पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Pune Information In Marathi

Pune Information In Marathi  नमस्कार मित्रांनो ,विद्येचे माहेरघर असे संबोधले जाते अशा पुणे जिल्ह्याची आपण आज माहिती पाहणार आहोत.सुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक पुणे!

Pune Information In Marathi

पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Pune Information In Marathi

मुळा मुठा नदीच्या किना.यावर वसलेले पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुस.या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ”पुणे तिथे काय उणे ” प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

पुणे शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून पुण्यास “पूर्वेचे ऑक्सफर्ड” असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व डिग्री घेणेसाठी प्रवेश घेत असतात .त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात .

बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .

नावाची उत्पत्ती

पुणे हे नाव पुण्यनगरी या नावावरून पडले असे मानले जाते. हे शहर आहे आठव्या शतकात ते ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) या नावाने ओळखले जात असे, असा संदर्भ सापडतो.

11व्या शतकात हे शहर ‘पुणे’ किंवा ‘पुनवडी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या काळात या शहराचे नाव ‘पुणे’ म्हणून वापरले जाऊ लागले. इंग्रज त्यांना ‘पूना’ म्हणून संबोधू लागले. आता ते पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते .

पुणे जिल्ह्याचा इतिहास

साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो. या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुन्नाटा, पुनवडी, पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मांडला जातो.

अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून सांगणाऱ्या संत तुकारामांची पुणे जिल्हा हीच जन्मभूमी व कर्मभूमी होती.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची निर्मिती केली. हौद, वाडे, मंदिरे, रस्ते इत्यादींचा विकास केला.

सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला व पुढील काळात १८१८ मध्ये शनिवार वाड्यामध्ये इंग्लंडचा युनियन जॅक फडकविला गेला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याच्या शनिवारवाडा.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची निर्मिती केली. हौद, वाडे, मंदिरे, रस्ते इत्यादींचा विकास केला.

सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला व पुढील काळात १८१८ मध्ये शनिवार वाड्यामध्ये इंग्लंडचा युनियन जॅक फडकविला गेला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याच्या शनिवारवाड्यावरील युनियन जॅक काढून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

पुणे जिल्ह्याचा भूगोल

पुणे जिल्ह्याच्या सीमेस उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेय सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा व वायव्येला ठाणे जिल्हा आहे.म्हणजेच पुणे जिल्ह्यास अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे या पाच जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत.

जिल्ह्याचा पश्चिम भाग सह्याद्री पर्वताचा आहे. जिल्ह्याच्या या भागात शिंगी, तसुबाई, मांडवी, ताम्हीणी, अंबाला इत्यादी डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे. जिल्ह्यात माळशेज, बोर, ताम्हीणी, वरंधा, कात्रज, दिवे इत्यादी प्रमुख घाट आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर, तसुबाई, शिंगी इत्यादी शिखरे आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुरंदर टेकड्या आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्वभाग पठारी प्रदेशाचा आहे.

पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे.

पुणे जिल्ह्याचा आकार सामान्यतः त्रिकोणाकृती असून पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत हा त्याचा पाया, तर आग्नेय कोपऱ्यातील भीमा व नीरा या नद्यांच्या संगमाजवळ याचा शिरोबिंदू येतो. जिल्ह्याचे भूरूपानुसार तीन विभाग पडतात :

  1. पश्चिमेकडील १५ ते ३० किमी. रुंदीचा डोंगराळ भाग. यास ‘घाटमाथा’ असे म्हणतात. या भागात सह्याद्रीचे ओकेबोके डोंगर आणि अधूनमधून जंगले आढळतात.
  2. घाटमाथ्याच्या पूर्वेकडील १५ ते ३० किमी. रुंदीच्या या विभागास ‘मावळ’ म्हणतात. यात लहानलहान डोंगर व त्यांमधून नद्यांचे सखल प्रदेश आढळतात. घाटमाथ्यापेक्षा हा प्रदेश कमी ओबडधोबड आहे.
  3. तिसऱ्या भागात जिल्ह्यातील पूर्वेकडील व आग्नेयीकडील सपाट पठारी प्रदेश अंतर्भूत होतो. याला ‘देश’ असे म्हणतात.

पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो. इतर नद्या पुढीलप्रमाणे – इंद्रायणी नदी, कऱ्हा, कुकडी नदी, घोड नदी, नीरा, पवना नदी, मांडवी,  मीना, भामा, मुठा नदी, मुळा नदी.

