पु. ल. देशपांडे यांची संपूर्ण माहिती Pu. L. Deshpande Information In Marathi

Pu. L. Deshpande Information In Marathi पु. ल. देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. तसेच महाराष्ट्राचे लाडके असलेले असे एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे आहे. ते एक शिक्षक अभिनेते, पटलेखक, कथा लेखक, संगीतकार, कवी, गायक, नाटककार आणि वक्ते होते. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी शाळेमध्ये हा भावासहित खणखणीत आवाजामध्ये त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले आणि त्यांनी पाठांतर केलेले भाषण सांगितले होते.

Pu. L. Deshpande Information In Marathi

पु. ल. देशपांडे यांची संपूर्ण माहिती Pu. L. Deshpande Information In Marathi

सात वर्ष असे हे भाषण ऐकल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे यांनी स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला सुरुवात केली आणि ते इतरांनाही भाषणे व संवाद लिहून देऊ लागले. त्यांच्या कविता साधेपणाने प्रामाणिकपणे आणि एखाद्या आत्म्याच्या खोलवर परिणाम करणारे आहेत. त्यांचे काव्यसंग्रह मार्मिक आणि स्मरणीय कवितांचा समृद्ध असा संग्रह त्यामध्ये समाविष्ट आहे.

पु ल देशपांडे यांचा जन्म व बालपण :

पु. ल. देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात एका ब्राह्मण कुटुंबामध्ये 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला होता. त्यांचे आजोबा हे वामन मंगेश दुभाषी एक कवी व साहित्याचे प्रख्यात असे जाणकार होते. त्यांचे बालपण हे जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनी मध्ये गेले.

त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी शाळेमध्ये हा भावासहित खणखणीत आवाजामध्ये त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले आणि त्यांनी पाठांतर केलेले भाषण सांगितले होते. सात वर्ष असे हे भाषण ऐकल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे यांनी स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला सुरुवात केली आणि ते इतरांनाही भाषणे व संवाद लिहून देऊ लागले.

बालपणापासूनच त्यांच्या घरामध्ये त्यांच्या समरूप असे वातावरण होते. त्यांना लहानपणापासूनच घरामध्ये रेडियो एकाला मिळत असेल तसेच त्यांच्या घरी संगीताच्या बैठकी सुद्धा होत होत्या. यामुळे संगीताची आवड त्यांना निर्माण झाली. त्यांना घरीच बाज्यांची पेटी सुद्धा वाजवायला येत होती.

त्यांनी शाळेमध्ये असतानाच भावगीते गायले व अनेक कवितांच्या चाली सुद्धा लावल्यात. ते कॉलेजमध्ये असतानाच ते हार्मोनियम वाजवत होते. तेव्हा त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवरकर सारंग वाजवत असत. त्याचे त्यांना पंधरा रुपये मिळत होते आणि ते ठिकाण मध्ये वाटून घेत होते.

पु ल देशपांडे यांचे शिक्षण :

देशपांडे यांनी प्राथमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालयामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील इस्माईल कॉलेजमधून इंटरव्यू सरकारी लोक कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कलेक्टर कचेरी व प्राप्तिकर विभागात काही काळ नोकरी सुद्धा केली होती. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून होते आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक सुद्धा होते.

पुण्याला आल्यावर त्यांनी फरगुशन कॉलेजमधून बीए आणि नंतर एमए पूर्ण केले. फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये असताना पु. ल. देशपांडे यांनी नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली होती. 1937 पासून नभोवाणीवर पु. ल. देशपांडे यांच्या छोट्या मोठ्या नाटकांमध्ये भाग घेऊ लागले होते.

पु ल देशपांडे यांचे वैयक्तिक जीवन :

पु. ल. देशपांडे यांचे पहिले लग्न सुंदर दिवडकर यांच्याशी झाले होते. परंतु त्यांचा लग्नानंतर काही दिवसातच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी 1946 मध्ये त्यांचीच मैत्रीण सुनीता ठाकूर यांच्याशी विवाह केला आणि सुनीता ह्या सुद्धा एक मराठी लेखिका व अभिनेत्री होत्या. यांना कोणतेही अपत्य नव्हती.

देशपांडे हे भोजनामध्ये खूप खाण्याचे शौकीन आहेत कारण त्यांच्या घरी घरी विभिन्न प्रकारचे पकवान होत होते. त्यांची आई-वडील कोल्हापूरचे व बहीण कोकणात दिलेली त्यामुळे त्यांच्या घरात सुद्धा जेवणात विविधता आढळत होती, वेगवेगळे तयार होत होते.

