पुणेरी भाकरवडी | puneri bhakarwadi recipe in marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
पुणेरी भाकरवडी | puneri bhakarwadi recipe in marathi

पुणेरी भाकरवडी | puneri bhakarwadi recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आपल्या सर्वांना चहाच्या वेळी काहीतरी कुरकुरीत आणि खुसखुशीत खायची इच्छा होते. चला तर मी आपण अशीच एक खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपी पाहुयात.आज आपण पुणेरी भाकरवडी कशी बनवायची हे बाघणार आहोत.

पुणेरी भाकरवडी साहित्य ( puneri bhakarwadi recipe in marathi ingredients ) :

ह्या साहित्यामध्ये 4 लोकांसाठी आपण ही रेसिपी बनवू शकतो.

पुणेरी भाकरवडीच्या आवरणासाठी:
100 ग्राम मैदा
2 चमचे बेसन
1 चमचा गरम तेलाचं मोहन
1 चमचा मीठ
1 चमचा लाल तिखट
1 चमचा ओवा

सारणासाठी साहित्य:

1 चमचा जिरं
1 चमचा सफेद तीळ
4 चमचे सुक खोबरं
2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा जिरा पावडर
2 चमचे धना पावडर
2 चमचे लाल तिखटचवीनुसार मीठ
2 चमचे बरीक शेव
1 चमचा साखर
2 चमचे चिंच गुळाची चटणी

ही रेसिपी आपण 35 ते 40 मिनिटात बनवू शकतो.

पुणेरी भाकरवडी कृती ( puneri bhakarwadi recipe in marathi steps ): 

प्रथम एका पसरट भांड्यात मैदा, बेसन, लाल तिखट, मीठ, ओवा आणि तेलाचं मोहन घालून पाण्याने पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचा. त्यांनतर एका कढईत जिरं, तीळ, सुक खोबरं, आणि कोथिंबीर परतून मिक्सर मधून वाटून घ्यायची. 

वाटलेल्या मिश्रणात लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, मीठ, साखर, शेव टाकून परत वाटण वाटून घ्याच आहे.मळलेल्या पिठाची पारी लाटून घ्याची आहे व त्यावर चिंच गुळाची चटणी लावावी.

दाबेली रोल ची रेसिपी | dabeli roll recipe in marathi येथे वाचा

त्यावर तयार सारण आणि शेव पसरवावी . त्याचा रोल बनवून घ्यायांचा आहे. व हलक्या हाताने रोल न तुटता त्याचे काप करून घायचे आहेत.

तयार काप कमी आचेवर तेलामध्ये 7/8 मिनिटे खरपूस तळून घ्यायचे आहेत. आता आपली भाकरवडी तयार झाली आहे.

तुम्ही ही भाकरवडी प्लास्टिक च्या डब्यात स्टोर कर्जन ठेऊ शकता जेणेकरून ती सधळून जाणार नाही.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment