PSI Information In Marathi बरेच तरुण, तरुणी उमेदवार पोलीस भरती मारतात. त्याविषयी माहिती जाणून घेणे आवश्यक असते. बरेच विद्यार्थी क्लासेस सुद्धा अटेंड करतात. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी पोलीस प्रशासन काम करते. हे तर आपल्याला माहितीच आहे. या प्रशासनामध्ये काम करणारी अनेक अधिकारी व कर्मचारी असे पदे असतात जे भरले जातात. त्यामधील एक महत्त्वाचे पद म्हणजे पीएसआय हे आहे.
पीएसआयची संपूर्ण माहिती PSI Information In Marathi
पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर (police sub inspector) असे आहे. पीएसआय हे पोलीस हवालदार पदाच्या वरचे पद आहे तसेच हे पद महत्त्वाचे असून भारतात देशाव्यतिरिक्त आणखीन आठ पीएसआय हे पदे आहेत पोलीस उपनिरीक्षक अधिकाराच्या वर्दीवर दोन स्टार चिन्ह असतात.
पोलीस दलातील अधिकारी जे भारतीय दंड संहिता आणि भारतीय संविधानाच्या आधारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापी करतात त्यांना पोलीस उपनिरीक्षक असे म्हटले जाते.
PSI म्हणजे काय ?
पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर असे आहे. पीएसआय हे पोलीस हवालदार पदाच्या वरचे पद आहे तसेच हे पद महत्त्वाचे असून भारतात देशाव्यतिरिक्त आणखीन आठ पीएसआय हे पदे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अधिकाराच्या वर्दीवर दोन स्टार चिन्ह असतात.
पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस अधिकारी रँक मधील सुरुवातीचे पद आहे. त्यानंतर पुढे रँक वाढत जातात. पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामधील पीएस हे पद मुख्यता समन्वय साधण्यासाठी महत्त्वाचे आहे. या पदाला पोलीस खात्यामध्ये एक महत्त्वाचा कणा मानला जातो.
पीएसआय यांची कार्य :
पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या तक्रारी, गुन्हे दाखल करणे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करणे, समाज घटकांवर लक्ष ठेवणे, बेकायदेशीर उद्योगधंद्यावर रेड मारणे तसेच काही समाज विघाटक घटना घडत असतील तर तात्काळ वरिष्ठांना कळविणे यांचे काम असते. घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळणे आणि वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करणे.
व्हीआयपी मंत्री विविध प्रकारचे मोर्चे यात्रा, जत्रा आणि सणाच्या निमित्ताने बंदोबस्त यांना करावा लागतो.
गुन्हेगारांवर सुद्धा लक्ष ठेवणे त्यांच्या हालचालींची माहिती मिळवणे सर्वच गोष्टीचा गुन्ह्याचा तपास करणे इत्यादी कार्य त्यांना असतात. आरोपींना कायदेशीर अटक करून कोर्टात हजर करणे, खटले वेळेवर निकाली काढणे अशी कामे सुद्धा पोलीस उपनिरीक्षकाची असतात.
पीएसआय ची तयारी कशी करावी :
तुम्हाला जर पीएसआयमध्ये भरती मारायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी खूप परिश्रम करावे लागतील. त्याची तयारी कशी करायची आपल्याला सर्व माहिती समजून घेणे आवश्यक असते. सर्वप्रथम तुम्हाला राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र यांचा अभ्यास करावा लागेल.
