राजस्थान राज्यविषयी संपूर्ण माहिती Rajasthan State Information In Marathi

Rajasthan State Information In Marathi भारतातील उष्ण राज्य म्हणून ओळखला जाणारा राजस्थान अतिशय सुंदर असून, वायव्य दिशेला वसलेला आहे. राजस्थान राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात मोठे राज्य ठरते. सुमारे ३ लाख ४१ हजार २३९ चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असणारा राजस्थान त्याच्या संस्कृतीसाठी आणि खाद्य प्रकारासाठी खूपच लोकप्रिय आहे. येथे अनेक ऐतिहासिक घटना देखील घडल्या आहेत, त्याचप्रमाणे अनेक जुनी स्मारके, वास्तु, किल्ले, इत्यादी घेऊन मोठ्या दिमाखात उभा असणारा राजस्थान तेथील उत्कृष्ट गोड पदार्थांसाठी आणि पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील भोजनामध्ये मोठ्या प्रमाणावर साजूक तुपाचा वापर केला जातो, त्यामुळे इथल्या जेवणाला एक वेगळीच प्राप्त होत असते.

Rajasthan State Information In Marathi

राजस्थान राज्यविषयी संपूर्ण माहिती Rajasthan State Information In Marathi

राजस्थान राज्यांमध्ये भारताचे सर्वात मोठे समजले जाणारे थर चे वाळवंट असल्यामुळे, येथे मोठ्या प्रमाणावर उष्णता व वाळू बघायला मिळते. जगभरात सर्वात मोठ्या वाळवंटांमध्ये राजस्थान वाळवंटाचा किंवा थरच्या वाळवंटाचा सुमारे १८ वा क्रमांक लागतो. आजच्या लेखांमध्ये आपण या राजस्थान राज्याविषयी माहिती बघतानाच, तेथील संस्कृती, ऐतिहासिक माहिती, सण उत्सव, भाषा आणि खाद्य संस्कृती बद्दल जाणून घेणार आहोत…

नाव राजस्थान
प्रकार राज्य
दिशावायव्य
वैशिष्ट्यवाळवंटीय प्रदेश
क्षेत्रफळ ३ लाख ४२ हजार २३९ चौरस किलोमीटर
मुख्यमंत्रीअशोक गहलोत
राज्यपालकालराज मिश्रा
राजधानीजयपूर

भारताच्या वायव्य दिशेला वसलेल्या राजस्थान या राज्याची निर्मिती ही सुमारे ५००० वर्षांपूर्वी झाली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी अनेक रजपूत सम्राटांनी राज्य केलेले असून, ज्यांच्यामध्ये राणा कुंभबप्पा रावल, राणा संगा, व राणा प्रताप यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचा समावेश होतो.

राजस्थान हे एक रजपुत लोकांचे राज्य असून येथे मुख्य लोकसंख्या ही रजपूत समाजाची आढळून येते. या ठिकाणी मौर्य साम्राज्य, चालुक्य, चव्हाण, परमार इत्यादी घराण्यांनी देखील राज्यकारभार केलेला आहे. तत्कालीन इतिहासामध्ये किंवा मध्ययुगीन कालावधीमध्ये राजस्थानच्या परिसरातील मेवाड हे सर्वात महत्त्वाचे शक्तिशाली संस्था म्हणून उदयास आलेले होते. पुढे या राजस्थानवर मराठ्यांनी आपले साम्राज्य विस्तारले होते.

१७५५ यावर्षी अजमेर किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला आणि पुढे पिंडारी वर देखील हल्ला केला. राजस्थान या राज्याची नवनिर्मित स्थापना ही ३० मार्च १९४९ या दिवशी झाली असल्याचे सांगितले जाते.

राजस्थान बद्दल तथ्य:

राजस्थान हे एक उष्ण प्रदेशाचे राज्य असले, तरी देखील या ठिकाणी एक हिल स्टेशन आढळून येते ज्याचे नाव माउंट अबू असे असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १७२२ मीटर त्याची उंची आहे.

राजस्थानमध्ये पावसाच प्रमाण कमी असते, त्याचप्रमाणे वाळू ही मोठ्या प्रमाणात आहे. या वाळूमध्ये क्षारांचे प्रमाण आढळल्यामुळे, येथून वाहणाऱ्या लुणी नदीला खारट पाण्याच्या नदीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

राजस्थान राज्याचे विभाजन सुमारे ३३ जिल्ह्यांमध्ये केले गेलेले आहे. राजस्थान राज्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास येथे उंट व हत्ती यांची संख्या मोजली तर ती येथील लोकसंख्या पेक्षा कितीतरी पट अधिक भरते.

राजस्थानला एक समृद्ध असा संस्कृती वारसा लाभलेला आहे. आणि आपल्या संस्कृतीक वारशाने राजस्थानने संपूर्ण जगभर आपली छाप उमटवलेली आहे. अगदी ट्रक बनवण्याच्या पद्धतीमध्ये देखील राजस्थानची विविधता आढळून येते. आजकाल महाराष्ट्रामध्ये राजस्थान वरून बनवून आणलेले ट्रक फार प्रसिद्ध आहेत.

राजस्थान विविध प्रकारच्या आईस्क्रीम आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी देखील ओळखला जातो. तेथील भोजन संस्कृती देखील अलौकिक आहे. येथील सर्वात उत्कृष्ट पदार्थ म्हणून दाल बाटी चुरमा ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये देखील या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर आहारात समावेश वाढलेला आहे, त्यामुळे राजस्थानचे संस्कृती संपूर्ण जगभर पसरण्यास मदत झालेली आहे.

राजस्थानचे संस्कृती ही शेतीवर आधारित असली, तरी देखील तिथे लोकसंगीत व लोकनृत्य देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. ज्याद्वारे राजस्थानची संस्कृती ठळकपणे इतर संस्कृती पेक्षा वेगळी दिसून येत असते. राजस्थान या राज्याची राजधानी म्हणून जयपूर शहराला ओळखले जाते, याची स्थापना १७२२ या वर्षी महाराजा जयसिंग यांच्याद्वारे करण्यात आली होती. येथे एक पॅलेस असून ते खूपच प्रसिद्ध आहे. याच राजधानीच्या शहराला गुलाबी शहर म्हणून देखील ओळखले जाते.

राजस्थान राज्याचे धर्म परंपरा आणि प्रथा परंपरा:

राजस्थान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजाच्या लोकांचे वास्तव्य असले, तरी देखील येथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख इत्यादी अनेक धर्मांच्या लोकांची मोठी संख्या आढळून येते. त्यामुळे येथे वर्षभर सर्व प्रकारच्या धर्मांचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. येथे उत्खनन कार्यादरम्यान भारतीय पुरातत्त्व विभागाला एक शहर सापडले होते, ज्याचे सिंधू संस्कृतीशी नाते होते. त्या शहराला कालीबंगन असे नाव होते.

राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर राजस्थानी भाषा बोलली जाते, त्याचबरोबर इथे मारवाडी, सिंधी, गुजराती, इंग्रजी, उर्दू, या भाषा देखील वापरात आढळून येतात.

राजस्थानी पोशाख:

राजस्थान हे तेथील घूमर नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे त्या स्वरूपाचा पोशाख देखील धारण करणे संस्कृतीचे लक्षण समजले जाते. येथे अनेक लोक धोतर व कुर्ता घालतात. काही लोक घागरा देखील घालण्याला प्राधान्य देत असतात. येथे मृत्यूच्या प्रसंगी काळा रंगाच्या वस्त्राने प्रेताला झाकले जाते.

राजस्थान हे उष्ण राज्य असल्यामुळे येथे शक्यतो उन्हाळ्यात भेट देणे टाळले पाहिजे. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी येथे भेट देण्याकरता सर्वोत्तम समजला जातो, कारण अतिशय आल्हाददायक वातावरण या कालावधीमध्ये असल्यामुळे, अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही येथील आनंद लुटू शकता. आणि आपल्या सोबत भरपूर अनुभवांचा खजिना घेऊन येऊ शकता.

निष्कर्ष:

विविधतेने नटलेल्या भारत देशामध्ये आपल्याला अनेक राज्य बघायला मिळतात. या प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती, वेशभूषा, खाद्यपदार्थांची संस्कृती, इत्यादींमध्ये भिन्नता आढळून येत असते. त्याचप्रमाणे या प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी ओळख झालेली असते. त्याचप्रमाणे राजस्थान राज्य हे तेथील उत्कृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांसाठी ऐतिहासिक वास्तू किंवा स्मारक आणि थरचे वाळवंट इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.

आजच्या भागामध्ये आपण या राजस्थान राज्याबद्दल माहिती बघितली असून, येथील इतिहास, राजधानी, संस्कृती, निर्मितीची प्रक्रिया, येथील प्रथा परंपरा, येथील पेहराव, राजस्थानचे नृत्य संस्कृती, धार्मिक सण उत्सव, इतर गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील जाणून घेतलेले आहेत, त्यामुळे राजस्थान बद्दल अधिक माहिती मिळण्यास तुम्हाला मदत झाली असेलच.

FAQ

राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?

राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे ३ लाख ४२ हजार २३९ चौरस किलोमीटर इतके आहे.

राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री व राज्यपालांचे नाव काय आहेत?

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे व राज्यपालांचे नाव अनुक्रमे अशोक गहलोत आणि कालराज मिश्रा असे आहे.

राजस्थान राज्याची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

राजस्थान राज्याची राजधानी म्हणून जयपूर या शहराला ओळखले जाते. याच शहराला गुलाबी शहर अर्थात पिंक सिटी म्हणून देखील ओळख प्राप्त झालेली आहे.

राजस्थान राज्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार किती समजली जाते?

राजस्थान राज्याची लोकसंख्या २०११ या वर्षी झालेल्या जनगणनेनुसार ६.८९ कोटी इतकी आहे, असे सांगितले जाते.

राजस्थानमध्ये आढळणाऱ्या हिल स्टेशनचे नाव काय आहे?

राजस्थान मध्ये असणाऱ्या हिल स्टेशनचे नाव माउंट अबू असे असून, ते राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. व ज्याची समुद्रसपाटीपासून ची उंची सुमारे १७२२ मीटर इतकी आहे.

Leave a Comment