भाषा

मराठी ही पुण्याची मुख्य भाषा असली तरी तिथली कॉस्मोपॉलिटन लोकसंख्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती यांसारख्या इतर अनेक भाषा बोलते.

पुणे जिह्यातील धरणे

खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर,पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.

पुणे जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही, की ज्यातून लहान-मोठी नदी वाहत नाही. बहुतेक सर्व नद्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतात उगम पावून पूर्व किंवा आग्नेय दिशेने वाहतात. भीमा, मीना, कुकडी, वेल, घोड, पुष्पावती, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.

भीमा ही जिल्ह्यातील मुख्य नदी भीमाशंकर येथे उगम पावून आग्नेय दिशेने वाहते. प्रथम काही अंतर जिल्ह्याच्या मध्यमागातून व पुढे जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दिवरून वाहत गेल्यावर आग्नेय कोपऱ्यात नीर नदीसह सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते.

हिच्या वेल व घोड या डाव्या तीरावरील, तर भीमा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. घोड, मीना, कुकडी, पुष्पावती या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागाचे जलवहन करतात.

मध्यभाग भीमा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापला आहे तर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून नीरा नदी वाहते. जिल्ह्याच्या मुख्यतः पश्चिम भागात नद्यांवर धरणे बांधली असून, त्यांपासून जलसिंचन व काही प्रमाणात विद्युत्‌निर्मिती केली जाते.

पुणे जिल्ह्याची राजकीय रचना

पुणे जिल्ह्यातील तालुके

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालुके आहेत. यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, पुणे शहर यांचा समावेश होतो.

पुणे जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात मोडतो. पुणे प्रशासकीय विभागमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत.

पुणे जिल्ह्याचे हवामान

पश्चिम महाराष्ट्रातील मोसमी हवामान या जिल्ह्यातही आढळते. मे महिन्यात कमाल तापमान 410 सेल्सिअस पर्यंत वाढते आणि जानेवारीत किमान 5.60 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.

उन्हाळ्यात वारे मुख्यतः वायव्य आणि पश्चिम देशांकडून भारतात व पावसाळ्यात ते नैऋत्य किंवा पश्चिमेकडून तर हिवाळ्यात सामान्यतः ईशान्य किंवा पूर्वेकडून वाहतात दक्षिणेकडून येणारे वारे आढळत नाहीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर अखेर पडणाऱ्या पावसाची सरासरी जास्त असते सह्याद्री मुळे घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो त्याच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशात मात्र पावसाचे प्रमाण कमी होत जाते

पुणे जिल्ह्यातील हवामान साधारणत: उष्ण व कोरडे आहे. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व उंच आहे. त्यामुळे तेथील हवामान थंड असते. लोणावळा, खंडाळा ही जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. या भागात उंच डोंगरामुळे ढग अडविले जाऊन पाऊस जास्त पड़तो.

याउलट जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे असते. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. जिल्ह्यात सरासरी पाऊस ६५० ते ७०० मी. मी. इतका पडतो. पुणे शहराच्या पश्चिमेस 65 किलोमीटर अंतरावरील लोणावळा येथे सरासरी पाऊस 431 सेंटीमीटर पडतो.

पुणे शहराच्या पश्चिमेस 65 सेंटिमीटर पडतो तर त्याच्या पूर्वेकडील दौंड येथे तो 45 सेंटिमीटर पर्यंत कमी होतो त्यातही ते उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात कमी असते इतर  भागा प्रमाणे याही जिल्ह्यात मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस अनिश्चित असल्याने दौंड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात  वारंवार अवर्षण पडते. यापैकी शिरूर व दौंड तालुक्यात अवर्षणाची शक्यता तीन वर्षांतून एकदा व इतर सहा वर्षातून एकदा असते.

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ४९ लाख ३६ हजार ३६२ म्हणजेच ५२.३६ टक्के इतकी आहे तर स्त्रियांची लोकसंख्या ४४ लाख ९० हजार ५९७ म्हणजेच ४७.६४ टक्के इतकी आहे. लोकसंख्येनुसार पुणे जिल्हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे जिल्हा होता. परंतु ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाल्यामुळे सद्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा पुणे ठरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे अनुक्रमे पुणे, ठाणे, मुंबई उपनगर हे होत.

पुणे जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण हे ९१० इतके आहे व शहरी/नागरी लोकसंख्येचे प्रमाण ६०.९ टक्के इतके आहे. याशिवाय लोकसंख्येची घनता ६०३ चौ.किमी. आहे व साक्षरता ८६.२ टक्के इतकी आहे. तसेच सन २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ इतकी झाली आहे.

जिल्ह्याच्या उत्तर व पश्चिमेकडील डोंगराळ भागात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये भिल्ल, ठाकर, कातकरी व महादेव कोळी हे आदिवासी राहतात.

लाखो युवकांचा लोंढा रोज शिक्षणाच्या निमीत्ताने, नौकरीच्या निमीत्ताने या पुण्याकडे येतो आणि त्यामुळे पाहाता पाहाता आज पुणं फार प्रचंड वेगानं विस्तारलयं!

मृदा आणि खनिजे

जिल्ह्यात प्रामुख्याने तांबडी, तपकिरी आणि काळी अशा तीन प्रकारची मृदा आढळते. काही ठीकाणी दोन प्रकारच्या मृदांचे मिश्रण आढळते. पश्चिम भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि पुरंदर या साधारण डोंगराळ तालुक्यांमध्ये तांबडी मृदा आहे.

खेड व हवेली तालुक्यांचा पूर्व भाग आणि शिरूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या पश्चिम भागात तपकिरी रंगाची तर खेड, शिरूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या पूर्व  भागात आणि इंदापूर, बारामती या तालुक्यांत काळी मृदा आहे. नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन अधिक सुपीक आहे.जिल्ह्यांत बांधकामाचा दगड व चुनखडीव्यतीरिक्त अन्य खनिज संपत्ती नाही. चुनखडी मुख्यतः पूर्व भागात आढळते.

शेती

जिल्हाच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. या जिल्ह्यात कामकरी लोकांमध्ये शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण ५२·२५% असून, महाराष्ट्रात ते प्रमाण ६४·८८% आहे. (१९७१). जिल्ह्यात शेतीयोग्य जमीन १०,७१,००० हे. असून १९७३–७४ मध्ये १०,७०,७६५ हे. जमीन पिकांखाली होती तर पेरणीखालील निव्वळ क्षेत्र ९,५३,९९१ हे.  होते.

या जिल्ह्याचा पश्चिम भाग हा जास्त पावसाचा आहे. या भागात तांदूळ हे प्रमुख पीक आहे. या भागात आंबेमोहोर, कमोद इत्यादी तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यात ज्वारी व बाजरी ही पिके सर्वत्र घेतली जातात. गहू हे पूर्वेकडील भागात महत्त्वाचे पीक आहे. दौंड व शिरूर तालुक्यात संत्री व मोसंबीच्या बागा आहेत. पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत.

जुन्नर, हवेली, दौंड इत्यादी तालुक्यात फुलांची शेती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात आंबा, डाळिंब, केळी इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते.

राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर, द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, अंजिर संशोधन केंद्र राजेवाडी (पुरंदर), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड (पुणे)इ. महत्त्वाची संशोधन केंद्रे पुणे जिल्ह्यात आहेत. तसेच पुणे येथे मधुमक्षिका पालन व अंडी उबवणी केंद्र आहे.

पुणे जिल्ह्यातील उद्योगधंदे

पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) एकूण ११ वसाहती आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती, जेजुरी, भिगवण, पांढरी यांचा समावेश होतो. दारुगोळा बनविण्याचे कारखाने खडकी व देहुरोड येथे आहेत. त्याचबरोबर स्कूटर, रिक्षा, ट्रक इत्यादी तयार करण्याचे कारखाने चिंचवड येथे आहेत. पिंपरी येथे पेनिसीलीन व मोटारी तयार करण्याचे कारखाने आहेत. चिंचवड येथे स्कूटर व रिक्षाच्या कारखाना आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे काच सामान व थर्मास बनविण्याचे कारखाने आहेत. पिंपरी, लोणी काळभोर येथे रेडिओ तयार करतात. भोर तालुक्यात भोर येथे मेणकापड, मच्छरदाण्या, सूत, रंग इ. चे उद्योग आहेत व सारोळे येथे कागद कारखाना आहे. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे यंत्र निर्मिती कारखाना आहे. शिरुर तालुक्यात शिक्रापूर जवळ यंत्राचे कारखाने आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत.

पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत.

मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.

पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व उत्तर भागात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिरोली, मुळशी तालुक्यातील हिंजवडी ,भोर तालुक्यातील निगडे, शिरूर तालुक्यातील नावरे, दौंड तालुक्यातील मधुकर नगर ,बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव ,इंदापूर तालुक्यातील भवानीनगर व बिजवडी, हवेली तालुक्यातील थेऊर, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक यासारखे तेरा साखर कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत.

