  • पास्ता उघडेपर्यंत एका दुसऱ्या कढईमध्ये तेल टाका व त्यामध्ये लसण अद्रक किसून टाका तसेच त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मक्याचे दाणे व गाजर टाकून थोडं वाफवून घ्या.
  • तसेच त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून परतून घ्या सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाका व वरून उकडलेला पास्ता टाकून छान परतून घ्या.
  • तुमचा मसाला पास्ता रेसिपी तयार आहे, वरून ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला व चीज किसून घ्या आणि मसाला पास्ता रेसिपी सर्व्ह करा.

रेड सॉस पास्ता :

बरेच लोक मसाल्यापासनपेक्षा रेड सॉस पास्ता पसंत करतात.  त्यांच्यासाठी खास हि रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.  तर चला मग बघूया रेड सॉस पास्त्या साठी लागणारी सामग्री.

सामग्री  :

1)  एक वाटी पेनी पास्ता

2)  2 टोमॅटो

3) तीन लाल मिरची

4) एक कांदा बारीक चिरलेला

5) पाव चमचा काळी मिरी पावडर

6)  एक चमचा लसूण बारीक केलेला

7) एक चमचा हब्स

8)  दोन चमचे तेल

9)  चिली फ्लेक्स एक चमचा

10)  चवीनुसार मीठ

रेड सॉस पास्ता बनवण्याची पद्धत :

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्या त्यामध्ये टोमॅटो, लाल मिरची एकत्र टाका.
  • त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित उकडून घ्या शिजल्यानंतर थंड होऊ द्या आणि टोमॅटोची साल काढून त्याची पेस्ट करून घ्या.
  • दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये पेनी पास्ता उकडून घ्या.
  • पास्ता उकडून झाला की, एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि चिरलेला कांदा लसूण छान परतून घ्या.
  • कांदा लाल झाला की, त्यामध्ये तयार केलेला पास्ता सॉस टाकून शिजवून घ्या आणि मग त्याला चांगली उकळी येऊ द्या.
  • त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि हब्स टाकून त्याला उकळी येऊ द्या.
  • आता त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पास्ता टाका आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या.  व छान परतून घ्या.  आता हा पास्ता तयार आहे.
  • पास्ता डिशमध्ये काढून घ्या आणि त्यावर चीज किसून सर्व्ह करा.

पोषक घटक :

पास्त्यामध्ये प्रथिन, ऊर्जा, फायबर, लोह, कॅल्शियम,  सोडियम व शुगर इत्यादी पौष्टिक घटक असतात.

फायदे  :

पास्त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.  त्याचे फायदे निश्चितच आपल्या शरीराला होतात.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारामध्ये गव्हापासून बनलेला पास्ता तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहील.

पास्त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे आपण आहारामध्ये त्याचा उपयोग केला असता,  आरोग्यासाठी व शरीरासाठी पोषक आहे.

पास्त्यामध्ये फायबर हा घटक असतो.  तो शरीरासाठी अत्यावश्यक आहे.  त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते व वजनही संतुलित राहते, तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील यामुळे कमी होऊ शकते.

पास्ता खाण्याचे तोटे  :

जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पास्त्याचे सेवन केले तर तुम्हाला पोट दुखी किंवा पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.  कारण पास्त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते आणि हे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.

तसेच मलाईदार किंवा पांढरा पास्ता खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढण्याची शक्यता असते, म्हणून आपण अधून-मधूनच पास त्याचे सेवन करावे.

ज्याला कोलेस्ट्रॉल ची समस्या आहे, अशांनी क्रीम युक्त पास्ता खाणे टाळावे.

तर मित्रांनो,  तुम्हाला पास्ता रेसिपी ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment