रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Raigad District Information In Marathi

Raigad District Information In Marathi  नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेला रायगड जिल्हा! याची माहिती पाहणार आहोत.

Raigad District Information In Marathi

रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Raigad District Information In Marathi

शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उधळलेला गुलाल आजही जेथील आसमंताला गुलाबी करतोय. इथल्या मातीचा कण न् कण आजही शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य तेजाची महिमा गातोय

असा रायगड जिल्हा!

युगपुरूषाचे निधन रायगडावर झाल्यानंतर खुद्द रायगड देखील धायमोकलुन रडला असा दुःखद प्रसंग घडला… पृथ्वीकंप झाला… अष्टदिशा आकांत करत्या झाल्या….. रयतेचा कैवारी निर्वतला तो ही याच… रायगड जिल्हयात…..

मराठयांचा बाणा… लढा… त्याग… शत्रुला परतवुन लावतांना धारातीर्थी पडलेले वीर … रायगड जिल्हयाने जवळुन पाहिले अनुभवले त्यांना आपल्या कुशीत सामावुन घेतले या रायगडने… मराठयांच्या इतिहासाचे आणि रायगड जिल्हयाचे अतुट असे नाते आहे.

या जिल्हयातील आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळया सांस्कृतिक परंपरा, भाषा, धर्म त्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हयाची आपली अशी ओळख निर्माण केली आहे.

रायगड जिल्ह्याचे नामकरण

रायगड जिल्हयाचे पुर्वीचे नाव कुलाबा असे होते जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून हे नाव पडले होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्हयात असल्याने बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी  1981 साली 1 जानेवारीला या जिल्हयाचे नाव बदलुन रायगड असे करण्यात आले.पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले.

इतिहास

1869 मध्ये ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात भोईर, भगत, पाटील, म्हात्रे, नाईक, ठाकूर ही लोकसंख्येचा एक मोठा भाग प्रसिद्ध आणि मूळ आडनावे आहेत. या टप्प्यावर, आधुनिक रायगड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग ठाणे जिल्ह्यात कायम ठेवण्यात आला होता.

मुंबईच्या खाडीपलीकडे असलेले पनवेल हे १८८३ पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते आणि आधुनिक रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कर्जत हे क्षेत्र १८९१ पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. कोलाबा जिल्ह्याचे नंतर रायगड जिल्हा असे नामकरण करण्यात आले.

रायगड जिल्हयात पुर्वी काही ठिकाणी बेनेइस्त्रायली ज्यु लोकांनी निवास केला होता. आगरी जातीचा समाज या जिल्हयात मोठया प्रमाणात वास्तव्याला आहे.

भूगोल

जिल्ह्याच्या वायव्येस मुंबई बंदर, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, दक्षिणेस रत्‍नागिरी जिल्हा आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. त्यात मुंबई बंदराच्या अगदी दक्षिणेस असलेल्या पेण-मांडवा या मोठ्या नैसर्गिक बंदराचा समावेश होतो आणि त्यासोबत एकच भूस्वरूप तयार होते.

रायगड जिल्हयाला 240 कि.मी. लांबीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे.किना.यालगत घारापुरी, कुलाबा, जंजिरा, खांदेरी.उंदेरी, कासा, करंजा अशी बरीच लहान मोठी बेटे आहेत.

रायगड जिल्ह्यात विविध प्रकारची भू-रूपे आढळतात. जिल्ह्याच्या पूर्व सीमाप्रदेशालगत सह्याद्री पर्वत उत्तर-दक्षिण पसरलेला असून या सह्याद्रीच्या रांगा ओलांडून जिल्ह्यापलीकडे जावयाचे झाल्यास भिमाशंकर, सावळा, कुसूर, बोर, लिंगा, कुंभा, कवळ्या, शेवत्या, वरंधा, ढवळा व पार यांसारखे घाट ओलांडावे लागतात.

पूर्वेकडे उत्तर-दक्षिण पसरलेल्या या सह्य पर्वतरांगाच्या माथेरान, मलंगगड, चंदेरी, कनकेश्वर, सुकेल, धूप, मिऱ्या, कुंभी यांसारख्या शाखा-उपशाखा थेट किनारी भागापर्यंत पोहोचल्या आहेत.

अर्थात, किनारी भागातील त्यांची उंची समुद्रसपाटीपासून १५० मीटर पेक्षाही कमी आहे. जिल्ह्याच्या मध्य भागात या डोंगररांगांची उंची २०० मीटरपर्यंत तर पूर्व भागात ६०० मीटरहून अधिक आहे. काही भाग १,००० मीटरपेक्षानी उंचावर आहे.

पूर्वेकडील सह्य पर्वतरांगांचा प्रदेश; किनाऱ्यालगतचा खालाटीचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग यांच्या मधील मैदानी व सखल भाग आहे. रोहे, पनवेल, कर्जत, पेण, सुधागड या तालुक्यांमधे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश वनांनी व्यापलेले आहे.

नद्या

उल्हास, प्राताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ व सावित्री या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. या सर्व नद्या पूर्वेकडील सह्य डोंगररांगांत उगम पावून वलणे घेत घेत पश्चिमेकडे वाहात जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

उल्हास नदी बोरघाटाच्या उत्तरेस सह्याद्री रांगाम्त उगम पावते व कर्जत तालुक्यातून दक्षिण-उत्तर वाहात जाऊन पुढे ठाणे तालुक्यात प्रवेशते. पाताळगंगा नदीचा उगम बोरघाटाजवळ होतो, तर भोगावतीचा उगम बोरघाटाच्या दक्षिणेस होतो. या दोन्ही नद्या पश्चिमेकडे वाहात जाऊन धरमरतच्या खाडीत अरबी समुद्रास मिळतात.

पाताळगंगेचा जिल्ह्यातील प्रवास खालापूर, पनवेल व पेण या तालुक्यांमधून होतो. ‘खालापूर’ हे ठिकाण पाताळगंगेच्या काठी वसले आहे. अंबा नदी प्रथम नैऋत्य दिशेकडे व नंतर वायव्येकडे वाहात जाऊन पुढे धरमतरच्या खाडीत अरबी समुद्रास मिळते.

अंबा नदीचा जिल्ह्यातील प्रवास प्रथम सुधागड तालुक्यातून व नंतर पेण तालुक्यातून होतो. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण अंबा नदीकाठी वसले आहे. सुधागड जवळच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावणारी कुंडलिका सुधागड व रोहे या तालुक्यामधून पूर्व-पश्चिम प्रवास करते हिच्या मुखाशी रोह्याची खाडी आहे.

सावित्री नदी प्रथम पोलादपूर व नंत्र महाड तालुक्यातून वाहाते. तिचा पुढील प्रवास प्रथम म्हसळे तालुक्याच्या दक्षिणेस सीमेवरून व पुढे काही अंतर श्रीवर्धन तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून होतो.

भिवपुरी (तालुका कर्जत) व खोपोली येथे विद्युतनिर्मिती केंद्रे आहेत. कर्जत तालुक्यातील भिवपुरी विद्युतनिर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी (अवजल) अडवून त्याच तालुक्यात ‘राजनाला’ हे धरण बांधण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील खोपोली जलविद्युत केंद्रातील पाणी (अवजल) पाताळगंगा नदीत सोडून या नदीवर ‘पाताळगंगा’ प्रकल्पां’तर्गत धरण बांधण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा विद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर कोलाडजवळ ‘काळ प्रकल्पां’तर्गत धरण बांधण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्याची राजकीय रचना

तालुके

(१) अलिबाग (२) उरण (३) पनवेल (४) कर्जत (५) खालापूर (६) पेण (७) सुधागड (पाली) (८) रोहा (९) माणगाव (१०)महाड (११) पोलादपूर (१२) म्हसळे (१३) श्रीवर्धन (१४) मुरुड. एकूण तालुके चौदा.

जिल्ह्यात खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, रसायनी, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, नागोठणे, सुधागड-पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, बिरवाडी या शहरांचा समावेश होतो.

पोलादपूर. लोकसंख्या, औद्योगिकीकरण तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर पनवेल आहे. या जिल्ह्यात प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी असलेल्या उरणमध्ये असलेल्या घारापुरी किंवा एलिफंटा बेटाचाही समावेश आहे.

लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार रायगड किल्ल्याची लोकसंख्या 26,35,200 असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,152 वर्ग कि.मी.आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 89 टक्के असून लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 955 इतके आहे. आगरी जातीचा समाज या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे.

हवामान

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः सम, उष्ण व दमट आहे. दिवसांच्या व रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. उन्हाळे खूप उष्ण नसतात व हिवाळेही खूप थंड नसतात. मात्र, सर्वच ऋतूत हवेतील आर्द्रता जाणवण्याजोगी असते.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सरासरी ५० से.मी. इतका पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाते. जिल्ह्यात माथेरान येथे सर्वाधिक पाऊस पडतो, तर अलिबाग येथे किमान पावसाची नोंद होते.

मृदा

जिल्ह्याच्या मध्य भागातील सखल मैदानी प्रदेशात गाळाची व सुपीत मृदा असून किनारी भागात रेती व वाळूमिश्रित मृदा आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील डोंगराल भागात ‘लॅटराईट’ प्रकारची माती आढळते.

खनिजे

बॉक्साईट हे खनिज श्रीवर्धन, रोहे व मुरुड या तालुक्यात काही प्रमाणात सापडते. जिल्ह्यात काही ठिकाणी लोह लोह खनिजाचेही तुरळक साठे आढळतात. उरनजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आहेत. उरण, पेण व पनवेल या तालुक्यांमध्ये किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मिठागरे आहेत.

शेती

भात हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक असून जिल्ह्यात लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ 70% क्षेत्र भात पिकाखाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाताचे उत्पादन घेतले जात असले, तरी माणगाव, अलिबाग, पनवेल, व पेण हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

पोलादपूर, महाड, माणगाव व रोहे या तालुक्यांमध्ये नाचणी व वरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वरील पिकांशिवाय खरीप हंगामात वाल व तूर यांसारखी पिकेही घेतली जातात.

माड किंवा नारळाची लागवड जिल्ह्याच्या किनारी भागातील रेताड व खाऱ्या जमिनीत केली जाते. अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड व म्हसळे या तालुक्यांत माडाच्या बागा मोठ्या प्रमाणावर असून हे तालुके नारळाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पोफळीची किंवा सुपारीची आगरे श्रीवर्धन, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील डोंगर उतारावरील तांबड्या मृदेत आंब्याची लागवड केली जाते. रातांबीचे झाड थोड्या कमी प्रतीच्या जमिनीतही येते. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत रातांबीची झाडे लावली जातात. रातांबीच्या फळांना ‘कोकम’ असे म्हणतात.

कोकमपासून आमसुले तसेच सरबत तयार केले जाते. याशिवाय जिल्ह्यात काजू, कलिंगड, फणा आदी फळांचे उत्पानही कमी-अधिक प्रमाणावर घेतले जाते.

उद्योगधंदे

जिल्ह्याला सुमारे २४० कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. साहजिकच मत्स्यव्यवसाय हा जिल्ह्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यात खाऱ्या पाण्यातील सुरमई, बांगडा, हाईद, कर्ली, रावस, सरंगा, पापलेट, पेडवे, रेण्व्या इत्यादी प्रकारच्या माशांची पकड मोठ्या प्रमाणावर होते. खाजणांमध्ये कोळंबीची शेतीही केली जाते. काही ठिकाणी थोड्या-फार प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारीही केली जाते. अलीकडील काळात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा वापर व प्रगत तंत्रज्ञांनाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

रायगड जिल्हयात औद्योगिक वसाहत मोठया प्रमाणात निर्माण झाली असुन औद्योगिकदृष्टया हा जिल्हा विकसीत होत आहे.

खोपोली, पनवेल, रोहे, अलिबाग, तळोजे, पाताळगंगा, नागोठणे व महाड इत्यादी ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे.

थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. येथे सुफला व उज्ज्वला ही खते तयाअ होतात. पनवेलजवळ ‘रासायनी’ नावाने ओळखला जाणारा हिन्दुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सचा सार्वजनिक क्षेत्रातील औषध-निर्मिती प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर अ‍ॅन्टिबायोटिक्सची निर्मिती केली जाते. पनवेल शहरात धूत-पापेश्वर कंपनीचा आयुर्वेदिक औषधांचा कारखाना आहे.

