Rani Lakshmibai Information In Marathi भारत या देशाच्या इतिहासामध्ये केवळ पुरुषच वीर आहे असे नाही तर बऱ्याच महिलांनी सुद्धा रणांगणामध्ये किंवा युद्धामध्ये आपला पराक्रम गाजवत इतिहासामध्ये नाव अजरामर केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई असे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई एक विरांगणा होती, ज्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई लढली होती. इंग्रजांनी सुद्धा त्यांच्याविषयी असे म्हटले आहे की, त्या अतिशय अद्भुत आणि बहादुर स्त्री होत्या परंतु आमचे नशीब चांगले होते की, त्यांच्याकडे त्यांच्याच सारखे विचार करणारे लोक नव्हते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची संपूर्ण माहिती Rani Lakshmibai Information In Marathi
लक्ष्मीबाई यांचा जन्म व बालपण :
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म हा 19 नोव्हेंबर 828 मध्ये उत्तर प्रदेश येथील काशी येथे झाला. त्या एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या होत्या. त्यांचे नाव मनकर्णिका असे होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण त्यांना मनू या नावाने संबोधित असत किंवा हाक मारत असत.
मनुच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे होते तर त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई असे होते. मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते आणि तेथे चार वर्षाच्या वयात मनुच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या आपल्या जास्तीत जास्त वेळ वडिलांसोबत पेशवा दरबारातच घालू लागल्या.
वडिलांनी त्यांना प्रत्येक कार्यात स्वतंत्रता दिली होती. त्यामुळे त्या चतुर, धोरणी, युद्ध शस्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्ववान व विशिष्ट नेतृत्व अशी गुण त्यांच्या अंगी जडले होते. लक्ष्मीबाई शिक्षणासोबत आत्मरक्षा, घोडसवारी, निशानेबाजी, घेराव इत्यादी सुद्धा प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी तात्या टोपे सारख्या सहकार्यासोबत मिळून आपली एक सेना तयार केली होती.
लक्ष्मीबाई यांचे वैयक्तिक जीवन :
लक्ष्मीबाई जेव्हा 14 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करण्यात आला. ज्यावेळी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशी मधील प्रजेमध्ये लक्ष्मीबाई यांच्या विषयी विशेष प्रेम निर्माण झाले परंतु दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधरराव यांना पसंत नव्हते. आपल्याला मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाई व्यायाम, कसरत, घोडेस्वारी व तलवारबाजी इत्यादी मध्ये घालवत असत.
लग्नाच्या काही वर्षांनी 1851 मध्ये गंगाधरराव हा लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला परंतु चार महिन्यातच या मुलाचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी आपला भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले होते. या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले आणि 21 नोव्हेंबर 1853 मध्ये गंगाधर रावांचे निधन झाले होते.
इंग्रजांशी संघर्ष :
गंगाधर राव यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाई ह्या झाशीचा कारभार पाहू लागल्या. तेव्हा त्यांचे वय केवळ अठरा वर्ष होते. अठरा वर्षाच्या वयातच लक्ष्मीबाई ह्या झाशीच्या उत्तराधिकारी बनल्या. त्या काळामध्ये भारताचा गव्हर्नर हा डलहौसी होता. त्या काळामध्ये त्याने नियम बनवला होता की, कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी राजाचा मुलगा राहील जर एखाद्या राजाला मुलगा नसेल तर ते राज्य मात्र ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मिसळून जाईल व राज्याच्या कुटुंबाला आर्थिक खर्चासाठी पेन्शन देण्यात येईल. लॉर्ड डलहौसी याने गंगाधर रावांच्या मृत्यूनंतर झाशी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
झाशीची राणी व गंगाधरराव यांचे स्वतःचे पुत्र नाही असे त्याने झाशी संस्थांना खालचा करण्यासाठी सांगितले. 13 मार्च 1854 मध्ये ची जनतेला उद्देशून एक जाहीरनामा काढण्यात आला व त्यानुसार दत्तक विधान मंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारमध्ये विलीन करण्यासाठी तेथे आले. त्यावेळी स्वाभिमानी लक्ष्मीबाई यांनी म्हटले, माझी झाशी देणार नाही…! लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश शासनाविरुद्ध लंडनमध्ये खटला दाखल केला.
इंग्रजांनी त्यांच्या खटलेला खारीज केले व सोबत आदेश दिला की, महाराणीने झाशीच्या किल्ल्याला सोडून राणी महालात जाऊन रहावे. त्यांना दरमहा सात हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही लक्ष्मीबाईंनी झाशी न देण्याचा निर्णय केला होता. जशी खालचा झाल्यावर लक्ष्मी बाईंना काही काळ किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहावे लागले तर आणि लक्ष्मी यांना पदक झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ मात्र शांत बसावे लागले होते.
1857 चे स्वातंत्र्यसंग्राम :
नव्या बंदुकीच्या गोळ्यांवर डुक्कर व गायचे मास लावण्यात आले होते. त्यामळे 1857 चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये झाला. याचा विद्रोह हा मरेठमध्ये सुरू झाला. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेस पोचली. त्यामुळे याचा परिणाम हा देशभरात पसरला व झाशीमधील 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी तात्पुरती झाशी राणी लक्ष्मीबाईच्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला. 22 जुलै 1857 ला लक्ष्मीबाई यांनी झाशीची अधिकार सूत्रे हाती घेतली.
इंग्रजांची झाशीवर आक्रमण :
राणी लक्ष्मीबाई या राज्यकर्त्या पुन्हा झाल्या परंतु अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्या हातात राज्यकारभार आला होता. त्यांच्याकडे फारसे मनुष्यबळ नव्हते आणि त्यांचा खजिना ही रिकामा झाला होता. प्रोजेक्टमध्ये मात्र असंतोष व असुरक्षितता तसेच त्यांच्या भविष्याबद्दलची भीती निर्माण झाली होती. लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली व जुन्या विश्वातील लोकांना आपल्याकडे परत बोलून घेतले.
अधिकाराची पदे त्यांना दिली 1857 मध्ये झाशीच्या शेजारील राज्यांनी झाशीवर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंना शेजारी राज्य मोर्चा आणि दतिया या चार राज्याशी सुद्धा युद्ध करावे लागले. यांच्या काही काळानंतर 21 मार्च 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज याने चांगल्या सेनानी आणि राजकारणी यांच्या मदतीने झाशीवर आक्रमण केले.
त्याने राणीला आणि शस्त्र भेटण्यास किंवा युद्धात तयार रहावे असे कळविले तेव्हा ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे अन्यायामुळे भारतामध्ये विदेशी शासन नकोच अशा ठाम मताच्या राणी भेटणे जाण्यासाठी नाकारले त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संवाद साधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.
दोन-तीन दिवस झाशीची बाजू ही अभेद्य होती परंतु त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आणल्या व त्याचा मराठीला त्यामुळे शिवमंदिरे वाचली परंतु नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला मोठी खिंडारे पाडली ही खंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले व त्यावेळी चुना दगड विटांनी आणण्याचे काम हे स्त्रियांनी केले होते.
शेवटी ब्रिटिशांना फितूर यांनी साथ दिली व झाशी मधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झाशीला पाण्याचा पुरवठा व्हायचा ती विहीर आणि जिथे दारूगोळा तयार व्हायचा तो कारखाना ही दोन ठिकाणी इंग्रजांनी उध्वस्त केली.
राणी पुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली अशा स्थितीमध्ये राणीची आशाही फक्त पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती 31 मार्चला तात्या टोपे चे सैन्य सुद्धा आले होते. परंतु इंग्रजांपुढे त्याचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाई सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बडावर लढण्याचे आवाहन केले एवढेच नाही तर रणांगणामध्ये तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन असे सुद्धा राणीने त्यांच्या उजव्या हात असलेले खुदाबक्ष आणि गौसखान यांना दिले होते.
इंग्रजांच्या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत सुंदर अशा शहराचे होणारी वाटाह पाहून राणी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला तो अमलात आणला आणि संतापलेल्या राणींनी तलवार हाती घेतली व त्यांची तलवार पाहून समोर येणारा शिपाई हा पाहतच राहिला त्यांचे ध्येय शौर्य व आवेश पाहून इंग्रज सैनिक घाबरला. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडली.
झाशीची राणी यांचे निधन :
17 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाई यांचे निधन झाले. आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्रराव देशमुख, काशीबाई गुणविन, मोहम्मद बांदा, नवाब बहादुरली द्वितीय व युवराज दामोदर राव यांनी मुखांनी त्यांना दिली.
FAQ
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव काय होते?
गंगाधर राव नेवाळकर होते.
झाशी इंग्रजांनी कधी ताब्यात घेतली?
राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतर.
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला?
19 नोव्हेंबर 1828.
राणी लक्ष्मीबाई यांचे सुरुवातीचे नाव काय होत?
मणिकर्णिका.
राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते?
मोरोपंत तांबे.