पुरणपोळी रेसिपी मराठी Puranpodi Recipe In Marathi

पुरणपोळी रेसिपी मराठी Puranpodi Recipe In Marathi महाराष्ट्राचा फेमस अशा गोड पदार्थांमध्ये असलेली पुरणपोळी सर्वांनाच आवडते. परंतु आजकाल पुरणपोळीचे नाव जरी काढले तरी खूप मोठा पसारा किंवा खूपच लांब प्रक्रिया आहे, असे गृहिणींना वाटते. तर बऱ्याच गृहिणींना पुरणपोळी कशी तयार करतात हे देखील माहिती नाही. आज-काल रेडिमेट पुरणपोळ्या देखील मिळतात. दिवाळी, गुढीपाडवा, पोळा, होळी, दसरा, गणेश चतुर्थी अशा सणांना आपण पुरणपोळीचा नैवेद्य देवी देवतांना दाखवत असतो. मग ही पुरणपोळी आपल्याला का जमत नाही.

अतिशय सोपी आणि सरळ पद्धत पुरणपोळीची आहे. तर आज आम्ही तुमच्याकरिता खास, लुसलुशीत आणि चविष्ट अशी पुरणपोळी कशी तयार करायची ही रेसिपी घेऊन आलो आहोत. तर चला मग पाहूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

 Puranpodi Recipe

पुरणपोळी रेसिपी मराठी Puranpodi Recipe In Marathi

रेसिपी प्रकार :

पुरणपोळी ही मुख्यतः एक पोळीचा प्रकार आहे, जी गव्हाचे पीठ, मैदा, सातूचे पीठ यापासून बनवली जाते. ही पोळी करण्याची आपापली पद्धत वेगळी आहे. पुरणपोळीसाठी साखर किंवा गूळ देखील वापरला जातो. पुरणपोळी चे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये खापर पुरणपोळी, तूप पुरणपोळी,
मैदा पुरणपोळी, सुकामेव्याची पुरणपोळी, खव्याची पुरणपोळी, गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणपोळी, तिळाची पुरणपोळी, सातूच्या पिठाची पुरणपोळी इत्यादी प्रकारात पुरणपोळी रेसिपी बनवली जाते. पुरणपोळी खायला खूपच चवदार आणि गोड लागते. पुरणपोळी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. ज्या दिवशी तुम्हाला पुरणपोळ्या करायचे आहे त्या अगोदरच्या दिवशी तुम्ही पुरण करून फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपला वेळही वाचतो तर मग त्याला जाणून घेऊया ही रेसिपी कशी करायची.

ही रेसिपी किती जणांकरिता करणार आहोत ?
पुरणपोळी ही रेसिपी आपण 6 जणांकरिता करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

पूर्वतयारी करता आपल्याला किमान 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पुरणपोळीची डाळ शिजवण्याकरिता तसेच पुरणपोळी करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

पुरणपोळी तयार करण्याकरता आपल्याला 50 मिनिटे एवढा वेळ लागतो.

पुरणपोळीकरिता लागणारे साहित्य :

1) तीन वाट्या हरभरा डाळ
2) दोन वाट्या बारीक केलेला गूळ
3) एक वाटी साखर
4) पाव चमचा इलायची पूड
5) अर्धा चमचा जायफळ पूड
6) साधारण सात ते आठ वाट्या पाणी
7) दीड ग्लास सपाट बारीक चाळणीने गाळून
घेतलेली कणिक
8) अर्धी वाटी मैदा
9) अर्धी वाटी तूप

पाककृती :

  • मसाला भात रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यायचे आहे. हरभरा डाळ जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाणी कमी पडल्यास आणखीन पाणी टाकले तरी चालेल.
  • डाळ हाताला मऊ शिजलेली लागली की, चाळणीत ओतून घ्या. आणि ही चाळणी पातेल्यावर ठेवा म्हणजे डाळीतील राहिलेले पाणी आमटीचा कट करण्याकरता उपयोगी पडेल.
  • ही डाळ एका पातेल्यात ओतून त्यामध्ये गुड साखर घालून शिजवण्यास ठेवा. आता ती चमच्याने किंवा डावाने वरचेवर हलवा नाहीतर गुळ तळाला लागून करपेल.

