रबडी फालुदा रेसिपी मराठी Rabdi falooda Recipe in Marathi उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रबडी फालुदा खाण्याचे अनेक फायदे आपल्याला होतात. फालुदा खाण्यासाठी तुम्ही बाहेर स्टॉलवर जातात तेव्हा तेथे रबडी फालुदा खाता. रबडी फालुदा खाण्यासाठी खूप चविष्ट व टेस्टी लागतो. तसेच रबडी फालुदा ज्यांच्या भागांमध्ये मिळत नाही. त्यांच्याकरिता आम्ही खास हि रेसिपी घेऊन आलो आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने व कमी वेळेमध्ये तुम्ही रबडी फालुदा ही रेसिपी तयार करू शकता. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
रबडी फालुदा रेसिपी मराठी Rabdi falooda Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
रबडी ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. तसेच त्यामध्ये घालण्यात येणारे घटक देखील कमी जास्त प्रमाणात असू शकतात. रबडी तयार करण्याच्या पद्धतीमध्ये रबडी फालुदा, सिताफळ रबडी, गुलाबजाम रबडी, रबडी केक इत्यादी पद्धतीने रबडी तयार केली जाते. रबडी ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व अप्रतिम लागते म्हणून आपण आपल्या घरी स्वतःही रेसिपी तयार केली तर कधीही केव्हाही आपणही रेसिपी खाऊ शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.
रबडी बनवण्यासाठी साहित्यः
1) दूध
2) मिल्क पावडर
3) ड्रायफ्रूट्स वेलची पूड
4) केसर
5)साखर
रबडी गार्निशिंग करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) रात्रभर भिजवलेले जिया सीड्स
2) रूह अफजा
3) ड्रायफूट
4) टूटीफ्रूटी
रबडी फालूदा बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला एक स्वच्छ पॅन घेऊन त्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर ते चांगले उकडू द्या आणि अर्धे होईपर्यंत शिजवून घ्या.
- दूध अर्धे झाले की, त्यामध्ये आता एक दोन चमचे मिल्क पावडर करून घट्ट करून घ्या व छान ढवळून घ्या.
- आता त्यामध्ये साखर व वेलची पूड टाकून पुन्हा दोन-तीन मिनिटे शिजवून घ्या.
- आता तुमची स्वादिष्ट रब्बी तयार आहे. आता वरून ड्रायफ्रूट्स टाका व हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता.
- आता आपल्याला रबडी फालुदा सर्व्ह करण्यासाठी त्याला गार्निशिंग करायचे आहे.
- आता एका क्लासमध्ये सर्वप्रथम न्यूडल्स किंवा शेवया घाला व वरून थोडे शुगर सिरप टाका.
- नंतर त्यावर रबडी टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. जेव्हा न्यूडल्स आणि रबडी चांगले मिक्स होईल तेव्हा परत एकदा रबडी टाका.
- आता वरून क्रश केलेले बर्फ टाकून गार्निश करण्यासाठी एक ते दोन चमचे रूह अफजा घाला तसेच ड्रायफ्रूट्स व टूटीफ्रूटी टाका.
- तुम्हाला टूटीफ्रूटी व रुह अफजा आवडत नसेल तर तुम्ही ते काढून टाकू शकता.
अशाप्रकारे रबडी फालुदा रेसिपी तयार आहे.
पोषक घटक :
रबडी फालुदामध्ये फॅट, प्रथिन, कर्बोधके कॅल्शियम,
ब जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम व सूक्ष्म पोषण मूल्य देखील असतात. जे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात.
फायदे :
रबडी फालूदा खाणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते, तसेच त्यापासून आपल्या शरीराला फॅट मिळतात.
रबडी फालुदा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते, व त्यामुळे आपली हाडे मजबूत व बळकट राहतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रबडी फालुदा खाल्ल्यामुळे दिवसभराची उष्णता निघून जाते व मूड फ्रेश होते.
रबडी फालुदा खाल्ल्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे आपण नियमित रबडी फालुदा खाने हिताचे ठरते.
तोटे :
रबडी फालुदा हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ असतो. त्यामुळे ज्यांना दुधाची एलर्जी आहे, अशांनी हा पदार्थ खाणे टाळावे.
कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्यांनी देखील ह्या पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे आणखीन कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयविकार वाढू शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला रबडी फालुदा ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.