वने आणि प्राणी

जिल्ह्यातील १,५२८ चौ.किमी. क्षेत्र जंगलाखाली आहे. पश्चिमेकडील डोंगराळ व   दऱ्याखोऱ्यांच्या भागातच जंगले टिकून आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने तीन प्रकारची जंगले आढळतात : (१) सदाहरित जंगले– ही जंगले पश्चिम भागात जास्त पावसाच्या प्रदेशातील डोंगरउतारांवर आढळतात.

त्यांत साग, जांभूळ, खैर, हिरडा, ऐन इ. महत्त्वाची आहेत. (२) पानझडी वृक्षांची जंगले- ही जंगले बऱ्याच भागांत विखुरलेली असून,त्यांत सावर, धावडा, ऐन, आंबा इ. प्रकार आढळतात. (३) खुरट्या वनस्पती–जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त प्रदेशात ह्या वनस्पती असून त्यांत बोर, बाभूळ, लिंब इ. प्रकार आढळतात.

जुन्नर, भोर, वेल्हे व पुरंदर तालुक्यांत साग खेड व आंबेगाव तालुक्यांत हिरडा मावळ व मुळशी या तालुक्यांत बांबू, शिकेकाई यांचे प्रमाण अधिक आहे. मुळा, मुठा व नीरा या नद्यांच्या काठांवरील गाळप्रदेशात बाभळीच्या झाडांचे अरुंद पट्टे तयार झाले आहेत.

पूर्वी या जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाघ, रानडुक्कर, अस्वल, चितळ, भुंकणारे हरिण इ. प्राणी विपुल होते परंतु बेसुमार जंगलतोड व शिकार यांमुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

जंगलांमधून लांडगा, कोल्हा, तरस, सांबर, नीलगाय, ससा  इ. प्राणी आढळतात. यांशिवाय खोकड, रानमांजर, मुंगूस, सायाळ इ. प्राणीही पुष्कळ आहेत.

जिल्ह्यात सु. ३०० जातींचे पक्षी असून त्यांपैकी काही हिवाळ्यात व काही उन्हाळ्यात स्थलांतर करून येतात. त्यांत टील जातीची बदके, पाणलावा, करकोचा, भोरडी, चंडोल हे पक्षी महत्त्वाचे आहेत. रानकोंबडा, तितर, मोर, हिरवी कबुतरे इ. पक्षी सर्वसाधारणपणे जंगलांत आढळतात.

पश्चिम भागातील डोंगराळ जंगली प्रदेश, पुण्याजवळील कात्रज तलाव, नद्यांचे डोह व धरणांचे जलाशय यांच्या परिसरात पक्षांचे प्रमाण अधिक आढळते. १९७७ मध्ये पुण्यास मुळा-मुठा नद्यांच्या काठी पक्षांचे अभयारण्य स्थापन करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे

जिल्ह्यात लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. शिवनेरी, सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगड, विसापूर इत्यादी किल्लेही पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर आहे. येथे भीमा नदीचे उगमस्थान व अभयारण्य आहे.

कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहे. पुणे येथे केळकर संग्रहालय, आगाखान पॅलेस, पुणे विद्यापीठ इत्यादींना पर्यटक भेट देतात. पुणे शहराला लागून महाळुगे-बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. चाकण येथे भुईकोट किल्ला, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, देहू येथे संत तुकाराम महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. मोरगाव, रांजणगाव, ओझर, थेऊर, लेण्याद्री ही अष्टविनायकातील पाच ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत.

मोरगावजवळ सुपे येथे मयुरेश्वर अभयारण्य आहे. कात्रज येथे सर्पोद्यान आहे. जेजुरी येथे खंडोबाचे भव्य मंदिर डोंगरावर असून हे यात्रेचे ठिकाण आहे. निगडी येथील अप्पुघर प्रसिद्ध आहे. खेड-शिवापूर येथे कमरअली दरवेश दर्गा आहे.

भोर येथील भाटघर धरण, बनेश्वर ही पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. जुन्नर तालुक्यातील आर्वी हे ठिकाण उपग्रहाकडून येणारे संदेश प्राप्त करण्याचे केंद्र आहे. तसेच खोडद येथे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मोठी दुर्बिण बसवलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील किल्ले व गड

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, रायरेश्वर, राजमाची, राजगड, विसापूर, लोहगड, मल्हारगड, तोरणा, दुर्ग-ढाकोबा, तुंग, तिकोना, जीवधन, कोरीगड-कोराईगड, चावंड, भोरगिरी, सिंदोळा, चाकणचा किल्ला, रायरीचा किल्ला, हडपसर हे किल्ले पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. .

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment