पोहा रेसिपी मराठी poha recipe in marathi

पोहा रेसिपी मराठी poha recipe in marathi पोहे हा एक महाराष्ट्रातील लोकप्रिय नाष्टा आहे, जो भारतात पण खूप ठिकाणी सकाळी वापरल्या जातो.  पोहे हे भाता पासून बनलेले असतात.  यामध्ये दोन प्रकारचे पोहे असतात.  एक कागदी पोहे जे पतले पोहे असतात, आणि एक जाड पोहे असतात.  हॉटेल किंवा बेकरीमध्ये विविध प्रकारे आणि स्वादिष्ट पोहे खायला मिळतात.  अनेक शहरात पोहे हा एक प्रसिद्ध नाष्टा आहे, आणि लोकप्रिय सुध्दा, आपल्याला बऱ्याचदा पोहे खावशे वाटतात.  आपल्या घरी पाहुणे आले की, आपण त्यांना सहज पोहे बनून नाष्टा देऊ शकतो.  सकाळी भूक लागल्यावर किंवा आपल्याला पोहे खावेसे वाटले तेव्हा आपण सहज आणि सोप्या पद्धतीने हॉटेल सारखे स्वादिष्ट आणि चमचमीत पोहे घरी बनवू शकतो.  तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, पोहा रेसिपी.  अगदी काही मिनिटांमध्ये आपण पोहे बनवू शकतो.  आपण आता पोहा रेसिपी पाहणार आहोत.

  poha recipe

पोहा रेसिपी मराठी poha recipe in marathi

पोहेच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

पोहे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते.  पोहेसाठी लागणार मसाला, भाजीपाला व पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे लागतात, यासाठी आपल्याला 15 मिनिट लागतात.

कुकिंग टाईम :

पोहे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 10 मिनिट लागतात.

टोटल टाईम :

पोहे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते.  म्हणजे नंतर आपण सहज पद्धतीने पोहे बनवू शकतो.  पूर्वतयारीसाठी 15 मिनिट आणि कुकिंग करिता 10 मिनिट अशा पूर्ण 25 मिनिट मध्ये आपले पोहे तयार होतात.

वाढीव :

पोहे नाष्टा म्हणून वापरल्या जातात.  आपण आज 10 व्यक्तिकरिता पोहे बनवणार आहोत.

पोहेचे प्रकार :

भारतात पोहे हे नाष्टा म्हणून सकाळी वापरले जातात.  पोहे सर्वाना आवडणारे खाद्य आहे.  पोहे बनवण्याची विधी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असू शकते.  यामध्ये कांदा पोहे, आलू पोहे, मसला पोहे असे अनेक प्रकार आपल्याला खायला मिळतात.  पोहे फ्राय करून त्यापासून चिवडा बनवला जातो, हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे.

पोहेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 पाव पोहे / दगडी किंवा जाड पोहे.

2) 1 चम्मच हळद.

3) 1 चम्मच जिरे व मोहरी.

4) 100 ग्रॅम तेल.

5) 3 ते 4 कांदे मध्यम.

6) कोथिंबीर.

7) एक चिमूट साखर.

8) 1 वाटी शेंगदाणे.

9) 4 ते 5 हिरवी मिरची.

10) चवीनुसार मीठ.

11) 1 लिंबू.

12) थोडा कळीपत्ता.

पाककृती :

  • पोहे तयार करण्यासाठी पहिले कांदा, कोथिंबीर आणि मिरची बारीक कापून घ्यावे.
  • नंतर पोहे स्वच्छ धुऊन घ्यावे, पोहे नरम हिये पर्यत स्वच्छ धुवा, नंतर एका प्लेट मध्ये काढून घ्या.
  • पोहे एकदम मोकळे झाले पाहिजे यासाठी थोडे  मोकडे करा.  आता पोह्यात आवश्यक तेवढे मीठ आणि हळद टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
  • नंतर एक खोल तळाची कढई किंवा पॅन घ्या, आणि गॅस चालू करून त्यावर ठेवा.
  • गॅस मध्यम आसेवरती ठेवा.  त्यामध्ये तेल टाका, आणि गरम होऊ द्या.  तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पहिले शेंगदाणे भाजून घ्यावे.
  • पोहे करताना शेंगदाणे बरोबर होत नाहीत.  म्हणून पाहिले शेंगदाणे तळून घ्यावे, तळन झाले की नंतरच्या कामासाठी बाजूला ठेऊन द्या.
  • आता प्रथन तेलात मोहरी टाका, मोहरी तळ तळने बंद झाली की थोडे जिरे टाका, आणि परतवत रहा.
  • जिरे झाले की त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाका, आणि कांदा पारदर्शी होय पर्यत 2 मिनिट परतवत रहा.
  • कांदा झाल्यावर त्यामध्ये कडीपत्ता आणि बारीक हिरवी मिरची टाका, आणि 1 मिनिट परतवत राहा.
  • नंतर भाजलेले शेंगदाणे आणि पोहे टाका, आणि यांचे पूर्ण मिश्रण करून घ्या.  व्यवस्थित मिश्रण झाले की नाही तपासून द्या.
  • नंतर 2 मिनिट झाकण बंद करून वाफेवरती पोहे होऊ द्या.  नंतर गॅस बंद करा आणि पोहे आणखी 2 मिनिट तसेच राहू द्या.
  • नंतर त्यावर बारीक कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका.  आपले गरम गरम स्वादिष्ट पोहे तयार आहेत.  आपण मिरची आणि लिंबू तसेच मिसळचा रसा घेऊन खाऊ शकतो.

पोहेमध्ये असणारे घटक :

पोहे हे भातपासून तयार केलेला पदार्थ आहे.  जो भारतात सकाळी नस्तासाठी वापरला जातो.  यामध्ये विविध घटक आहेत, पोहेसाठी आपण कांदा, लिंबू तसेच शेंगदाणे कळीपत्ता अशा पौष्टिक आहार वापरला करतो.  यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, फॅट, शुगर यासारखे घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.

फायदे :

सकाळी आपल्याला भूक लागली तर आपण नाष्टा म्हणून पोहे खाऊ शकतो, हा सर्वात मोठा फायदा आहे.

पोहे तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, शुगर, लोह, फॉस्फोरस, झिंग असे अनेक प्रकारचे घटक आहेत.

हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.  यामुळे आपले शरीर तदुरुस्त राहते.

तोटे :

पोहे खाल्ल्या पासून जास्त प्रमाणत तोटे नाहीत, कारण हे एक हलके अन्न आहे.

यामध्ये वापरल्या जाणारे शेंगदाणे तळलेले असतात.  हे आपण जास्त खाल्ले तर आपल्याला मळ मळ होऊ शकते.

आणि पोहे जास्त प्रमाणात सेवन केले, तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.  म्हणून आपण आवश्यक तेवढे खाल्ले पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला पोहे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment