पायनापल केक रेसिपी मराठी pineapple cake recipe in Marathi

पायनापल केक रेसिपी मराठी pineapple cake recipe in Marathi लहान मुलांना केक खाण्यासाठी खूपच आवडतो. पायनॅपल केक ही रेसिपी आजकाल खूपच प्रचलित झाली आहे. खाण्यासाठी पौष्टिक असूनही रेसिपी दिसायलाही आकर्षक आहे. वाढदिवस लग्न वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रम असेल तर आपण एक आणत असतो. आज काल रेडिमेट केक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला दिसून येतात. लहान मुलांना केक खूपच आवडतो. मग विकत आणून केक खाल्ल्यापेक्षा जर स्वतःच आपण घरी तयार केला तर किती बरे वाटेल. तसेच जेव्हा आपले मन पडेल तेव्हा आपण घरच्या घरी केक तयार करून खाऊ शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

pineapple cake

पायनापल केक रेसिपी मराठी pineapple cake recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

केक बनवण्याच्या विविध रेसिपीज आहेत. आजकाल केकच्या वेगवेगळ्या डिझाईन तसेच फेवर उपलब्ध आहेत. बेकरीवर केक खरेदी करण्यासाठी गेला असता, आपल्याला खूपच महागडे रेट दिसतात; परंतु आपण घरच्या घरी जर केक तयार केला. तर आपल्याला स्वस्त पडतो व बेकरी सारखाच टेस्टी व चविष्ट केक आपण घरी तयार करू शकतो. केकमध्ये रवा केक, अंडा केक, चॉकलेट केक, बिस्कीट केक, पायनॅपल केक, ॲपल केक, बनाना केक इत्यादी केक रेसिपीज आहेत. केक तयार करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आज तुम्हाला सांगणार आहोत. तर आज आपण पायनॅपल केक कसा बनवायची तसेच त्यासाठी लागणारी सामग्री काय आहे याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार करणार आहोत ?
केक की रेसिपी साधारण 7 व्यक्ती खाऊ शकतील एवढी तयार होईल.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

पायनॅपल केकच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पायनॅपल केक बेक करण्यासाठी व सजवण्यासाठी आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

पायनॅपल केक की रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 50 मिनिटे एवढे लागतो.

पायनॅपल केक तयार करण्याकरता लागणारी सामग्री :

1) दोन अंडी
2) 100 ग्रॅम मैदा
3) 100 ग्रॅम साखर
4) एक चमचा बेकिंग सोडा
5) एक चमचा कलमी पावडर
6) एक चमचा मीठ
7) 50 ग्रॅम बटर
8) 100 ग्रॅम अननस तुकडे
9) व्हॅनिला इनसेन्स एक चमचा
10) एका लिंबाची बारीक साल
11) दूध ग्रीन 50 ग्रॅम
12) किसलेला अनारसा गर

पायनॅपल केक तयार करण्याची पाककृती :

  • पायनॅपल केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 350 डिग्रीवर ओहन गरम करण्यासाठी ठेवा.
  • नंतर त्यामध्ये नऊ इंच नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवा त्यामध्ये 50 ग्रॅम बटर व कापलेले अनारसे गराचे तुकडे घाला. नंतर पाच ते दहा मिनिटं हे छान होऊ द्या.
  • तोपर्यंत एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, मीठ व कलमी पावडर छान मिसळून घ्या. तसेच दुसऱ्या भांड्यात अंड्यांना फोडून ते चांगले फेटून घ्या.
  • त्यात बटर साखर लिंबाची बारीक साल व व्हॅनिला इसेन्स घाला नंतर पाच मिनिटे फेटून घ्या.
  • नंतर मैद्याच्या आट्याला चांगले फेटून घ्या. तयार अननसाच्या गराचे मिश्रण त्यामध्ये घालून घ्या.
  • अंड्याचे मिश्रणही यामध्ये घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
  • आता केकच्या भांड्याला आतून बटर लावून घ्या व हे मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्या.
  • आता ओव्हन मध्ये 25 ते 30 मिनिटे हे केकचे भांडे ठेवा नंतर भांडे काढून चेक करून घ्या.
  • आत मधून केक शिजला का केक छान झाला असेल तर भांड्यातून केक काढून घ्या व त्याला क्रीम व अननस घर टाकून छान सजवून घ्या.
  • अशाप्रकारे तुम्ही पायनॅपल केक तयार करू शकता ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व आम्हालाही तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

पोषक घटक :

पायनॅपलचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामध्ये इतर पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. जसे की, पायनॅपल केकमध्ये चरबी, बिटा-केरोटीन, विटामिन ए, विटामिन सी, पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम व मॅग्नेशियम असते.

फायदे :

पायनॅपल संधीवातासाठी फायदेशीर ठरतो. एखाद्याला जर संधिवाताचा त्रास होत असेल तर त्यांनी नियमित पायनॅपलचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

पायनॅपल केक खाल्ल्यामुळे एनर्जी भरल्यासारखे वाटते, तसेच मूड फ्रेश होते.

पायनॅपलमध्ये त्यामधील विटामिन ए आणि बीटा केरोटीन हे सांधेदुखीवर औषधी म्हणून काम करतात, आपल्याला आराम मिळतो. तसेच सूज व त्रास देखील कमी होतो.

पायनॅपल खाल्ल्यामुळे दात व हाडे देखील मजबूत होतात. तसेच त्यामधील कॅल्शियम मॅग्नेशियम चे प्रमाण असल्यामुळे दात व हाडे दुखीवर आराम मिळतो तसेच शरीरावर आलेली सूज कमी होते.

पायनॅपल हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम औषधी आहे. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे हृदय संबंधित आजारापासून आपले संरक्षण करतात.

रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तोटे :

पायनॅपल केक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला फायदे तर होतातच परंतु त्याची जर अतिरिक्त सेवन केले तर शुगर लेवल अचानक वाढू शकते तसेच डोकेदुखी सारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

तर मित्रांनो, पायनॅपल केक या रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment