राजमा रेसिपी मराठी Rajma recipe in Marathi

राजमा रेसिपी मराठी Rajma recipe in Marathi  आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर राजमा रेसिपीज बघितल्यानंतर त्यातील आपल्याला हवी असलेली राजमा रेसिपी आपण मागवतो ; परंतु आपल्याला जर घरच्या घरी राजमा चावल, राजमा करी, राजमा पुलाव, राजमा मसाला यासारख्या रेसिपीज करायच्या असतील तर आपल्याला खूपच अवघड वाटतात.  परंतु तसे नाही, आम्ही तुमच्या करिता खास अगदी सोप्या शब्दांमध्ये राजमा रेसिपी घेऊन आलो आहोत.  आपल्या घरी पाहुण्यांची मेजवानी असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपण राजमापासून विविध पदार्थ किंवा रेसिपी तयार करू शकतो.  तर चला मग आज जाणून घेऊया.  राजमा करी रेसिपी कशी तयार करायची.  त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात व पाककृती काय आहे हे जाणून घेऊया.

Rajma recipe

राजमा रेसिपी मराठी Rajma recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

राजमा पासून आपण विविध प्रकारच्या रेसिपीज तयार करू शकतो.  जसे राजमा चावल, राजमा उसळ, राजमा करी, राजमा पुलाव, राजमा मसाला, पंजाबी राजमा रेसिपी इ.  तर आज आपण राजमा करी ही रेसिपी येथे पाहणार आहोत.  राजमा उसळ आणि राजमा करी मध्ये थोडा फारच फरक आहे. राजमा करी तुम्ही जीरा राईस,  पुलाव, रोटी, तंदुरी रोटी, पराठा याच्यासोबत खाऊ शकता.  तर या रेसिपी विषयी पुढील प्रमाणे माहिती पाहूया.

ही रेसिपी किती जणां करीत आहे?

ही रेसिपी पाच जणांकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

राजमा करी बनवण्याकरता आपल्याला थोडीफार पूर्वतयारी करावी लागते, त्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

राजमा कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे लागतात.

टोटल टाईम  :

राजमा करी ही रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 20 मिनिटे एवढा लागतो.

राजमा करीसाठी लागणारे साहित्य  :

1) एक टोमॅटो ( प्युरी )

2) एक कांदा

3) एक वाटी राजमा

4) आले लसूण पेस्ट दोन चमचे

5)  एक चमचा जिरे

6) तेज पत्ता

7) एक चमचा लाल तिखट

8) हळद पाव चमचा

9) एक चमचा धने पावडर

10) एक चमचा जिरे पावडर

11) एक चमचा गरम मसाला

12) तेल

राजमा करी बनवण्याची पाककृती  :

  • रसगुल्ला रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम आपल्याला ज्या दिवशी राजमा करायचा आहे.  त्याच्या आदल्या दिवशी राजमा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचा आहे.
  • राजमा करी करण्यासाठी सर्वप्रथम भिजलेला राजमा  स्वच्छ धुऊन कुकरमध्ये सात ते आठ शिटी काढून शिजवून घ्यावा.
  • नंतर गॅस वर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाले की, जिरे तमालपत्र टाका.  नंतर बारीक चिरलेला कांदा देखील परतून घ्या.
  • कांदा चांगला लालसर भाजून घ्या.  कांदा लालसर झाला की, त्यामध्ये आले लसूण पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी घाला.
  • नंतर त्यामध्ये हळद, लाल मसाला, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर टाकून मसाला चांगला परतून घ्या.
  • आता हा सर्व मसाला झाला की, त्यामध्ये राजमा टाकायचा आहे.  राजमा टाकला की ते चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घ्या.
  • राजमामध्ये फारसे पाणी घालू नका.  घट्ट मसाल्याप्रमाणेच करी तयार करून घ्यायची आहे.
  • अशाप्रकारे गरमागरम राजमा करी तयार आहे.
  • आता वरून कोथिंबीर घालून तुम्ही पोळी, भात, पराठा सोबत राजमाकरी सर्व्ह करू शकता.

राजमा करितील पोषक घटक :

राजमा आरोग्यासाठी पोषक असून राजमा मध्ये अनेक पोषक घटक आहेत.  राजमा मध्ये सर्वाधिक फायबर आणि प्रथिने असतात.  त्याशिवाय लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटामिन सी विटामिन के व तांबे यासारखे पौष्टिक पदार्थ असतात.

फायदे :

राजमा आरोग्यासाठी पोषक आहे, राजमामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहतात.

राजमाची सुख पिल्यामुळे केस आणि त्वचेसाठी बरेच फायदे दिसून येतात.  कारण राजमाच्या सूप मध्ये विटामिन सी असते.  राजमाच्या नियमित सेवनाने केस लांब होतात, केस गळणे थांबतात.

राजमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते सहज पचतात व  आपले वजन कमी करण्यास मदत करते.

राजमा आपण नेहमी दुपारी किंवा रात्री कधीही खाऊ शकतो.  राजमाची सूप देखील खूपच फायदेशीर आहे.  त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

तोटे   :

राजमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.  ते जर आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटामध्ये गॅस किंवा फुगवणे व स्नायू संबंधित समस्या उद्भवू शकतात.  त्यामुळे त्याचे प्रमाण निश्चित करूनच खावे.

राजमा मध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील असते त्यामुळे त्याचे प्रमाण जर जास्त वाढले तर आपल्याला कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

राजमा मध्ये लोहाचे प्रमाण असते, त्याच्या जास्त सेवनाने आपल्याला उलट्या, ओटी पोटात दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

राजमा उकडण्यापूर्वी पाच ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवावेत.  कच्चा आणि कमी शिजलेल्या राजमा मुळे आपल्याला हानी होऊ शकते.

तर मित्रांनो, राजमा करी ही रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment