पीसीओडीची संपूर्ण माहिती PCOD Information In Marathi

PCOD Information In Marathi महिलांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना तर करावाच लागतो परंतु आरोग्यविषयक समस्यांचा सुद्धा त्यांना बराच प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामध्येच पॉलीसिस्टीक डिंबग्रंथी रोग (PCOD) आणि पॉलिसिस्टीक डिंबग्रंथी सिंड्रोम (PCOS) या दोन्ही समस्या साधारणपणे स्त्रियांना होतात. कारण ह्या समस्या त्यांच्या अंडाशयाचे कार्य आणि त्यांच्या हार्मोनशी संबंधित असतात. बऱ्याच स्त्रियांना या दोन्ही बिमारींमध्ये फरक जाणवत नाही परंतु ह्या दोन्हीही वेगवेगळ्या समस्या आहेत.

PCOD Information In Marathi

पीसीओडीची संपूर्ण माहिती PCOD Information In Marathi

पीसीओडी म्हणजे काय?

पीसीओडी ही एक वैद्यकीय स्थिती आहे. जिथे अंडाशय वेळेपूर्वीच अंडी सोडतात. जी कालांतराने सिष्टमध्ये रूपांतर होतात आणि असे झाल्यानंतर महिलांना अनियमित पाळी, वजन वाढणे, पुरुषांप्रमाणे केस गळणे, पोटदुखी यांसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

या अवस्थेमध्ये अंडाशयाचा आकार वाढत जातो आणि शरीरात हाय लेबर वर मेन हार्मोन्स रिलीज होतात. या परिस्थितीसाठी जंकपूड अत्याधिक सेवन आणि लठ्ठपणा यासारख्या अनहेल्दी लाइफस्टाइल सवयी तुमच्यासाठी घातक ठरू शकतात किंवा जास्तीत जास्त सेवन केल्यामुळे तुम्हाला ह्या समस्या होऊ शकतात.

पीसीओएस म्हणजे काय?

पीसीओएस हे एक अंतस्त्रावी प्रणालीचा एक चायापचय विकार आहे. या परिस्थितीमध्ये शरीरात मेल हार्मोन्स जास्त प्रमाणात रिलीज होतात. ज्यामुळे ओव्हरलेशनमध्ये अनियमितता येते. या अवस्था निर्माण झाली असल्यास अंडाशयामध्ये बरीच सिस्ट म्हणजेच छोट्या छोट्या आकाराच्या गाठी तयार होतात. ही परिस्थिती पीसीओडीपेक्षा अधिक धोकादायक आणि गंभीर असते. या परिस्थितीमध्ये वजन हे वेगाने वाढू लागते.

पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काय फरक आहे जाणून घेऊया :

पीसीओडी हा पूर्णपणे रोग मानला जात नाही कारण ही एक सामान्य स्थिती आहे तर पीसीओएस ही एक गंभीर समस्या आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून आपण पीसीओडी मुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्यामध्ये हेल्दी आहार आणि व्यायाम करणे गरजेचे असते तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर पीसीओएस उपचार करणे सुद्धा आवश्यक असते. हा एक चयापचय विकार आहे.

जगातील एक तृतीयांश महिला टीसीओडी या रोगांनी ग्रस्त आहे. त्यामुळे ही एक सामान्य समस्या मानली जाते परंतु पीसीओएस ही एक गंभीर स्थिती असून हा एक आजार आहे. त्यामुळे पीसीओडीनेग्रस्त महिलांच्या तुलनेत खूपच कमी प्रकरणे पीसीओएस चे आहेत.

अंतस्त्रावी सिस्टीम डिसऑर्डर म्हणजेच एंडोक्राइन सिस्टीम ऑर्डर हार्मोनल संतुलन झाल्यास हे कारणीभूत ठरू शकते परंतु याला विकार म्हणता येणार नाही परंतु पीसीओएस हा एक आजार असून त्याची दखल घेणे खूप गरजेचे असते.

गर्भावस्था आणि आरोग्य विषयक समस्या :

पीसीओडी हा एक गंभीर आजार नसल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त स्त्रियांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही किंवा स्त्रियांच्या फर्टिलिटीवर कोणताही परिणाम जाणवत नाही. पीसीओडीनेग्रस्त महिला फर्टाईल असतात. त्यांना गर्भवती होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. त्या सहजपणे आई होऊ शकतात.

तर दुसरीकडे पीसीओएस या महिलांच्या गर्भधारणे प्रथम पातळीवर खूप मोठे समस्या निर्माण होते. पीसीओएसग्रस्त महिलांना हार्मोनल असंतुलनामुळे गर्भवती होणे खूप अवघड जाते. त्यांचे अंडाशय दररोज प्रेग्नेंसीसाठी आवश्यक असणारी अंडी रिलीज करण्यास सक्षम नसतात. अशा परिस्थितीत कधीकधी स्त्रियांना त्यांच्या गर्भवस्थेत आणि गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो.

