पुदिना चटणी मराठी Pudina Chutney recipe in Marathi

पुदिना चटणी मराठी Pudina Chutney recipe in Marathi पुदिना हा औषधी गुणधर्म असलेली खूप जुनी अशी आयुर्वेदिक औषधी आहे.  ज्याचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये देखील करू शकतो.  पुदिना आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य देखील करतो.  त्यामुळे पुदिना आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे.  पुदिण्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्ती देखील वाढवण्यास मदत करतात.  पुदिन्याचे नियमित सेवन करणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असतात.  पुदिना हा आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे.  त्यामुळे आपण आज पुदिन्याची हेल्दी चटपटीत चटणी किंवा ठेचा पाहणार आहोत.  तुम्ही तुमच्या घरी झटपट ही रेसिपी बनवू शकता.  व आरामात तीन ते चार दिवस पुदिना चटणी खाऊ शकता.

 Pudina Chutney

पुदिना चटणी मराठी Pudina Chutney recipe in Marathi

रेसिपी प्रकार   :

पुदिना चटणी ही एक भारतीय पाककृती असून ती भाकरी, पराठा, पोळी यांच्यासोबत खाल्ली जाते.

पुदिनाच्या चटणीचे अनेक प्रकार आपल्याला आढळून येतात.  टोमॅटो पुदिना चटणी, हिरवी मिरची पुदिना चटणी, तूर डाळीची पुदिना, चटणी हरभरा डाळीची पुदिना चटणी, खट्टी मिट्टी पुदिना चटणी इ. पुदिना हे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असे असून त्याचा उपयोग आपण दैनंदिन भोजनामध्ये केला पाहिजे.  तर आज आपण पुदिना चटणी  ही रेसिपी जाणून घेणार आहोत.

ही रेसिपी किती जणांसाठी आहे?

ही रेसिपी 4 लोकांसाठी बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

लागणारा वेळ 5 मिनिट एवढा आहे.

कुकिंग टाईम  :

कुकिंग टाईम 5 मिनिटे.

टोटल टाईम  :

टोटल टाईम 10 मिनिटे

पुदिन्याचा चटपटीत हिरवा ठेचा/ चटणी तयार करण्याकरता  लागणारे साहित्य  :

1) पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या

2)  पंधरा-वीस लसणाच्या पाकळ्या

3)  कोथिंबीर

4)  लिंबू

5) मीठ चवीनुसार

6)  तीन चमचे तेल

7) पाव चमचा मोहरी

8)  पाव चमचा जिरे

9) एक चमचा गूळ

10) चिमूटभर हिंग

11) पुदिन्याची पंधरा-वीस पाने

पुदिना चटणी बनवण्याची पाककृती  :

  • सर्वप्रथम आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी लागतील.
  • या चटणीमध्ये आपण जेवढा पुदिना घालणार आहोत तेवढीच कोथिंबीर घ्यावी लागेल.
  • तव्यावर सुरुवातीला तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत.  ह्या मिरच्या चांगल्या पाच मिनिटे भाजून घ्या.
  • पुदिना कोथिंबीर परतलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, लसूणच्या पाकळ्या आणि एक चमचा गूळ टाकून हे सर्व मिश्रण चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  • हे वाटण एका वाटीत काढून घ्या व त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्या.  नंतर एका वाटीमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग टाकून खमंग अशी त्याला फोडणी द्या.  पुदिनाची चमचमीत चटणी तयार आहे.

पुदिना चटणीची आणखीन दुसरी रेसिपी पाहूया.

तूर डाळ व साखर घालून करता येणारी पुदिना चटणी  :

सामग्री  :

1)  सात-आठ हिरव्या मिरच्या

2) पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या

3) एक आल्याचा तुकडा

4) चवीपुरते मीठ

5) चवीपुरती साखर

6)  दोन वाट्या किसलेले खोबरे

7) कोथिंबीर

8) दोन चमचे लिंबाचा रस

9) एक चमचा तुरीची डाळ

10) दोन चमचे जिरे

पुदिना चटणी करण्याची पाककृती  :

  • सर्वप्रथम पुदिन्याची पाने व कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्यावे.
  • नंतर पुदिन्याची पाने, कोथिंबीर, डाळ, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, लिंबाचा रस, जिरे आणि थंड पाणी तसेच किसलेले ओले खोबरे सर्व मिक्सरच्या एका भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या.
  • हे सर्व मिश्रण एकदम बारीक होणार नाही, त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने फिरवून घेऊन पुन्हा एकदा बारीक करून घ्या.
  • हे वाटण पूर्ण बारीक झाल्यावर आपली पुदिन्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही पोळी पराठा वरण-भात इडली याच्यासोबत खाऊ शकता.
  • खायला चविष्ट व सुवासिक अशी चटणी लागते.
  • तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून पहा व ती कशी झाली ते आम्हाला कमेंट पण नक्की सांगा.

पोषक घटक  :

पुदिण्यामध्ये मेंथॉल, तांब, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन ए, लोह व रायबोफ्लेविन इत्यादी घटक असतात.  जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात.

पुदिना खाण्याचे फायदे :

पुदिन्यात भरपूर प्रमाणात असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.

पुदिन्यातील मॅग्नेशियम आपल्या हाडांना मजबूत बनवते व पुदिना खाल्ल्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो.

तसेच हिरड्या मजबूत करणे व तोंडाची दुर्गंधी घालविणे यासाठी पुदिना फारच उपयुक्त आहे.

पोट दुखीचा त्रास झाला असता आपण पुदिना खाल्ला तर त्रास कमी होऊ शकतो.

पुदिना नियमित खाल्ला तर सर्दी, खोकला, वात यासारखे आजार दूर पडतात.

तोटे   :

पुदिनाचा अति वापर केल्यामुळे आपल्या रक्तामध्ये व शरीरामध्ये हानी पोहोचू शकते.

गर्भवती स्त्रियांनी व स्तनपान करणाऱ्या मातांनी पुदिन्याची सेवन करणे टाळावे.

तर मित्रांनो, पुदिना चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.

Leave a Comment