नागोठणे येथे इंडियन पेट्रो-केमिकल्सचा प्रकल्प असून उरण व बॉम्बे-हायमधून उपलब्ध झालेल्या खनिज तेलापासून इथेन व प्रोपेन या वायूंवर प्रक्रिया करून इथिलिन मिळविले जाते. हा वायूविभाजन प्रकल्प नुकताच खाजगी क्षेत्राकडे सोपविला गेला आहे.

महाड येथे हातकागद तयार करण्याचा उद्योग असून रोहे व खोपोली येथे पुठ्ठे तयाअ करण्याचा व्यवसाय चालतो. खोपोली येथे एक कागद गिरणीही आहे. रोहे, महाड व पाली येथे तांब्या-पितळीची भांडी तयार करण्याचा उद्योग असून महाड, पोयनाड, पाली व खालापूर येथे मातीची भांडी व विटा तयार करण्याचा उद्योग आहे. पेण येथे शाडूच्या मूर्ती तयाअ करण्याचा परंपरागत व्यवसाय असून येथे तयार होणाऱ्या गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत.

औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग, पनवेल, महाड, उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे. रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने भारताच्या कानाकोपर्‍यातून उदरनिर्वाहासाठी येथे जनता स्थित झाली आहे.

रायगड जिल्हयाला जवळ-जवळ १० कि.मी.चा सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी सतत असते. रायगड जिल्हयात मासेमारीमुळे मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. शिवाय पर्यटनामुळे येथील अनेक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

वाहतूक व रस्ते

राष्ट्रीय महामार्ग क्र 4 आणि क्र. 17 या जिल्हयातुन गेले आहेत.

रायगड जिल्हा सायन पनवेल एक्सप्रेस वे ने जोडला गेला आहे.

वने

जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश क्षेत्रावर वने आहेत. पेण, पनवेल, कर्जत, रोहे आणि सुधागड या तालुक्यांमध्ये वनाचे प्रमाण अधिक आहे. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, आंबा, चिंच यासारखे वृक्ष आहेत.

येथील वनांमध्ये वाघ, कोल्ह्ये, रानडुक्कर, सांबर यांसारखे प्राणी आढळतात. पनवेल तालुक्यात कर्नाळा येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. उरण तालुक्यात घारापुरी व कर्जत तालुक्यात माथेरान येथे वनोद्याने आहेत. जिल्ह्यातील फणसाड येथील अभयारण्य अतिशय विस्तृत क्षेत्रावर पसरलेले आहे.3

रायगड जिल्ह्यातील पर्यटन

या जिल्हयात प्राचीन ऐतिहासीक वास्तु, पर्यटकांना आकर्षीत करणारे समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, पश्चिम घाटात असलेली आकर्षक अप्रतिम ठिकाणे आपल्याला पहायला मिळतात. घारापुरी येथील ऐतिहासीक एलिफंटा गुहा त्याकाळातील वैभवसंपन्न संस्कृतिच्या साक्षीदार म्हणुन आजही आपल्याला खुणावतात.

रायगड जिल्हयात वेगवेगळया काळातील भव्य आणि चिरेबंदी किल्ले आजही आपले अस्तित्व टिकवुन आहेत… रायगड किल्ला, मुरूड.जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला सुधागड किल्ला आजदेखील आपल्याला कुतुहलात टाकतात.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

रायगड जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?

रायगड जिल्ह्यास ‘रायगड’ हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळाले तो अभेद्य व शिवछत्रपतींच्या राजधानीचे ठिकाण असलेला किल्ला हा रायगड जिल्ह्याची मुख्य ओळख आहे.

रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?

या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

रायगड जिल्ह्यात कोणते क्षेत्र येते?

जिल्ह्यात खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, रसायनी, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, नागोठणे, सुधागड-पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, बिरवाडी या शहरांचा समावेश होतो. पोलादपूर.

रायगड जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

1 जानेवारी 1981

रायगड जिल्ह्यात कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात?

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Leave a Comment