पीसीओडी या आजाराचे शरीरावर होणारे परिणाम :

पीसीओडीची समस्या ज्या महिलांना असते, त्या महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. त्यानंतर त्यांच्या हार्मोनल असंतुलनामुळे त्यांना खूप भावनिक अशांततेला समोर जावे लागते.

त्यांची वजन झपाट्याने वाढू लागते तसेच काही महिला सतत अशक्तपणाच्या तक्रारी सुद्धा करतात. बऱ्याचदा पिरेडसमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कधी कधी खूप जास्त रक्तस्त्राव होतो.

पीसीओडी ची लक्षणे :

चेहऱ्यावर डाग येणे, अनावश्यक केस येणे, वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन तसेच केस गळणे, मासिक पाळी अनियमित असणे तसेच असहाय्य वेदना होणे, चिडचिड वाढणे, सहनशक्ती कमी होणे, रडू येणे ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहे.

या समस्येचे नेमके कारण काय आहे?

तर डॉक्टरांच्या मते, अनियमित जीवनशैलीचा वापर असल्याने हा आजार होतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे तसेच जास्तीत जास्त ताण तणाव इत्यादी कारणांमुळे पीसीओडी तुम्हाला होऊ शकतो. बऱ्याचदा ही समस्या अनुवंशिकतेमुळे सुद्धा होण्याची शक्यता असते.

पीसीओडी आणि पीसीओएस यावर काय उपाय कराल :

पीसीओएस आणि पीसीओडी हे दोन्ही असे आजार आहे. ज्यामध्ये अंडाशय आणि हार्मोन्सचा समावेश असतो परंतु त्यामध्ये खरं आहे, हे आपण जाणून घेतले आहे. पीसीओडी पेक्षा खूपच गंभीर आजार आहे. परंतु लवकरात लवकर आपण त्याचे निदान केल्यास दोघांवर सुद्धा उपचार करणे सोपे जाऊ शकते.

त्यासाठी तुम्ही निरोगी आहार आणि फिटनेस कडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्ही फिटनेसच्या नियमांचे पालन केल्यास दोन्ही आजार कमी होण्यास मदत होतात. तुम्हाला जर वरीलपैकी कोणतेही लक्षणे जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यामुळे तुमच्यासमोर ह्या समस्या निर्माण होणार नाहीत.

तुमची दिनचर्या कशी असावी :

ज्यामुळे या रोगाशी संबंधित समस्या कमी होतील. पीसीओडीही समस्या हार्मोनसी संबंधित आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची जीवनशैली अशा प्रकारे व्यवस्थित करावी लागेल. ज्यामुळे हार्मोन्स स्त्राव योग्य प्रकारे होईल. त्यामध्ये आहाराची काळजी घ्या आणि ऋतूनुसार फळे खा. निसर्गाशी संपर्क साधा तसेच एखाद्या पार्कमध्ये चालणे, धावणे जॉगिंग करणे आणि दररोज तुम्ही व्यायाम करा. तसेच भरपूर पाणी प्या, चांगली पुस्तके वाचा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही सुद्धा शांत राहण्यास मदत होते.

तुमचा आहार कसा असावा :

ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे. त्यांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी घरी तयार केलेले शुद्ध अन्न खाल्ले पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्न त्यांनी टाळले पाहिजे. फायबर आधारित आहार घेणे फायदेशीर ठरतो. त्यामध्ये भाज्या, धान्य, दाळ इत्यादींचा आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे.

तुम्ही तेलकट अन्न कमी खाण्याचा प्रयत्न करा तसेच अन्न पूर्णपणे शिजवून खा.

चहा कॉफी यासारखे पदार्थ बंद करा. शक्य नसल्यास दिवसातून केवळ एक किंवा दोनदाच तुम्ही घेऊ शकता. साखरेचा वापर सुद्धा मर्यादित करा.

जंक फूड यापासून दूर राहा, त्याऐवजी सुकामेवा, नट, दुध, दही, फळे आणि मास यासारख्या आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.

FAQ

PCOD चा फुल फॉर्म काय आहे?

Polycystic Ovarian Disease.

PCOD ही समस्या कोणाला होते?

पीसीओडी ही समस्या स्त्रियांमध्ये उद्भवतात.

PCOD या समस्येचे काय कारण आहे?

अनियमित जीवनशैलीचा वापर असल्याने हा आजार होतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे तसेच जास्तीत जास्त ताण तणाव इत्यादी कारणांमुळे पीसीओडी तुम्हाला होऊ शकतो. बऱ्याचदा ही समस्या अनुवंशिकतेमुळे सुद्धा होण्याची शक्यता असते.

पीसीओडी हा रोग कशाशी संबंधित आहे?

पीसीओडी हा रोग स्त्रियांच्या अंडाशयाचा रोग आहे.

पीसीओडी यावर कोणती लक्षणे दिसतात?

चेहऱ्यावर डाग येणे, अनावश्यक केस येणे, वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन तसेच केस गळणे, मासिक पाळी अनियमित असणे तसेच असहाय्य वेदना होणे, चिडचिड वाढणे, सहनशक्ती कमी होणे व रडू येणे ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहे.

Leave a Comment