पु. ल. देशपांडे यांचे कार्य :

देशपांडे यांचे आजोबा साहित्यिक असल्यामुळे त्यांच्यावर बालपणापासूनच साहित्य प्रेमाचे व विनोद बुद्धीचे संस्कार झाले होते. पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक दत्तोपंत राजू उपाध्याय यांच्या सहवासातून नाटक आणि संगीत या क्षेत्राकडे त्यांची वाटचाल सुरू झाली.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ललित कुंत व नाट्यनिकेतन या नाट्य संस्थांमध्ये काम करत असताना चिंतामण कोल्हटकर यांच्याकडून त्यांना खूप धडे मिळाले होते. सुरुवातीच्या काळामध्ये पु. ल. देशपांडे यांनी शिक्षक म्हणून कार्य केले तसेच त्यांनी मराठी साहित्य आणि संगीतामध्ये मौल्यवान असे योगदान दिलेले आहे. याव्यतिरिक्त त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य, चित्रपट इत्यादी क्षेत्रात सुद्धा लक्षणीय कार्य केले आहे.

देशपांडे यांची चित्रपट सृष्टीतील कार्य :

1947 मध्ये पु. ल. देशपांडे यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांची मुख्य भूमिका बजावली आणि अनेक संगीत दिग्दर्शन तसेच कथा, पटकथा, संवाद देण्याचे त्यांनी काम केले. गुळाचा गणपती या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातून त्यांच्या अंगी असलेल्या अष्टपैलूंचे आपल्याला मूळ स्वरूप समजते.

चित्रपटात कथा, पटकथा, दिग्दर्शन, काव्यसंगीत अशा सर्वच मुख्य भूमिका त्यांनी पार पाळले आहेत. दूधभात यामध्ये सुद्धा त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. वंदे मातरममध्ये त्यांची पत्नी त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर त्यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला. त्यातील नाच रे मोरा हे गाणे तर खूप प्रसिद्ध झाले.

पु ल देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान :

  • पु. ल. देशपांडे यांना 1993 मध्ये पुण्यभूषण.
  • 1990 मध्ये पद्मभूषण.
  • 1966 मध्ये पद्मश्री.
  • 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
  • 1965 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार.
  • 1967 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 1979 मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप 1988 मध्ये कालिदास सन्मान मिळाला.

सार्वजनिक क्षेत्रात विस्मरणीय कामगिरी केल्याबद्दल भारतीय टपाल खात्याने पु. ल. देशपांडे यांच्या नावाचा स्टॅम्प सुद्धा काढला होता.

पु. ल. देशपांडे यांचे साहित्य :

पु. ल. देशपांडे यांचे विविध नाटके, प्रवासवर्णने, कविता, लेख खूप प्रसिद्ध झाले त्यांच्या कविता वाचकांच्या मनात सतत गुंजत राहतात. त्यांच्या कविता साधेपणाने प्रामाणिकपणे आणि एखाद्या आत्म्याच्या खोलवर परिणाम करणारे आहेत. त्यांचे काव्यसंग्रह मार्मिक आणि स्मरणीय कवितांचा समृद्ध असा संग्रह त्यामध्ये समाविष्ट आहे.

अगड पघळ, अपूर्वाई, असा मी असामी, आपुलकी पूर्ण एक शून्य मी, एका कोळीयाने, कान्होजी आंग्रे, काय वाटेल ते होईल , खोगीरभरती, गणगोत, गुण गाईन, आवडी चार शब्द, देशा नसती उठव, भाग्यवान, भावगंध, व्यंगचित्रे, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक इ. देशपांडे यांचे मराठी साहित्यातील योगदान अतिशय मौल्यवान आहे.

पु ल देशपांडे यांचे निधन :

पु ल देशपांडे यांचे निधन वयाच्या 81 व्या वर्षी म्हणजेच 12 जून 2000 रोजी झाले. त्यांचे निधन हे पुण्यातील प्रयाग इस्पितळामध्ये झाले.

FAQ

पु ल देशपांडे यांचे टोपण नाव काय होते?

पु. ल. भाई.

पु ल देशपांडे यांचा जन्म कधी झाला?

8 नोव्हेंबर 1919 रोजी.

पु. ल. देशपांडे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते?

सुनीता ठाकूर.

पु. ल. देशपांडे यांचे निधन कधी झाले?

पु. ल. देशपांडे यांचे निधन 12 जून 2000 रोजी झाले.

पु. ल. देशपांडे यांचे पूर्ण नाव काय आहे?

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

Leave a Comment