पुरण शिजायला लागले असता, त्याचे चटके उडू शकतात. त्यामुळे सांभाळून पुरण हलवावे.

  • पुरण शिजले म्हणजे पातेल्यावरच्याकडेचे पुरण आपल्याला कोरडी दिसू लागेल आणि पुरण सुटून मध्येच गोळा तयार होते. नंतर गॅस बंद करून घ्या.
  • पुरणपोळी कोमट झाले की, त्यामध्ये वेलची पूड जायफळ घालून पुरण एकजीव करा. व नंतर ते पुरणपोळी यंत्रामधून बारीक करून घ्या.
  • नंतर कणकेमध्ये मीठ, मैदा घालून नेहमीच्या कणकेसारखी भिजवा व तेलाचा हात लावून ते कणिक झाकून ठेवा.
  • एका तासाने पाण्याचा थोडा हात लावून पुन्हा मळून घ्या.
  • पुढे तयार करण्याकरिता सर्वप्रथम लिंबा एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून हातामध्ये घ्या. मोदकाच्या उंडा खोलगट करा.
  • नंतर त्यामध्ये कणकेच्या दीडपट पुरणाचा गोळा घाला. व पोळीपाटावर पीठ टाकून ती हलक्या हलक्या हाताने पोळी लाटा. थोडीफार पातळ न लाटता थोडं जाड ठेवायची आहे.
  • ही पोळी हातावर घेऊन अलगद तव्यावर टाकण्या अगोदर तव्याला तूप लावून घ्या. म्हणजे ती पोळी तव्याला चिकटणार नाही. पुरण पोळी आपल्याला मंद आचेवर शिकायचे आहे.
  • पोळी भाजताना तव्यावर गरम तूप सोडले, तर खमंग वास सुटतो व पोळी खायला छान लागते.
  • जेवायला पुरणपोळी वाढताना साजूक तूप पातळ करून त्या पोळीवर लावावे.
  • पुरणपोळी श्रीखंड, दूध तूप आंब्याचा रस यांच्यासोबत खाण्यास द्यावी.

पुरणपोळीतील पोषक तत्व :

पुरणपोळी जर गव्हाच्या पिठात तयार केलेली असेल तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे, बी कॉम्प्लेक्स, फायबर तसेच शरीराला डाळ आणि कणिक एकत्र केल्यामुळे प्रथिने मिळतात. त्या व्यतिरिक्त पुरणपोळीमध्ये आपण गूळ वापरला असल्यामुळे गुळातील पोषक घटक म्हणजेच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे असतात. गूळ पचायला वेळ लागतो, ऊर्जा आपल्या शरीरात कायम राहते. वेलची पूड, केशर व जायफळ पावडर हे शरीरासाठी चांगलेच असते.

फायदे :

पुरणपोळी आरोग्यासाठी खाणे हिताचीच आहे कारण त्यामध्ये डाळ आणि गव्हाचे मिश्रण एकत्र होते तेव्हा शरीराला त्यापासून प्रथिने मिळतात.

तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्याचे काम देखील पुरणपोळी करत असते.

पुरणपोळीमध्ये बरेच पोषक तत्व असतात, त्यामुळे आपली पचन संस्था चांगली राहते व शरीर निरोगी राहते.

पुरणपोळी मध्ये कॅल्शियम असल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.

तोटे :

पुरणपोळी पचायला जड असल्यामुळे तिचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. अतिरिक्त सेवन केल्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात पोषणमूल्य गेल्यामुळे ते हानिकारक ठरू शकते.

तसेच पुरणपोळी मधुमेह रुग्णांसाठी फारशी फायदेशीर नाही. पोटाचा आजार असणाऱ्या लोकांनी सुद्धा पुरणपोळी खाऊ नये.

मित्रांनो, पुरणपोळी रेसिपी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.

Leave a Comment