भारतीय जनरल नॉलेज मध्ये सुद्धा तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याचे नोट्स काढून घ्यावे लागतील. मागील वर्षाच्या परीक्षेच्या पेपरांचा तुम्हाला सराव करावा लागेल. बातम्या आणि इतर अभ्यास पूर्ण माहितीचा आढावा घ्यावा लागेल. शाब्दिक गैर मौखिक आणि तर्क कौशल्यावर पुस्तके वापरून ज्या तारखे अनुक्रम आणि इतर प्रकारच्या विचारसरणीवरील प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
पीएसआय अधिकारी कसे व्हाल :
पीएसआय होण्यासाठी तुम्हाला किमान बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतात एस आय होण्यासाठी दहावी आणि बारावी ही परीक्षा पास होणे प्राथमिक गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे बॅचलर पदवी असायला पाहिजे. राज्य किंवा फेडरल नोकरदार संस्थाद्वारे पोस्ट केलेल्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
पीएसआयच्या पात्रता :
उपनिरीक्षक होण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता त्यांच्या अटी पूर्ण कराव्या लागतात तसेच जास्तीचे व्यवस्थापन ही कर्मचारी निवड आयोगाकडे असते. कोणत्याही विषयांमध्ये तुम्हाला 50 टक्के जीपीए सह प्रतिष्ठित विद्यापीठात किंवा संस्थेतून तुम्ही पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
उमेदवाराच्या छातीचे मोजमाप 80 ते 85 सेंटीमीटर असले पाहिजे. त्यांची उंची 170 सेंटीमीटर असायला पाहिजे. दिल्ली पोलीस पदांसाठी उमेदवाराकडे पीईटी चाचणी सध्याचा मोटरसायकल किंवा कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. परवाना सादर न केल्यास उमेदवार ठरत नाही.
पीएसआय नोकरी वयोमर्यादा :
परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या वयाची अट ही अर्जाच्या अंतिम मुद्दतीनुसार 18 वर्ष असणे आवश्यक असते तसेच जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 25 वर्ष असणे गरजेचे असते काही उमेदवारांना उच्च वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे.
पीएसआय याविषयी नोकरी :
उपनिरीक्षकाला SI एसआय असे म्हटले जाते. हे भारतीय पोलीस सेवेतील एक उच्च रंग आहे पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक हे असायच्या अधिनस्त असतात. जे अनेकदा पोलीस स्टेशनचे निरीक्षण करतात. दोन स्टार आणि खांद्याच्या पट्ट्याच्या बाहेरील निळ्या आणि लाल पट्टीदार रिबन एसआयच्या रँकचे चिन्ह म्हणून काम करतात.
पीएसआय परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम :
पीएसआय पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असते. तर मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असते. मुख्य परीक्षेमध्ये पेपर वन व पेपर टू असे वेगवेगळे दोन पेपर घेतले जातात. संयुक्त पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असते.
संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.
चालू घडामोडी यामध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींविषयी माहिती. नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन, इतिहास, आधुनिक भारताचा विशेषता म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये विचारला जातो. त्यानंतर भूगोल भूगोलाच्या विशेष प्रकरणांचा अभ्यास. त्यामध्ये पृथ्वी जगातील विभाग हवामान अंश व रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगार मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था त्यामध्ये अर्थसंकल्प लेखा परीक्षण व लेखा. सामान्य विज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्य शास्त्र.
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी विचारलेले असते.
पीएसआय बनण्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षा खालील प्रमाणे घेतली जाते. त्यामध्ये 400 गुणांचा पेपर असून दोन मुख्य पेपर घेतले जातात. त्यामध्ये संयुक्त पेपर 200 गुणांचा आणि दुसरा स्वतंत्र पेपर 200 गुणांचा असतो. या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठीचे आवश्यक ज्ञान समाविष्ट प्रश्न असतात.
पेपर टू म्हणजे स्वतंत्र पेपर हा 200 गुणांचा असतो. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदाऱ्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता1973, फौजदारी प्रक्रिया संहिता1872, भारतीय पुरावा अधिनियम 1872.
FAQ
पीएसआय फुल फॉर्म काय आहे?
पोलीस सब इन्स्पेक्टर.
पीएसआय होण्यासाठी तुमचे शिक्षण किती झाले असले पाहिजे ?
पीएसआय होण्यासाठी तुमचे शिक्षण बॅचलर डिग्री पूर्ण पाहिजे.
पी एस आय यांचे वेतन किती असते?
पीएसआय यांचे वेतन सातव्या आयोगानुसार 38,600 ते 1,22,800 पर्यंत असते.
पी एस आय यांची कार्य कोणते असतात?
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपासणी समान बजवणे, अधिपत्र व इतर आदेश तत्परतेने पाळणे, दखलपात्र,अपराधन संबंधी माहिती मिळवणे व क्षमतेनुसार ते रोखणे इत्यादी कार्य असतात.
पोलीस उपनिरीक्षक हे पद कसे आहे?
पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस दलातील असे एक पद आहे, जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावरचे पद असते.