पोहा कटलेट मराठी Poha Cutlet Recipe In Marathi

पोहा कटलेट मराठी Poha Cutlet Recipe In Marathi  पोहा कटलेट हा पदार्थ पोहे आणि बटाटे पासून बनवला जातो, हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. पोहा कटलेटचा उपयोग सकाळी नाष्टा म्हणून केला जातो. विविध ठिकाणी पोहा कटलेट वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते. हा भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे, आणि हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. पोहा कटलेट हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यांमध्ये विविध घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार पोहा कटलेट खाण्यासाठी मिळतात. मोठ्या शहरात हा पदार्थ सहज मिळून जातो, काही लोकांना पोहा कटलेट खूप आवडते, पण त्याचा परिसरात चवदार पोहा कटलेट मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पोहा कटलेट कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण पोहा कटलेट रेसिपी पाहणार आहेस.

Poha Cutlet

पोहा कटलेट मराठी Poha Cutlet Recipe In Marathi

पोहा कटलेटचे प्रकार :

पोहा कटलेट हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. विविध ठिकाणी पोहा कटलेट वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे व्येज कटलेट, ब्रेड कटलेट, पोहा कटलेट, साधे कटलेट हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
पोहा कटलेट ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

पोहा कटलेटच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

पोहा कटलेट तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पोहा कटलेट कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

पोहा कटलेट बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावे लागतात, यासाठी आपल्याला टोटल टाईम 30 मिनिट वेळ लागतो.

पोहा कटलेटसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) अर्धा पाव पोहे.
2) 3 ते 4 मध्यम बटाटे.
3) 3 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
4) 5 ते 6 हिरवी मिरची.
5) 1 वाटी रवा.
6) 1 चमच हळद.
7) 1 चमच गरम मसाला.
8) थोडी कोथिंबीर.
9) तेल, मीठ.
10) 1 चिमूट साखर.
11) 1 कांदा.
12) थोडा कढीपत्ता.

पाककृती :

 • सर्वात प्रथम बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्यावे, नंतर कांदा बारीक चिरून घ्या.
 • नंतर पोहे 2 मिनिट पाण्यात भिजू घालून, त्यातील पूर्ण पाणी काढून टाका.
 • नंतर गॅस वरती कुकर ठेऊन, त्यामध्ये बटाटे उकळू घाला, आणि 2 ते 3 शिट्या होईपर्यत चांगले शिजू घ्या.
 • नंतर बटाटे चांगले झाले की, खाली काढून थोडा वेळ थंड होऊ द्या, आणि त्याची साल काढून चांगले मॅश करा.
 • आता गॅस वरती एक खोल तळाची कढई किंवा पॅन ठेवा, त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
 • तेल गरम झाले की, यामध्ये प्रथम बारीक कांदा टाका, कांदा चांगला पारदर्शी होये पर्यत परतवत रहा.
 • नंतर यामध्ये लसन अद्रक-पेस्ट टाकून कच्चा वास निघे पर्यत चांगला भाजून घ्या.
 • नंतर यामध्ये बारीक हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता टाका, आणि चांगला भाजून घ्या.
 • हा सर्व मसाला झाला की, नंतर यामध्ये थोडी हळद, गरम मसाला टाकून चांगले मिक्स करा.
 • नंतर यामध्ये मॅश केलेले बटाटे, पोहे, आणि चवीनुसार थोडे मीठ टाका, आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्या.
 • आणि 2 मिनिट परतवत रहा, नंतर यावर थोडी बारीक कोथिंबीर टाका, आणि 2 मिनिट गॅस वरती राहू द्या.
 • नंतर गॅस बंद करून पोहे थोडा वेळ थंड होऊ द्या, थंड झाले की, या मसाल्याचे लहान-लहान चपटे गोळे तयार करा.
 • आणि हे गोळे रव्यामध्ये चांगले गोट करून घ्या, अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्या.
 • आता गॅसवर कढई ठेवा, त्यामध्ये तेल टाकून गरम करा, नंतर तेल गरम झाले की गॅस मध्यम आसेवर ठेवा.
 • त्यामध्ये एक-एक करून हे गोळे तळून घ्या. दोन्ही भाजून चांगले लालसर झाले की, हे गोळे एका पेपरवरती काढा. म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल, अशा प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
 • आता आपले स्वादिष्ट गरमा गरम पोहा कटलेट खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये घेऊन आपण पोहा कटलेट खाण्यासाठी आनंद घेऊ शकतो.
 • छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती

पोहा कटलेटमध्ये असणारे घटक :

पोहा कटलेट हा वेग-वेगळ्या पौष्टिक पदार्था पासून बनवले जातो. यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, फॅट, व्हिटॅमिन, फॉस्फरस, लोह, कर्बोदके, फायबर, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

पोहा कटलेट सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, लोह सारखे घटक मिळतात.

यामुळे आपले शरीरात हिमोग्लोबिन, आणि रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते.

यातील फॅट, चरबी, व्हिटॅमिन हे घटक आपली शारिरीक वाढ होण्यास मदत करतात.

पोहा कटलेट मधील सर्व पौष्टिक घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

पोहा कटलेट हा पदार्थ आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला मळ-मळ आणि पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरासाठी जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून पोहा कटलेट आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही.

तर मित्रांनो, तुम्हाला पोहा कटलेट रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment