प्रिमिक्स केक मराठी Premix Cake Recipe In Marathi

प्रिमिक्स केक मराठी Premix Cake Recipe In Marathi प्रीमिक्स केक हा वेग-वेगळे साहित्य एकत्र करून बनवला जातो. हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि गोड केक आहे, हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. आपण वाढदिवस किंवा सेलिब्रेशन असले की या केकचा उपयोग करतो. विविध ठिकाणी प्रीमिक्स केक हा वेग-वेगळे फ्लेवर टाकून चवीला वेग-वेगळा बनवला जातो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट केक खायाला मिळतो.

याच केक पासून लहान-लहान पेस्ती सुध्दा बनवली जाते. काही लोकांना प्रीमिक्स केक खूप आवडतो, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट केक मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट प्रीमिक्स केक कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण प्रीमिक्स केकची रेसिपी पाहणार आहोत.

Premix Cake Recipe

प्रिमिक्स केक मराठी Premix Cake Recipe In Marathi

प्रीमिक्स केकचे प्रकार :

प्रीमिक्स केक एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहे. याचे विविध प्रकार पडतात, जसे चॉकलेटी प्रीमिक्स केक, स्टोबेरी प्रीमिक्स केक, व्हेनीला प्रीमिक्स केक, मँगो प्रीमिक्स केक हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
प्रीमिक्स केक ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

प्रिमीक्स केकच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

प्रिमीक्स केक बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर आपण लवकर केक बनवू शकतो. यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

प्रिमीक्स केक कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

प्रिमीक्स केक बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावा लागतो. यासाठी आपल्याला टोटल टाईम 50 मिनिट वेळ लागतो.

प्रिमीक्स केकसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 250 ग्रॅम मैदा.
2) 200 ग्रॅम बारीक साखर.
3) 150 ग्रॅम दूध पावडर.
4) 100 ग्रॅम कॉनफ्लॉवर पावडर.
5) 2 चमचे बेकिंग सोडा.
6) 2 चमचे बेकिंग पावडर.
7) 1 कप प्रीमिक्स पावडर.
8) 4 ते 5 चमचे व्हॅनिला पावडर.
9) 1 कप तेल.

पाककृती :

  • दुधी भोपळ्याचे घारगे मराठी
  • सर्वात प्रथम एका खोल भांड्यात मैदा घेऊन पिठीसाखर, मिल्क पावडर, कॉर्न फ्लोअर घेऊन चांगली मिक्स करा.
  • नंतर यामध्ये व्हॅनिला पावडर, सोडा आणि यामध्ये पाणी आणि थोडे तेल टाकून मिश्रण तयार करा.
  • मिश्रण मध्यम पातळ तयार करा, जास्त घट्ट नको. नाहीतर आपला केक बरोबर तयार होणार नाही.
  • पूर्ण मिश्रण एकजीव झाले पाहिजे, नंतर एक बेकिंग ट्रे घ्या.
  • ट्रेला आतून थोडे तेल लावा. नंतर त्यामध्ये पातळ केकचे पूर्ण मिश्रण टाका आणि चांगले टॅप करा.
  • नंतर गॅस चालू करून, गॅसवरती एक मोठे प्रीहिटेड कुकर ठेवा, आणि त्याच्या मधात एक स्टँड ठेवा.
  • कुकर चांगले गरम झाले की, त्यामध्ये बेकिंग ट्रे ठेवा, आणि व्यवस्थित हवाबंद झाकण लावा.
  • गॅसवरती मध्यम आसेवर 25 ते 30 मिनिट केक होऊ द्या. नंतर गॅस बंद करा, आणि आणखी 10 मिनिट तसाच कुकरमध्ये राहू द्या.
  • नंतर कुकर उघडा आणि चाकूने तपासा की, केक स्वच्छ बाहेर आला तर केक चांगला भाजला समजावे.
  • केक बाहेर काढा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर आपण यावर थोडी चेरी, आणि रंगीन क्रीम टाकून सजवू शकतो.
  • आता आपला स्वादिष्ट आणि व्हॅनिला प्रीमिक्स केक खाण्यासाठी तयार आहे. आपण प्लेटमध्ये घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

प्रीमिक्स केकमध्ये असणारे घटक :

प्रीमिक्स केक बनवण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लागते, यामध्ये विविध घटक असतात. जसे फॅट, चरबी, शुगर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

प्रीमिक्स केकमध्ये असणारे घटक कॅल्शियम, व्हिटॅमिन, फॉस्फरस आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवतात.

तसेच यामध्ये असणारे चरबी, फॅट, शुगर आपल्या शरीरावर फॅटचे प्रमाण वाढवतात.

यातील सर्व घटक आपल्या खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

प्रिमिक्स केक आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक, चरबी, शुगर, फॅट आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून प्रीमिक्स केक आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला प्रीमिक्स केक रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment