Rakshabandhan Festival Information In Marathi रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. इतर सणाप्रमाणे हा सण थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण हा सण स्नेहाचा व आपुलकीचा तसेच बहीण भावाच्या नात्याचा सण आहे. हा सण मुख्यतः श्रावण महिन्यामध्ये येत असतो आणि या सणाला बहिण आपल्या भावाला राखी बांधते.
रक्षाबंधन सणाची संपूर्ण माहिती Rakshabandhan Festival Information In Marathi
बहीण भावाचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. हा सण भारतामध्ये मुख्यता साजरा केला जातो. या दिवशी सर्वच वयोगटातील बहीण आपल्या लहान मोठ्या भावांना मनगटावर एक राखी म्हणजेच पवित्र धागा बांधते. आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यासाठी बहीण भावाला राखी बांधते. जेणेकरून पुढील काळामध्ये भाऊ तिचे रक्षण करेल. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू देत असतो.
हा सण ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतो. रक्षाबंधन म्हणजेच संरक्षण बंधन किंवा काळजी असा याचा अर्थ होतो. या सणाला वेगवेगळी नावे आहे या सणाला सलोनी सिलोनो असे सुद्धा नावे आहेत. विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. बऱ्याच प्रदेशांमध्ये गावांमध्ये ही प्रथा आजही विधिवत सुरू आहे.
रक्षाबंधनला बहीण ही भावाच्या घरी येत असते म्हणजेच माहेरी येते आणि आपल्या भावाला राखी बांधते. मला गोडधोड पदार्थ सुद्धा केले जातात बहिण आपल्या भावांना वेगवेगळे पकवान सुद्धा खायला देते आणि बहिण भावाचं अतूट नातं या सणामुळे साजरा होते.
रक्षाबंधन सणाचा इतिहास ऐतिहासिक :
काळाचा आपण विचार केला तर रक्षाबंधन हा सण प्राचीन सण आहे. चित्तोडच्या राणी कर्णावतीने हुमायू बादशाह राखी पाठवली होती व हुमायू बादशहाने सुद्धा आपल्या बहिणीचे बहादुर शहाणे केलेले आक्रमणांपासून संरक्षण केले होते. दुसरा अलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व त्याचे प्रेत नदीत टाकून दिले होते. एका स्त्रीने ते पाहिले आणि प्रेत वाहू नये म्हणून तिने ते प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताची कोणी वाली येईपर्यंत प्रीताजवळ बसून राहिले.
बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले आणि बादशहाचा मुलगा शहा आलम यांनी त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले. तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शहा आलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादुर शहा यांनी सुद्धा सुरू ठेवली. इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे, मोगल बादशहांनी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे.
रक्षाबंधन या सणाविषयीची आख्यायिका :
रक्षाबंधनाची सुरुवात नेमकी केव्हा झाली याविषयी पुरावा उपलब्ध नाही परंतु या सणाविषयीची पूर्वी देवदाणवांच्या युद्धात दानवांच्या शक्ती पुढे देवांचे काहीच चालत नव्हते. त्यामुळे दानवाचा राजा रुद्रासुर यांनी देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले.
इंद्र आपले वज्र घेऊन युद्धात निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सूची हिने विष्णू कडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला. अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव पुन्हा त्यांना परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची ही पद्धत सुरू झाली असे मानले जाते.
हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतामध्ये जे एक महान भारतीय महाकाव्य आहे. पांडवांची पत्नी द्रोपती तिने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटा मधून वाहणारे रक्त थांबण्यासाठी तिच्या साडीचा कपडा श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधला. कारण भगवान कृष्णाने स्वतःला जखमी केले होते. अशाप्रकारे बहीण भावाचा हा सण सुरू झाला आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन सुद्धा दिले होते आणि ते पूर्ण सुद्धा केले होते.
रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व :
हिंदू धर्मामध्ये या सणाला सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. हा सण श्रावण पौर्णिमेचा सण असतो. यालाच श्रावणी असे सुद्धा म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेद पुराणांची कथा ऐकण्याचे उत्सव सुद्धा साजरे करतात. पूर्वी कुमारांना शिक्षण घेण्यास सुद्धा सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ शौर्याचे शुभचिन्ह या दोन्ही गोष्टी म्हणून मन लक्षात घेऊन आचरण करणे म्हणजे श्रवण साजरी करणे. उद्देशाने हा सण साजरा केला गेला आणि त्याचे महत्त्व वाढत गेले.
रक्षाबंधन सणाची विविधता :
रक्षाबंधन हा सण प्रांतानुसार बदलत जातो म्हणजेच दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकीय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ सुद्धा तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर रक्षाबंधन आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे एक बंधन आहे. तर जैन लोक या दिवसाला रक्षापर्व म्हणून पाळतात आणि या दिवशी जैन मंदिरात राख्या ठेवतात. जैन मुनि हे त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात. प्रकारे प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची विविध पद्धती आहेत.
रक्षाबंधनाचे महत्त्व :
रक्षाबंधन हे एक सुरक्षतेचे स्मारक आहे. जे राखी बांधल्यामुळे एक बंधन तयार होते. हे बंधन बहीण भावाचे प्रेमाचे बंधन असते म्हणजेच बहीणचे संरक्षण करण्याचे भाऊ वचन देतो. आपल्या बहिणीचे सदैव रक्षण व्हावे म्हणून भाऊ बहिणींचा हा सण साजरा केला जातो. समाजातील विकृत वृत्तीच्या माणसांपासून बहिणीचे संरक्षण व्हावे हा या सणाचा उद्देश आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला पाटावर बसवते तसेच त्याला कुंकवाचा टिळा लावते आणि नंतर हातावर राखी बांधते. आपल्या भावा विषयीचे प्रेम व्यक्त करणारी ही एक अमूल्य असा क्षण आहे. सणाचे आधारस्तंभ म्हणजेच प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस हे आपल्याला येथे जाणवते. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे बहिण भावाचं नातं आहे. पूर्वजांनी सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये या नात्यात पवित्रतेचा महिमा गायला आहे.
आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा वाट दाखवली आहे. स्त्री सन्मान हा या सणांमधून दिलेला उपदेश आहे. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला बरोबर सन्मान न देणाऱ्या लोकांना त्यांचे महत्त्व मात्र कळणार नाही. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा होते, तिचा मान, सन्मान व सत्कार होतो. तेथे सुशील, गुणी आणि उत्तम मुलं जन्माला येतात.
FAQ
रक्षाबंधन हा सण कसा साजरा केला जातो?
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला कुंकवाचा टिळा लावते व भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला काही ना काही भेटवस्तू देत असतो. अशा प्रकारे हा सण साजरा करतात.
रक्षाबंधन या सणाला दुसरे कोणते नाव आहे?
राखी पौर्णिमा.
रक्षाबंधन हा सण कधीपासून सुरू झाला?
6000 वर्षांपूर्वीपासून आर्यांनी पहिली संस्कृती स्थापन करताना रक्षाबंधन हा सण साजरा केला होता.
हूमायुला राखी कोणी बांधली होती?
कर्णावतीने.
रक्षाबंधन हा सण कशाचे प्रतीक आहे.
रक्षा बंधन हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे.